सॄष्टी चालवी कोण सारी, कोण आहे तो श्रीहरी,
सदगुरु माझा त्यास दाखवी, जाणुन घे तु आता तरी,
अहो जाणा देवाला जाणा, अहो जाणा श्रीहरी जाणा || धॄ ||
मानव जन्म असे हा दुर्लभ, मिळत नसे हो सहज कुणा,
या जन्माचे सार्थक करण्या, तुम्ही देवाला हो जाणा,
जन्म मरण या संसारी, हाती कुणाच्या ही दोरी,
सदगुरु माझा त्यास दाखवी, जाणुन घे तु आता तरी,
अहो जाणा देवाला जाणा, अहो जाणा श्रीहरी जाणा || १ ||
ईश्वर, अल्लाह, गॉड, वाहीगुरु, यांच्यामध्ये भेद नसे,
कणा कणा मध्ये सर्व व्यापक, निराकार हा एक असे,
मंदिर, मस्जीद, गुरुद्वारी, मानव ज्याची पुजा करी,
सदगुरु माझा त्यास दाखवी, जाणुन घे तु आता तरी,
अहो जाणा देवाला जाणा, अहो जाणा श्रीहरी जाणा || २ ||
रानी वनी फिरुनी मानवा, नको कष्टऊ देहाशी,
भले भले ही शरण आले, सदगुरुच्या चरणाशी
"प्रसाद" विनवी सर्वापरी, थांबु नका हो क्षणभरी
सदगुरु माझा त्यास दाखवी, जाणुन घे तु आता तरी,
अहो जाणा देवाला जाणा, अहो जाणा श्रीहरी जाणा || ३ ||
Tuesday, 30 September 2008
|| जाणा देवाला जाणा ||
Monday, 29 September 2008
Marathi Charolya
एकटी स्वप्न माज़ी,
मी स्वप्नातही एकटा.
एकट्यांची ही गर्दी,
या गर्दीत मी एक एकटा...
भरल्या होत्या इथे हजार मैफ़ीली
सुर माझा कधी वाजलाच नाही
मी खेळलो कीत्येकदा रंग स्वरांचा
पण रंग माझा कुणासही लागलाच नाही...
लिहून दाखवले तरी कलले नाही,
बोलून दाखवले तरी कलले नाही,
तू त्याच्या सोबत निघून गेलीस तेव्हा कलले,
ते तुज्या पर्यंत कधी पोहचलेच नाही...
Sunday, 28 September 2008
Life's True : आयुष्यातील काही सत्य
- प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी ना कधी ते पळणार्याला गाठतातच पळवाटा मुक्कामाला पोहोचवत नाहीत. मुक्कामाला पोहोचवतात ते सरळ रस्तेच ...
- समस्या नावाची वस्तूच अस्तित्वात नसते. एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होते आणि तारतम्याने वागायचे असते. त्याचप्रमाणे एक माणूस दूसर्या माणसाच्या संदर्भात एका ठराविक मर्यादे पर्यंतच विचार करू शकतो किंवा मदत करू शकतो.म्हणून एवढ्यासाठीच कुणालाही बदलण्याच्या खटाटोपात माणसाने पडू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होउ नये.
- बायको म्हणजे कशी हवी ? आपण बिथरलो तर आपल्याला सावरणारी हवी , स्वतःच बिथरणारी नको, थोडक्यात म्हणजे पेपर वेट सारखी हवी, खालचे कागद फडफडतील पण ती स्वतः गडगडणार नाही, चळणार नाही, नी खालचे कागदही उडू देणार नाही...
- आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्शणाच्या बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो, त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो. असंच माणसाचं आहे... समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की आयुष्यात्ल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोड्वते.
- मृत्यु म्हणाला येऊ का ? मी म्हटलं आत्ताच ये... कायम एकटाच जगलो... तु तरी सोबतीला ये....
- चांगल्या गोष्टी त्याना लाभतात जे वाट बघतात. अधिक चांगल्या गोष्टी त्याना लाभतात जे प्रयत्न करतात. सर्वोत्तम गोष्टी त्याना लाभतात, जे आपल्या प्रयतनांवर अतूट विश्वास ठेवतात.
Saturday, 27 September 2008
Marathi Quote - Part-III
- पोरगी म्हणजे झुळूक, अंगावरुन जाते, अमाप सूख देऊन जाते, पण धरुन ठेवता येत नाही.
- शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. त्यातून तो बरा झाला की शिवलेली जखम तोच कौतूकानं दाखवत फ़िरतो.
- जाळायला काही नसले की पेटलेली काडेपेटी सुध्दा आपोआप विझते.
