Friday, 30 May 2008

विनोद भाग १

१) नवरा : आज पासून तूच माझी कविता , कल्पना , आणि भावना ...

बायको : आज पासून तुम्ही माझे रमेश, सुरेश, आणि उमेश

२) चार सरदारानी चेस खेळायचे ठरवल, पण चेसबॉर्ड एकच होता

तेव्हा त्यातला एक म्हणाला नो प्रॉब्लेम आपण डब्लस खेळू

३) पती : डार्लिंग हा घे ज्युस।

पत्नी : मोबाइल फोनचा ?

पती : हो ओरेंजचा आहे नेया !

४) पिक्चर बघायला १८ सरदार जी एकत्र का जातात ?

कारण जाहिरातीत लिहिले होते नॉट फॉर बिलो १८।

५) लग्न आधी तो बोलतो ती एकते।

लग्न ठरल्यावर ती बोलते तो एकतो।

लग्नानंतर दोघेही बोलतात शेजारी एकतात।

६) एक ग्राहक रेडिओ खरेदी करण्यासाठी दुकानात गेला. निरनिराळे रेडिओ त्याने लावून पाहिले। त्याची पाहणी केली. नंतर तो एक रेडिओ हाहात घेऊन दुकानदरला विचारतो आहो रेडिओ सगळे स्टेशन पकडतो ना ? दुकानदार वैतागून म्हणाला पोलीस स्टेशन व रेल्वे स्टेशन सोडूने सर्वे पकडतो.

७) जंगलातून एक हत्ती चे पिल्लू चालले होते. उंदराने बिळातून पहिले. मनाशी म्हणाला " बराच मोठा दिसतोय ! " तरीही त्याने तोंड बाहेर काढून हत्तीच्या पिल्लला विचारले "तुझे वय काय?"हत्ती म्हणाला , " सहा महिने "हात्तीने विचारले "तुझे वय काय? "उंदीर म्हणाला , "माझेही वय सहा महिने च आहे, पण मी सारखा आजारी असतो."

उखाणे भाग २

१) पहिली सोनी, दुसरी मनी, तिसरी जणी
सोडल्या तिघीजणी नी झालो तकी धनी

२) कंप्यूटर ला असते फ्लोपी डिस्क
गंगुबाई शी लग्न करून मी घेतली मोठी रिस्क

३) वाकडी तीकडी बाभुला तिच्यावर बसला हेला
सखा पाटील मेला म्हणून तुका पाटील केला

४) चांदीच्या ताटात जिलेबेचे तुकडे
घास भरवते मरतूकड्या, तोंड कर इकडे

५) शिडीवर शीडी बत्तिस शीडी
गणपतराव ओढतात विडी नि मी लावते काडी

६) रेशमचा सदरा त्याला प्लास्टिक चे बक्कल
...........राव आहेत सुंदर पण डोक्याला टक्कल

७) इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय
गणपतराव अजुन आले नाहीत, पिऊन पडलेट की काय ?

८) समुद्राच्या काठावर मुऊ मुऊ वाळू
शंकरराव दिसतात साधे पण आहे आतून चालू

९) तेलाच्या दिव्याला तूपाची वात
शंकररावंशी करून लग्न लावली आयुष्याची वाट

१०) चंदेरी चळिला सोनेरी बटन
........ रावांना आवडते तंदुरी चिकन

Thursday, 29 May 2008

उखाणे भाग १

१) चांदीच्या ताटात ठेवले होते गहू

लगनच झाले नाही तर नाव कसे घेऊ

२) कालच चित्रपट पाहिला नाव त्याचे सायको

फाल्गुन रावांचे नाव घेते गणपतरावांची बायको

३) लग्नाच्या पंगतीत घेतला उखाना खास

आणि गणपतरावांच्या घशात अडकला घास

४) गुलाबाच्या काळी ला बाकुळीचा त्रास

गणपतराव बनले माझ्या आयुष्याचा त्रास

५) एक होती चिऊ एक होती काऊ

गणपतरावांचे नाव घेते डोके नका खाऊ...