Marathi Kavita : अरे मझ्या मना...
अरे मझ्या मना,
अरे मझ्या मना,
कधितरी माझे ऐकना
अरे किती करशील विचार
झालेल्या गोष्टींचा
किती देशील दोष स्व:ताला
दुसर्यांच्य चूकांचा
किती भरकटशील आशेपोटी
पाठ भिरकवलेल्यांकडे
किती गाळशील आसवे तू
त्या पाशाण ह्रुदयांपूढे
किती समजएवशील त्याना
परत इथे यायला
किती मागशील माफ़ि
त्याचे मन राखयला
किती घालवशील तुझा आत्म-सन्मान
त्यांचा गर्व सांभाळायला
अरे माझ्या मना
सांग कसे थांबवू मी तुला?
का करतो आहेस प्रयत्न
परत तीच चूक करायला?
Friday, 26 September 2008
Marathi Quote - Part-II
- ज्याला गरज निर्माण होते त्याला ती एकदम लाचार, दुबळा बनवते. आणि जो ती गरज पुरवू शकतो त्याला ती अचाट सामर्थ्यवान आणि उद्दाम बनवते.
- कोणतही समर्थन मूळ दूःखाची हकालपट्टी करू शकत नाही. वर पट्टी बांधायची , ती जखम झाकण्यासाठी. आत जखम आहे, ती ज्याची त्याला ठसठसत असतेच.
- आठवणी मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारुळात पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास होत नाही पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग एक अशा असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणीचं ही तसंच आहे.
Marathi Kavita : आज या गुलाबी पहाटेला...
सखे आज या गुलाबी पहाटेला..
मला कशी काय जाग आली..
जणु माझ्या झोपेलाही..
तुझ्या भेटीची चाहूल लागली...
सारं काही नवीन घडतयं..
भावनेचं बीज अल्हाद अंकूरतयं..
अस भासत होतं अन उगाच
कुठेतरी स्वप्नील जग अस्तित्वात अवतरत होतं...
तुझ्या मनाची ती घाई.. अन काळजाची धकधक
माझ्या पावलांचा वेग वाढवत होती..
हलक्याश्या एका किंतूच्या भितीने..
कपाळावर जमा झाले घामाचे मोती..
अखेर तू समोर दिसलीस अन
डोळे स्तब्ध खरोखर स्तब्ध झाले..
तुझ्या सौंदर्याचे ते नक्षत्र पाहूनी..
शब्द माझे ओठांवरच निमाले..
तुझ्या डोळ्यातली चमक पाहून
मलाही जरासं बरं वाटलं
माझ कृष्णवर्णीय रूपांन
तुझ्या मनात छोटूसं घरकूल थाटलं..
एरव्ही भेटायच भेटायचं म्हणून
हट्ट करणारी अचानक अबोलीच फुल झालीस तु..
पापण्या झूकवून माझ्या समोरी..
मंद गतीने येऊनी उभी राहीलीस तू..
तुझ्या हनूवटीला माझ्या तर्जनीचा आधार..
खरोखर लाजवूनी गेला...
माझ्या डोळ्यात डोळे घालून बघण्याचा
एक प्रेमाचा राज सांगूनी गेला..
तुझा माझ्यावरचा विश्वास ,
चेहर्यावरच्या आंनदात चमकूनी गेला..
अन आपल्या ह्या भेटीचा हा सुगंध..
त्या अलवार मिठीत दरवळूनी गेला........
Thursday, 25 September 2008
Marathi Kavita : सखे
सखे,
तुझ्या आठवणीचा लहरी तो बेभान वारा.....
सखे, तुझ्या आठवणीचा
लहरी बेभान वारा
सडा सुखाचा दुज्या
अंगणात पाडुनी गेला...
सखे, तुझी नी माझी आता
फ़क्त स्वप्नातच भेट घडते
हे गुपित आपलं कुठुनतरी
कळलय वाटतं त्याला
तसं त्याचं नी माझ
आधीच पटत नव्ह्ते
म्हणुन कदाचीत हा
आजची रात्र जागवुनी गेला...
सखे, तुझ्या आठवणीचा
लहरी तो बेभान वारा
सडा सुखाचा दुज्या
अंगणात पाडुनी गेला...
सखे, का गं नेहमीच हा
वारा असा वेगात सुटतो
अंधा-या रात्रीस चमकता
तारा जसा नभात तुटतो
अगदी तसाच बघ हा
स्वप्न माझं तोडुनी गेला ...
सखे, तुझ्या आठवणीचा
लहरी बेभान वारा तो
सडा सुखाचा दुज्या
अंगणात पाडुनी गेला....
सखे, आज तु माझी
नाहीस तरी माझ्या
मनात तुझ्या प्रेमाचा दिवा
अजुनही तसाच तेवत राहतो
माझं तुझ्यावरचं प्रेम जणु काही
पहावत नाहीये त्याला
तु सोडुनी जात होतिस
तेव्हा मी रडलो नव्हतो
म्हणुन कदाचीत आज हा
मला रडवुनी गेला...
सखे, तो तेवता दिवा आज हा
वारा विझवुनी गेला...
सखे, तुझ्या आठवणीचा
लहरी तो बेभान वारा
सडा सुखाचा दुज्या
अंगणात पाडुनी गेला...
Marathi Quote - Part-I
- निर्णय चुकीचा आहे का योग्य आहे हे काळावर मोजायचं की बुद्धीवर? तुम्हाला बुद्धीच नसेल तर पेपर सोडवायला संपूर्ण तीन तास नव्हे तर अख्खा दिवस दिला तरी काय उपयोग ? आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो. फ़क्त वेळ वापरायला शिकत नाही.
- आयडेंटिटी कार्डासारखी विनोदी गोष्ट साऱ्या जगात नसेल. आपण आहोत कसे? हे खरं त्यांना हवं असतं. त्याऎवजी आपण दिसतो कसे ते पाहून ते आपल्याला ओळखतात.
- रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वॄंदावनातच रहाते. तिच्यापुढे आपल्याला उभंच रहावं लागतं.
Wednesday, 24 September 2008
Marathi Kavita : नाते
नाते तुझे हळुवार जपायचे,
आठवण आली की अलगद उमलायचे,
नको करूस अट्टाहास, सांग कधी भेटायचे,
दरवेळी मात्र मीच वीचारायचे, तु फक्त हो म्हणायचे,
सागं आठवण आली की काय करायचे?
मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे,
या वेडयामनाला कोन समजावयाचे?
सागं आठवण आली की काय करायचे?
तुझ्या जवळ बसले असता मनं कधी गप्पा मारायचे.
मनातले हे बोल सांग कधी कळायचे?
सागं आठवण आली की काय करायचे?
नाही भेटले की डोळे अलगद ओले करायचे,
सैर वैर झालेल्या मनाला गप्प मात्र मीच करायचे,
येऊन घेशील मिठीत असे मीच म्हणायचे,
सागं आठवण आली की काय करायचे?
फोन मात्र मीच करायचं,
H.....R... U मत्र तू बोलायचे,
तु दिसला की डोळे भरुण पहायचे,
ऊघडले डोळे की ते मत्र स्वपनच ठरायचे,
सागं आठवण आली की काय करायचे?.......
Marathi Kavita : एक स्वैर नभ
एक स्वैर नभ काल माझ्याकडे आला होता,
काय जाणे माझा पत्ता
त्याने कुठुन मिळवला होता
आकाशातल्या विजेवरती
त्याचा जिव जडला होता
एक स्वैर नभ काल माझ्याकडे आला होता.
तिच्या मोहक स्वैर वावरावर
तो फ़िदा झाला होता
वाहत्या वा-याची BMW घेऊन
तो धरतीवर पोहोचला होता
एक स्वैर नभ काल माझ्याकडे आला होता.
बसला तो माझ्याशेजारी अन
मनातली गुपीते सांगत होता
हळुच आठवुन त्या सौदामिनीला
डोळ्यांतुन टिपे गाळत होता
एक स्वैर नभ काल माझ्याकडे आला होता
बनला दुत कालीदासाचा निरोप पोहोचवण्यासाठी
पण आता हतबल झाला होता
त्या दामीनीचा पत्ता
त्याला कुठे माहीत होता
एक स्वैर नभ काल माझ्याकडे आला होता
शेवटी मी सांगीतला ठावठिकाणा तिचा
तो अल्लड पोरासारखा हसला होता
गेला निघुन आला तसाच
त्यांचा मिलनाचा सोहळा मात्र
मी पाऊस पडताना पाहीला होता
एक स्वैर नभ काल माझ्याकडे आला होता
एक स्वैर नभ काल माझ्याकडे आला होता
Marathi Kavita : मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही...
कधी मी वारयाची झुलूक असते
तर कधी बेफाम वारा असते
कधी मी पावसाची हलकी सर असते
तर कधी समुद्रची लाट असते
कधी मी डोलनारे कणिस असते
तर कधी खम्बिर तरु असते
कधी मी शांत नदी असते
तर कधी भिरभिर्नारे फूलपाखरू असते
मी तो सुर आहे
जो मनाला दिलासा देतो,
तर कधी हुरहुर लावतो
बस आणि काय सांगू
सगलच लिहिता येत नाही
म्हनून म्हणते
मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही...