६) अंगणात पेरले पोतेभर गहू

यादी आहे मोठी कुणा कुणाचे नाव घेऊ।

७) तळ्यातल्या चिखलात लाल लाल कमळ उमळले

गणपतराव खाड्यात पडले, त्यांना दुसरने काढले

८) आलीकडे अमेरिका पलीकडे अमेरिका

नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारिका

Monday, 26 May 2008

ती वेळ

प्रत्येकाच्या आयुष्यात

केव्हा ना केव्हा

अशीही एक वेळ येतेच

जेव्हा तुमची बायको

तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागते...

त्याचा अर्थ तुम्ही अगदी संत झालात असा होत नाही,

तर वयोमानाप्रमाणे तुमची 'पारखी नजर' कमजोर झाली आहे

आणि हे तिच्या लक्षात आलं आहे, एवढाच त्याचा अर्थ!!!!!


भलेभले थकले

मला आवडलेला मोबाइल संदेश :

पुरुषाबरोबर सुखी राहायचे असेल, तर त्याच्यावर थोडेसे प्रेम करा आणि त्याला खूप समजून घ्या. स्त्रीबरोबर सुखी राहायचे असेल, तर तिच्यावर खूप प्रेम करा आणि तिला समजून घेण्याचा प्रयत्न अजिबात करू नका! भलेभले थकले महाराज!!!!!! ................ कोणत्याही भांडणातला शेवटचा शब्द स्त्रीचा असतो... ... त्यानंतर पुरुषाने काहीही उच्चारले, तर ती नव्या भांडणाची सुरुवात असते!!!!!

Sunday, 25 May 2008

छत्रपती शिवाजीराजे भोसले

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची थोडक्यात माहिती :

अधिकाराकाळ : जून ६, १६७४ - एप्रिल ३, १६८०
राज्याभिषेक : जून ६, १६७४
राज्यव्याप्ती : पश्चिम महाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंतआणिउत्तर महाराष्ट्र, खानदेशापासूनदक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानी : रायगड
पूर्ण नाव : शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
पदव्या : गोब्राह्मणप्रतिपालक
जन्म : फेब्रुवारी १९१, १६३० शिवनेरी किल्ला, पुणे
मृत्यु : एप्रिल ३, १६८० रायगड
उत्तराधिकारी : छत्रपती संभाजीराजे भोसले
वडीलशहाजीराजे भोसले
आई : जिजाबाई
पत्नी : सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सकवारबाई
संतती : छत्रपती संभाजीराजे भोसले, छत्रपती राजारामराजे भोसले
राजघराने : भोसले
राजब्रीदवाक्य : 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
चलन: होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन)

जन्मदिनांकाच्या निश्चितीबद्दल मतमतांतरे आहेत.