Monday, 22 September 2008
Marathi Joke : शंभू
खेड्यातून आलेला शंभू आपल्या बायकोला घेउन दावाखान्यात आला, तिची पाठ दुखीची ट्रॅकार होती. डॉक्टोर ने तिला तपासून प्रीस्क्रिपशन लिहिले कागद शंभू कडे दिला आणि बोलले की "घरी गेल्या बायकोच्या पाठीला चोळा" थोड्या वेळने शंभू परत आल आणि म्हणाला "पण डॉक्टोर कुठल्या बाजूने चोळु , लिहिलेल्या की कोरया ?"
Marathi Kavita : सवत माझी लाडकी
माझी कविता आता माझी सवत झालीय,
कारण ती आता त्याला,
माझ्यापेक्षा आवडू लागलीय.
तो नेहमी म्हणतो,
"राणी, माझ्यावर तू कविता कर,
कवितेतून बरस माझ्यावर,
कवितेतूनच प्रेम कर."
माझा प्रश्न,
"राजा, फक्त तू एकदाच ठरव,
तुला मी आवडते की कविता?
याचं तू कोड सोडवं."
यावर त्याचं उत्तर,
"अग, तुच माझी कविता,
अन् तुच माझं गाणं;
तुझ्या सोबत आता,
फक्त तुझ्या कवितेतच जगणं."
खरचं, कळत नाही याला,
कवितेचं कसलं वेड लागलयं????
माझीच कविता आता
माझी सवत झालीय.
त्यादिवशी ,
त्यादिवशी तर कहरच झाला,
मला प्रेमाने जवळ घेत म्हणाला,
"मीही एक कविता केलीय,
आपल्या प्रेमाची गाथा मी, कवितेतूनच गायलीय."
खुशीने डोळे मिटून,
त्याच्या छातीवर डोकं ठेवलं,
तेवढ्यात त्याच्या खिशात
काहीतरी चौकोनी लागलं.
"तुझ्याच कवितांची वही,
राणी, मी माझ्या हृदयाजवळ ठेवलीय,
तुझ्याच कवितेतले शब्द चोरून,
आपली प्रेमकविता मी केलीय"
यावर उपाय म्हणून
मी आता कविता करत नाही,
पण तोही आता माझ्याशी,
कवितेशिवाय बोलत नाही.
नको नको त्या कल्पनेतून
कवितेतून तो बरसू लागलाय,
त्याच्या कवितेचा अर्थ लावताना
स्वर माझा बिघडू लागलाय.
पण तरीही,
त्याच्या कविता ऐकण्याची
आता मला सवय झालीय,
आता त्याच्या कवितेची
माझ्या कवितेशी मैत्री झालीय.
Sunday, 21 September 2008
Marathi Kavita : शेवटची भेट
आज तुला शेवटची भेटायला आलेय.तुझ्या मैत्रीच्या सर्व आठवणींचीआज मी समग्र मूर्ती झालेय.आज तुला शेवटची भेटायला आलेय.हो रे! कुणाला न सांगता, लपुन छपुन.तुझ्याशी भेटण्याचं मनात आलंआणि तडक आलेय निघून.हो रे! कुणाला न सांगता, लपुन छपुन.
या नंतर असे येता येणार नाही.
संसाराची गाडी ओढताना
हे समजून घ्यावे लागेल तुलाही.
या नंतर असे येता येणार नाही.
मैत्रिणीची आठवण ठेवशील ना?
दोघेही व्यवहारात रमल्यावर
माझी विचारपूस करशील ना?
मैत्रिणीची आठवण ठेवशील ना?
ही माझ्या लग्नाची पत्रिका.
चार दिवसांनी तुझी बायको झाल्यावर
आतल्या मैत्रिणीला विसरायचं नाही बरका!
ही माझ्या लग्नाची पत्रिका.
Friday, 19 September 2008
Marathi Kavita : आता तरी कळू दे
आता तरी कळू दे ,
तुझेच भास सारे,
शब्दातूनी वहाते,
नियमातली कथारे.
तो रंग शारदेचा ,
माझा कधी न तीचा.
आकाश गुंतलेले
ते सागरी किनारे.
कोणास काय सांगू
मौनात मन मागू .
तुलाच शोधतांना
सभोवात रांगणारे..
आता तरी कळू दे
आसवाचे थेंब सारे ,
माझ्याच पावलात
मलाच बोचणारे
Thursday, 18 September 2008
Marathi Kavita : दिवस अखेरचा...
आज अखेर तो दिवस आला
भेटणार शेवटचे प्रत्येकाला...
ओठावर होते
प्रत्येकाच्याच हसु...
डोळ्यात मात्र भरलेले
काठोकाठ अश्रु...
कुणी
झालेल्या चुकांची माफ़ी मागत होता..
तर कुणी
केलेल्या मजा-मस्तीची उजळणी करत होता...
आठवत होता प्रत्येकजण
क्षण आणि क्षण...
ते कॅन्टीन मधे बसणं,
लेकचर बंक करणं,
सिनेमाला जाणं
नाहितर कॉलेजबाहेरच्या कट्ट्यावर बसून
टाईमपास मरणं...
किती पटकन
सारं काही बदललं..
३-४ वर्ष निघुन गेली
हे आजच कळलं...
व्हॅलेंटाईन डे अन फ़्रेन्डशिप डे
येतील अजुनही
पण मजा नसेल आज नंतर
त्याला तशी....
कितितरी आज इथे ह्या जागी सोडून
जावं लागणार...
रोज सोबत राहणारे मित्र-मैत्रिणी
आता कधीतरीच भेटणार....
प्रत्येक जण आजचा हा दिवस जगून घेत होता
कारण आज कॉलेजचा शेवटचा दिवस होता....
Wednesday, 17 September 2008
Marathi Kavita : त्यात वाहुन जात गेलो
कल्पना होती तशी ती
पण सुचाया लागलेली
मी तरी कैसा अखेरी ?
त्यात वाहुन जात गेलो
कल्पनेतुन आज कैसा
नुर फुलला भावनांचा
अन कविता होत गेली
त्यात वाहुन जात गेलो
कल्पनेला पंख फुटले
शब्द झाले सखे सोबत
का नव्याने पुर आला
त्यात वाहुन जात गेलो
-
संतोष (कवितेतला) 9850958163
Tuesday, 16 September 2008
Marathi Kavita : माणीक-मोती...
बरेचदा डोके खाजवुन देखील
कविता नावाची गोम काही सुचत नाही
मग उगाच कागद रंगवल्या सारखा
पांढऱ्याचा काळा करीत रहायचा
एखादवेळेस तेही जात जमुन
पण नेहमीचा विरोधाभास मात्र वेगळाच असतो..
कविता काही डोक्यातुन झिरपत नसते..
ती काळजात उगम पावते आणी कागदावर अस्त
परंतु हे अस काही म्हटल तर त्यालाही कविता समजतात लोक
मग मात्र माझी समजवणुक मीच घालत बसतो
शब्दांनी आणी जुळणाऱ्या न जुळणाऱ्या यमकांनी
परंतु अश्या विरोधाभासातली रचना काही औरच होऊन जाते
आणी कागदावर उमटतात
माणीक-मोती..
-
संतोष (कवितेतला) 9850958163
Monday, 15 September 2008
Marathi Kavita : कारण शेवटी मी एक.....
आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात
शाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात
सध्या काम कमी अन् वेळ भरपूर
कंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करून
काय करणार सध्या बेंच वर आहे
कारण शेवटी मी एक Product Engineer आहे
दिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो
कंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतो
चार-चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला पण माझ्या
कॉलेज canteenच्या कटींगची सर नाही त्याला
कंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहे
कारण शेवटी मी एक Product Engineer आहे
कट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्या
A\C Coneference roomsमध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्या
टीम-मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवली
पक्या, अज्या, रघूची जागा आता मूर्थी, कृष्णन आणि रेवतीने घेतली
ODCमध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहे
कारण शेवटी मी एक Product Engineer आहे
सुरुवातीला खूप फोन SMS व्हायचे
कोण कुठे काय करतोय लगोलग कळायचे
आजकाल जो-तो projectमध्ये बिझी ज़ालाय
भुला भटका missed call आता महाग झालाय
forwards आणि chain mailsमध्ये खुषालीची मैल शोधतो आहे
कारण शेवटी मी एक Product Engineer आहे
दर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातो
दीड-दमडीच्या मुव्हीसाठी शे-दीडशे मोजतो
सेलेब्रेशन्स,पार्टीज साठी pizza hutchaचा रस्ता गाठतो
vegie crust, paporonie कसले कसले फ्लेवर्स मागवतो
पण pocket moneyसाठवून केलेल्या partyची मजा ह्यात शोधत आहे
कारण शेवटी मी एक Product Engineer आहे
रोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतो
एकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो
"आता कधी येशील?" असे आई रोज विचारते
बाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवते
करियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहे
कारण शेवटी मी एक Product Engineer आहे
खरच सारे काही गेलेय आता बदलून
एका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडून
कधीतरी तो दिवस येईल
officeमधून थेट मी माझ्या घरी जाईन
पण मला माहितेय हे एक स्वप्न आहे
कारण शेवटी मी एक.....