मायबोली मराठी

"पिकते तिथे विकत नाही" असे म्हणतात। तसेच महाराष्ट्रात राहून `मराठी' भाषेचे महत्त्व तितके जाणवत नाही! आई समोर असताना आईचे महत्त्व जाणवते का? आपण जेव्ह परप्रांतात काही काळासाठी जातो व सतत जेव्हा ती परप्रांतीय अनोळ्कि भाषा कानावर पडू लागते. तेव्हा आपण आपली मातृभाषा ऐकण्यासाठी कासावीस होतेओ. चुकून अपली भाषा बोलणारी , अनोळखी मंडळी दिसली तर ती माणसे अनोळखी असूनही खूप आपली वाटतात! हे भाषेचे अदृश्य धागे!आता थोडी गंमत पहा! ही भाषा दर पंचवीस किलोमीटरवर वेगळी भासते. आपण कोल्हापुरला गेलो तर तिथे मराठी भाषा खणखणीत, स्पष्ट आणि नेमकी वर्मावर बोट ठेवणारी! तिथल्या स्त्रियाही म्हणतात, "आम्ही आलो! आम्ही जातो, मी जातो!" साताऱ्याला थोडा भाषेतला स्पष्टपणा नरम होतो. लंवगी मिरचीचा झटका जाऊन साताऱ्याच्या जर्द्याची गुंगी त्यात डोकावते, तरी पण "लई" "चिक्कार" `आयला' `लिका' वगैरे खास सातारी ढंगच! कोकणात भाषा अगदी मऊसूत होते. "ळ" चा उच्चार `ल'? "शाला" "फला" उच्चारही अगदी खालच्या स्वरांत, तोंडातल्या तोंडात शब्द, जणू, मासाच डुबकी घेतोय पाण्याच्या आतबाहेर! कोकणात एकदा मी एका कामगारास आपलेपणाने म्हणालो,"काय लेका!" तर त्या कामगाराचे एकदम पित्तच खवळले. तो म्हणाला, "लेका, म्हणू नका ती शिवी आहे!" माझी तर जीभ टाळूलाच चिकटली. तेव्हापासून मी कानाला खडा लावला. भाषेचे काही खरे नसते. कुठए एखादा शब्द ओवी ठरतो तर कुठे शिवी! भरवसा नाही !! तिकडे धुळे, मालेगावात तर मराठी भाषेवर "अहिराणी भाषेचा" प्रभाव! उच्चार व शब्दांच्या अनेक गंमती जंमती सहज दिसून येतात, जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे!'असो, नदी वहाताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्य भागात नवी लय धारण करते. पण मूळचा गाभा मात्र तोच. संत ज्ञानेश्वरांनी छातीठोकपणे सांगितल्याप्रमाणे, `अमृताशी पैजा जिंकणारा' गोडा पवित्र आणि रसरशीत ! अशा `मायबोली मराठीस' करावेत सर्वांनीच अनंत प्रणाम!

- सुरेश
पुणे ४११०५१

मराठी पीजे { पंचाट विनोद }

मला आवडलेले काही मराठी पीजे { पंचाट विनोद } मी इथे दीले आहेत जे तुम्हाला आवडतिल असे नाही.

1) गिऱ्हाईकाची दाढी करून झाल्यावर न्हाव्यानं त्याला विचारलं, "साहेब! माझा वस्तरा कसा काय काय वाटला तुम्हाला?"गिऱ्हाईक म्हणाले," न्हावीदादा, तुमच्य वस्तऱ्याला खरोखरच जगात तुलना नाही। तुम्ही वस्तऱ्यानं माझी दाढी करीत आहात, असं मला वाटलंच नाही."हे ऐकून एकदम खुषीत आलेल्या न्हाव्यानं विचारलं, "असं? मग मी तुमच्या गालांवरून वस्तरा फिरवीत असताना तुम्हाला नेमकं कसं वाटत होतं?गिऱ्हाईक म्हणाले, "खरं सांगायच तर, तुम्ही हाती खरखरीत पॉलिशपेपर घेऊन माझे गाल जोरात घाशीत असल्याचा मला भास होत होता."

2)दिवाणखान्यात स्वेटर विणत बसलेल्या आपल्या आईपाशी जाऊन मन्यानं तिला लडिवाळपणे विचारलं, "आई गं, स्वैपाकघरातील फडताळातल्या डब्यातला एक लाडू खाऊ का मी?""खा बरं बाळ। भूक लागलीय्‌ का तुला?"आईचे हे शब्द कानी पडताच मन्या म्हणाला, "आई! तू लाडू खायला परवानगी दिलीस, म्हणून मला किती हायसं वाटलं! कारण तो लाडू मी अगोदरच खाऊन टाकला होता!"

3)हॉटेलमध्ये गेलेला एक इसम गरमगरम मिसळ खात असता त्याला त्या मिसळीत एक मेलेलं झुरळ सापडलं। त्याबरोबर मिसळ आणून देणाऱ्या पोऱ्याला हाक मारून तो रागानं म्हणाला, "या मिसळीत बघ, मेलेलं झुरळ आलंय!"यावर तो पोऱ्या म्हणाला, "तुम्हा गिऱ्हाइकांना मिसळ तर गरमागरम हवी असते. मग गरम मिसळीतलं झुरळ जिवंत कसं राहील? उष्णतेमुळं ते मरणारच."