Sunday, 14 September 2008
Marathi Kavita : ...प्रेम आहे ?
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते,
तर हे प्रेम नाही हा तर मोह...!
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिच्या स्पर्शाशिवाय राहू शकत नाही,
तर हे प्रेम नाही ही तर वासना...!
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिला सोडू शकत नाही असा विचार करून की तिच्या भावना दुखावतिल,
तर हे प्रेम नाही ही तर तडजोड...!
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तुम्ही तिच्यापासून काही लपवत नाही तिला सर्व काही सांगतात, तुमचे सर्व अनुभव वाटतात,
तर हे प्रेम नाही ही तर मैत्री...!
जर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगत...आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो...,
तर ते आहे प्रेम...!
जर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता...,
तर ते आहे प्रेम...!
जरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणि तुम्ही त्याला बदलण्याचा विचारही करत नाही, तिला जसेच्या तसे स्विकारता...,
तर ते आहे प्रेम....!
जर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता पण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही
आणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल...,
तर ते आहे प्रेम...!
Saturday, 13 September 2008
Marathi Kavita : सारे काही अजब आहे.
हजारो स्क्वेर फ़िटच्या घरात
आई-बापाला एक कोणाही मिळत नाही
हे 21व्या शतकातील गणित
आपल्याला कळत नाही
फ़ेशनच्या या दुनियेत
जो-तो नविन कल्पना साकारतोय
आपलं शरीर झाकायला
कमी कपडे वापरतोय!
लव्ह मेरेज, डिव्हार्स
हा तर हाताचा मळ झालाय
दोन-चार जोडप्यांमागे
एकाने तरी हा प्रकार केलाय
21व्या शतकातल्या पोरी
पायलट, मोटर वुमन ही बनतात
दांडिया-गरबा, रास करुन
नाबालिक माता सुध्दा होतात
मिनरल वाटर, कोक, बियर पुढं
ओढ्याचं पाणी, लिंबु सरबत फ़िके पडतात
भेसळ, पेस्टिज, अल्कोहल मुळे
आपलीच शरीरं सडतात
आयटम सोंगच्या युगात
भक्ति गीतांना काय किंमत
आयटम गर्ल सारख *** नाचायची
मेनकाला तरी होईल का हिंमत?
जनतेचे सेवक नेते
जनतेचाच गळा कापतात
तरीही पुढल्या निवडणुकीत
जनतेची मते मिळवतात
भ्रष्टाचार, गुंडगिरी, फ़सवणुक
यांच्याशिच आता सोयरीक आहे
आशा या नवयुगात
सारे काही अजब आहे
Friday, 12 September 2008
Marathi Kavita : माझी ती...
माझी ती
चांदण्यात राहते
अंबरात विहरते
सागरात तरते
मॊ बोलावतो तिला.
तर मान वेळावून पाहते
कधी हसत येते
कधी रुसत येते
कधी.. रडत येते
कधी चिडत येते
कधी कधी
गालावर घेऊन रर्क्तिमा
चक्क लाजत येते..
वेडावतो, मी खुळावतो
लाजताना पाहताना
हळुच मी खुणावतो
कवितेला जागेपणी
स्वप्न दे… विनवतो !!
Thursday, 11 September 2008
Marathi Kavita : प्रेम बोला…..
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला…..
हसू तिचे सुखी मी
उदास ती बेचैन मी
दु:ख तिला यातना मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला
संग तिचा बेधुन्द मी
स्पर्श तिचा रोमांचीत मी
विरह तिचा मारतो मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला
नजर तिची घायाळ मी
बोल तिचे प्रसन्न मी
अबोला तिचा छळतो मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला
अश्रू तिचे कष्टी मी
राग तिचा अपराधी मी
मनातले तिच्या कळते मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला…..
Wednesday, 10 September 2008
Marathi Kavita:रेशीम गाठी
विदेशी कपडे घातले तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहेत
पिझा, बर्गर खाल्ल्यावरही
पोट पुरणपोळीच मागतं
ईंग्रजी पुस्तकं वाचली तरी
मन मराठी चारोळीच मागतं
मात्रुभूमि सोडली की
आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं
भाषा सोडली की
अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं
वडाची झाडं मोठी होऊनही
परत मात्रुभूमिकडे झुकतात
कितीही दूर गेलं तरी
पाय परत मात्रुभूमिकडेच वळतात
काहीही बदललं तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी
Tuesday, 9 September 2008
Marathi Kavita : तू अशी ये !!!
प्रिये,
तू अशी ये…
श्वासातल, भासातल
तुझ्या माझ्या भानातल
वा-याच गीत हलक
ओठामधे घेऊन ये
जाईतला, जुईतला
गंध माझ्या मनातला
लहरीचा धूंद सुगंध
हसण्यामधे भरून ये
सरीतला, दरीतला
थेंब माझ्या डोळ्यातला
सुखाचा एक आसू
जगण्यामधे पेरून ये
Marathi Kavita : तु होशील का?
मार्ग माझे खुंटलेले
दिशा तु होशील का?
स्पर्श माझे वाळलेले
चेतना तु होशील का?
डॊळे माझे भरुनी आले
फक्त अश्रु तु होशील का?
ह्रिदय माझे थांबलेले
स्पंदने तु तयाची होशील का?
बिंब माझे विस्कटलेले
प्रतिबिंब तु माझे होशील का?
सुर माझे हरवलेले
जिवन गाणे माझे तु गाशील का?
एकटाच आहे मी
मज साथ तु देशील का ?
गुलाब माझा सुकलेला
तरिही सुंगध तु त्याच होशील का?
सांग प्रिये सांग तु होशील का
ह्या वेड्याजिवाला आपलसं करशील का?
आता खरोखरी शब्द माझे संपलेले
म्हणूनी माझी कविता तरी तु होशील का?
Marathi Kavita : या मुलांच्या चालूगिरी
"मुलांच्या चालूगिरीची काय वर्णांवी गाथा…."
या मुलांच्या चालूगिरीची
काय वर्णांवी गाथा….
तडतडते शीर नि
ठणठणतो माथा…
बोलशील का माझ्याशी
आवडतेस मला खूप…
डोके फिरले का तुझे?
कहाँ बारिशमें निकली धूप..
तुझे नाव कोरले मनात
तूच सर्वांहून खास…
जागा हो आधी
तुझे हे निव्वळ भास…
इंप्रेशन मग पाडायला
केल्या कविता पेस्ट…
ओळखीच्याच कविता-कवी
सगळीच मेहनत वेस्ट….
थांब म्हटलं जरा
वेगळ्या आपल्या वाटा….
म्हणे तू असा नको
विषयाला देऊ फाटा….
तुझ्याशिवाय जगायचं?
जमणारच नाही मला….
न जमायला काय झालं
ओपशन्स आहेत
Saturday, 6 September 2008
Marathi Kavita : ती एकदा ........
ती एकदा आजीला म्हणाली
मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?
आपली माणसं सोडून तीनेच का
परक घर आपलं मानायचं?
तिच्याकडुनच का अपेक्षा
जुनं अस्तित्व विसरायची
तीच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव वापरायची?
आजी म्हणाली अगं वेडे
हा तर सृष्टीचा नियम आहे
नदी नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून
तो येतो का कधितरी तिच्याकडे
आपली वाट मोडून
तीच पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळते
आपलं अस्तित्व सोडून ती
त्याचीच बनुन जाते
एकदा सागरात विलीन झाल्यावर
तीही सागरच तर होते
पण म्हणुन नेहमी तिच्यापुढेच
नतमस्तक होतात लोकं
पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातात लोकं.......
Marathi Kavita : तो मीच असेल...........
आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल..!
माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल..!
कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल..!
कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल..!
Friday, 5 September 2008
Tuesday, 2 September 2008
Marathi Kavita : आई..... ( Mother )
पहिला शब्द जो मी उच्चारला,
पहिला घास जीने मला भरवला,
हाताचे बोट पकडून जीने मला चालवले,
आजारी असताना जीने रात्रंदिवस काढले.
आठवतय मला,
चूकल्यावर धपाटा घातलेला,
भूक लागली आहे सांगताच,
खाऊचा डब्बा पुढे केलेला.
अनेकदा तिने,
जेवणासाठि थांबायचे,
आणि मी मात्र न सांगताच,
बाहेरून खाऊन यायचे.
कधी कधी रागाच्या भरात,
उलटहि बोललोय,
आणि मग चूक समजल्यावर,
ढसा ढसा रडलोय.
तिने सुद्धा माझे बोलणे,
कधीच मनावर नाहि घेतले,
मागाहून घालवलेले माझे अश्रू,
पदराने पुसून टाकले.
माझी स्तुती करताना,
ती कधीच थांबत नाहि,
अन माझा मोठेपणा सांगतान ,
तिच्या आनंदाला पारावर ऊरत नाहि.