4) गुरुजींनी विचारलं, "बबलू! मेंदूशिवाय माणूस किती वर्षे जगू शकेल रे ? " बबलून प्रतिप्रश्न केला, " गुरुजी! सध्या तुमचं वय किती आहे?"

रस्त्यात दोन इसमांची भेट झाली। बोलता बोलता विषय टिळकांचा निघाला, तेव्हा पहिला म्हणाला, " लोकमान्य टिळकांचा `गीतारहस्य' हा ग्रंथ खरोखरच अलौकिक आहे नाही का?"दुसरा-प्रश्नच नाही. त्या ग्रंथाल तोड नाही.पहिला- तुम्ही वाचलाय का तो ग्रंथ? दुसरा- नाही, पण तुम्ही?

वर्गात शिकवता शिकवता गुरुजी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले। "बरं का बाळांनो? खोटं ते खोटं. ते कधीहि उपयोगी पडणं शक्य नाही, म्हणून जे खोटं आहे, त्याला आपण कधीही थारा देता कामा नये. " याप्रमाणे बोलून त्यांनी बापूला विचारलं, "काय रे बाप्या ? माझ म्हणणं तुला पटलं ना ? " यावर बापू म्हणाला, " गुरुजी, प्रत्यक्ष खोट्या दातांची कवळी तुमच्या तोडांत दिसत असताना, तुमचं म्हणणं मला कसं पटेल?"

एका डॉक्टरांनी आपल्या रोग्याला विचारल्म , " अलबतराव, मी काल दिलेल्या औषधामुळं तुमच्या उलट्या बंद झाल्या ना ?"अलबतराव म्हणाले, " हो, उलट्या पार बंद झाल्या, पण अजून मला श्वास मात्र अधुनमधून लागतोय।"आवर डॉक्टर अगदी आत्मविश्वासाने त्यांना म्हणाले, " अलबतराव, त्याची बिलकूल काळजी करू नका तुम्ही. माझ्या आजच्या औषधाने तुमचा श्वासही कायमचा बंद होईल."

एक शिक्षिका वर्गातल्या एका गुबगुबीत मुलाला वेषभूषास्पर्धेसाठी `गणपती' बनवू पहात होती। पण त्या शिक्षिकेनं, त्याचप्रमाणे त्या मुलाच्या आईनंही त्याचं मन वळविण्याचा बराच प्रयत्न करूनहीम, तो त्यांचं ऐकेना.अखेर त्याला एका बाजूला घेऊन आई म्हणाली, "गुंड्या, अरे यापूर्वी तू बऱ्याच वेळा मोठ्या उत्साहानं भाग घेऊनम अनेक वेषभूषास्पर्धेत बक्षिसे मिळविलीस; मग याच वेळी तू `गणपती' का होत नाहीस ? अरे, लोक तुझी पुजा करतील, तुला मोदक देतील, तुझी आरती करतील! केवढी मज्जा येईल ठाऊक आहे?यावर गुंड्या म्हणाला, "ते सगळ खरं गं ? पण शेवटी `पुढच्या वर्षी लवकर या' असं म्हणून जर त्यांनी मला नदीत बुडवलं, तर काय करायचं ?

गुरुजींनी विचारलं, "बाळू! शिवाजीमहाराजांचं एक वैशिष्ट्य तू सांगू शकशील का?"बाळू - त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती। कुठलीही गोष्ट त्यांच्या स्मरणात पक्की राहायची.गुरुजी - (आश्चर्याने) कशावरून?बाळू - म्हणून तर लोक त्यांच्या स्मरणार्थ जिकडे तिकडे त्यांचे पुतळे उभारतात.

पाण्याचा पोपट कसा करायचापाणी तापवायचं आणि आंघोळच करायची नाहीबादलीचा पोपट कसा करायचानळाखाली बादली ठेवायची आणि नळच सुरु करायचा नाहीनळाचा बादलीचा आणि पाण्याचा पोपट कसा करायचानळच सुरु करायचा आणि बादलीच काढुन घ्यायची

सुविचार : भाग १

सुविचार

काही मराठी सुप्रसिध्ह सुविचार येथे दिलेले आहे सगलेच काही मी स्वत: लिहिलेले नाही
पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ (गोंदवलेकर महाराज)
दुर्जनाला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही.
त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे. (महात्मा गांधी)
युध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे.
जगात काही अजरामर नाही- तुमच्या चिंतासुध्दा!
जेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमुळे येते.
लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.
आपले विचार वाळूत लिहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल. आपले सुख दगडात कोरा, ते कोणीही खोडू शकणार नाही.
सत्तेपेक्षा सामर्थ्य महत्त्वाचे असते.- माणसाने आपल्या भरवंशावर जगावे.
दीपज्योतीमध्ये असे सामर्थ्य आहे की स्वत: प्रज्वलीत होऊन दुस-याला प्रजलीत करते.
आयुष्यात निश्चित काही मिळवावयाचे असल्यास साहस असावयास पाहिजे.
सानेगुरूजीचे वाड्मय म्हणजे संस्काराचा झरा !
उगीच जिथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.
जिथे मोल जाणत नाही तिथे शब्द टाकू नये.
संस्कारामुळे माणसाला खरे माणूसपण येते.
ग्रंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर.
शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.
कलीयुग कलीयुग म्हणू नका कलीयुगाला कलायुग बनवा!
मृत्यु नेहमी समीप आहे धरून चालावे त्यामुळे मन वैराग्याकडे वळते.
अंहकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वात मोठे दु:ख आहे.
चंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो.
काजव्याला वाटते जग आपल्याच लुकलुकण्यामुळे उजळले आहे.
कर्तव्यदक्ष असावे पण कर्मठ नसावे.
उत्साही असावे पण उतावीळ होऊ नये.
कृतज्ञ असावे पण कृतघ्न नसावे.
पवित्र असावे पण पतित होऊ नये.
त्याग करावा पण ताठा नसावा.
स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.
आत्मविश्वास असावा पण अंहकार नसावा.
स्वतंत्र असावे पण स्वै नसावे.
घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.
माणसाचे प्रेम हे धरती सारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.
सुखी होण्यासाठी सुखी होण्याचा मार्ग म्हणजे निसर्गावर, नियतीवर...परमेश्वरावर कोणावर तरी विश्वास ठेवा!
मानवी संबंध धावणा-या आगगाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे नसतात...ते असतात औदुबंराच्या आडव्यातिडव्या पाय वाटासारखे.
श्रध्दा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रध्दा ठेवल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही.
ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालविण्यासाठी साधन शोधण्याची गरज भासते.
पाण्याचा एक थेंब महत्त्वाचा नसेल पण ह्या थेंबाची संततधार जर दगडावर पडली तर ती धार दगडाला विंधते.
श्रध्दावान, बुध्दीवान, कर्तृत्ववान व ऐश्वर्यवान माणसाची ती कोठेही गेली तरी हार्दिक स्वागत होते. (गौतम बुध्द)- विचारांचा चिराग झाला तर आचार आंधळा बनेल. (विनोबा भावे)
प्रसंगावधान महत्त्वाचे.
जीवन क्षणभंगूर आहे आणि कडूही आहे असे सगळेच सांगत आले पण त्याचा प्रत्येक क्षण अडुळशाच्या फुलासारखा देठात मधाने भरलेला असतो.
कोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपे. पण जोडण्याकरिता कौशल्य आणि सावधगिरी लागते. (महात्मा गांधी)
जीवन ही आश्चर्याची श्रृंखला असते. आज आपल्याला उद्याचा रागरंग कधीच कळत नाही. (इमर्सन)
सुसंस्कृता अंगीकारण्यास काही द्यावे लागत नाही. पण तिच्यामुळे बरेच काही प्राप्त होते. (लेडी मॉटेज)
समृध्दता हे एक जगण्याचे साधन आहे, त्याची पूजा करून दैवत बनायचे नसते.
पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत आणि सुखी असतो.
यशस्वी व्हायचे असेल तर कल्पना नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीच मदत करतात.
हि-याहूनही 'ज्ञान' अधिक मौल्यवान आहे.
आपले प्रत्येक कृत्य हे आयुष्यातले शेवटचे कृत्य आहे असे समजून वागत जा!
मनुष्याला आपल्या दारिद्रयाची लाज वाटता कामा नये, लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणाची.
दुस-यांनी तुमच्याशी चांगले वागावे असे वाटत असल्यास आपणही त्यांच्याशी तसेच वागले पाहिजे.
मार्गातील अनेक अडचणी बाजूला सारून, जो पुढे पाऊल टाकतो त्यालाच यश मिळते. अलीकडच्या तीरावर बसून जो नुसता संकल्प करतो त्याला यश मिळत नाही.
मन अतिशय सुंदर आहे (असते) त्याला प्रसन्न ठेवयाशिवाय आपल्याला चालना येत नाही.
कष्टाने पैसा मिळवावा.
सततच्या वापराने जिची धार वाढतच जाते अशी एकमेव सुरी म्हणजेच जीभ.
स्वत:साठी जे करू ते स्वत:बरोबरच संपते.
शस्त्र हे धारण करणा-यालाही घातकच असते.
देण्याची पात्रता जो कमावतो त्यालाच घेण्याचा अधिकार असतो.
नव्या बादलीतून पाणी तर गळत नाही ना, याची खात्री होईपर्यंत जुनी बादली फेकून देऊ नये.
स्वप्ने प्रत्यक्षात यायला हवी असतील तर झोपून राहू नका.
जास्त मिळवायचे असेल तर मुळात अपेक्षा कमी मिळविण्याची ठेवा.
ह्दयाची श्रीमंती नसेल तर कुबेरही भिकारडाच राहतो.
कोणत्याही स्थितीत शांत आणि संयमी राहण्याची ताकद हेच सर्वोच्च सामर्थ्य.
काळानुसार न बदलणारे शेवटी विनाश ओढवून घेतात.
अयोग्य माणसा बरोबर आनंद करण्यापेक्षा योग्य माणसाबरोबर दु:खात राहणे बेहत्तर.
झोप आली असतांना जो झोपी जात नाही आणि झोप येत असतांना जो जागा राहतो असा मनुष्य, हा भूतलावर एक मात्र प्राणी आहे.
जीवन सुखी होण्यासाठी ज्ञान, कर्म व भक्ती यांचा समन्वय साधला गेला पाहिजे.
शांतता टिकविण्याचे सामर्थ्य नसेल तर तो नेता होऊ शकणार नाहीत (महात्मा गांधी)
समाज, देश व जगातील सर्वात जटील समस्यांचे एकमात्र निरसन म्हणजे चारित्र्य.
शांतता बाहेर सापडणे फार कठीण आहे कारण ती आपल्या आतच दडलेली असावी.
अडचणी आल्याशिवाय खरा मित्र कोण ते कळत नाही.
राग आणि सहनशीलता हे योग्य समंजसपणाचे जुळे शत्रू आहेत.
आपण सुस्वभावी आणि प्रेमळ असल्यास आपोआपच प्रेम मिळते.
मान मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आधी तो देणे होय.
व्यक्तिच्या मनात वसत असलेला सलोखा गुण्यागोंविदाने राहणा-या समाजाला प्रतिबिंबीत करीत असतो.
सर्वकाही आनंदीवृत्तीने केल्यास करायला कठीण असे कोणतेच काम असणार नाही.
चिडणे हा विरोधावर मात करण्याचा मार्ग नव्हे तर संयम आणि निराशेने तुमच्यावर मात केल्याचे लक्षण आहे.
कोणतीही बिकट परिस्थिती आली तरी धीर सोडता कामा नये.
गुणवत्तेच्या दारी पोहचण्याआधी घाम गाळला पाहिजे हेच उत्तम ध्येय ठेवावे.
प्रेमळ व सत्य बोलण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही.

Thursday, 22 May 2008

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा


गीतकार :राजा बढे
गायक :शाहीर साबळे
संगीतकार :श्रीनिवास खळे

Thursday, 1 May 2008

Contact me



Your Name :
Your Email :
Subject :
Message :
Image (case-sensitive):