माझा विचार करणे,
तिने कधिच सोडले नाहि,
माझ्यावर प्रेम करण्याला,
कधीच अंत नाही.
मी सुद्धा ठरवले आहे,
तिला नेहमी खुश ठेवायचे,
कितीहि काहि झाले तरी,
तिला नाहि दुखवायचे.
आईची महानता सांगायला,
शब्द कधीच पूरणार नाहि,
तिचे उपकार फ़ेडायला,
सात जन्म सुद्धा शक्य नाहि.
देवाकडे एकच मागणे,
भरपूर आयुश्य लाभो तिला,
माझ्या प्रत्येक जन्मी,
तिचाच गर्भ दे मजला.
Marathi Kavita : माझी कविता हरवली आहे ( I lost my Poem)
माझी कविता हरवली आहे
सांगा ना मला
देईल का कोणी शोधून
अहो माझी कविता हरवली आहे
याहू गृपच्या गोधळामध्ये
इतत्र पोहचली आहे
नाव 'कविता'च आहे पण
पत्ता माझा विसरली आहे
सांगा ना या स-हृदयी समाजात
माझी कविता कुठे असेल
तशी दिसायला निटस आहे
पण तीच तर काळजी आहे
सांगा ना मला
देईल का कोणी शोधून
अहो माझी कविता हरवली आहे
कदाचीत दूसर्याचा पत्ता लाऊन
पीळवणूक होत असेल तीची
का चिरफाड होउन कुठे पडली असेल खितपत
असे विचार मनात येवून पुन्हा
खुप यातना होत आहेत
सांगा ना मला
माझी कविता हरवली आहे
देईल का कोणी शोधून
अहो माझी कविता हरवली आहे
Marathi Kavita : आता "संसार" हीच कविता झालीये रे...
मला आठवतात तिच्या सुरुवातीच्या कविता...
प्रेमाने फुललेल्या, आणी प्रत्येक खेपेस
नव्याने ओथंबलेल्या
कधी त्यात ती पुर्ण बुडुन जायची
मागे उरायची ती फक्त एक सालस कविता
काही शब्द उराशी कवटाळुन ती कविता फुलत रहायची
जाई-जुई सारखी...
तिला विषय लागायचाच नाही कोणता...
अगदी पाऊस असो किंवा काळा दगड
ती कशावर देखील तितक्याच सहजतेने लिहीत जायची
शब्द तर जणु गुलामच होते तिचे
ती वळवेन तसे वळत रहायचे आणी
मागे उरायची ती फक्त एक सालस कविता
मग एक दिवस त्या कवियेत्रीला एक गीतकार मिळाला
तिच्या शब्दांना नव्याने अर्थ येउ लागला
अता तिवी कविता फक्त सालस राहिली नव्हती
त्या कवितेला मंजुळ पंख फुटले होते
तिची कविता नाचु लागली होती, बागडु लागली होती
अखेर व्हायच तेच झालं
लग्न नावाचा साक्षात्कार...
आता प्रकरण गंभीर आहे
तिला कविता तर सुचतात, पण फोडणीच्या
तडका दिलेल्या आमटीच्या
आणी कधी कधी तर करपलेल्या भाताच्या देखील
फरक तसा काहीच नाही...
तिला तसाही विषय काही लागतच नाही...
सकाळी सार आटोपुन ऑफीसला पोहोचली
की तिला वेळच मिळत नाही कविता वगैरे करायला
मग संध्याकाळची घरी पोहोचली की
त्या संगीतकाराच्या प्रेमात ती ईतकी बुडुन जाते
की तिला वेळच मिळत नाही कविता वगैरे करायला
आणी मी कधी विचारल तर म्हणते...
आता "संसार" हीच कविता झालीये रे...
[ एका लग्न झालेल्या कवी मैत्रीणीला समर्पीत ]
-
संतोष (कवितेतला) ९८५०९५८१६३
Monday, 1 September 2008
Marathi Kavita : आता आम्ही दोघेही भिजतॊ आहोत...
ऑफीसवरुन घरी निघायची वेळ
सगळेच अगदी घाईला टेकलेले,
आणी अचानक पाऊस बरसु लागला
त्याचे दिवसच आहेत म्हणजे तो बरसणारच...
पण असा अचानक ??
इतक्यात "ती" दिसली
आणी वीज कडाडली,
त्या क्षणभाराच्या प्रकाशात जणु परीच भासली
पाऊस तिच्या गालांवर अगदी थैमान घालत होता
ती मात्र त्याला साधा विरोधही करु शकत नव्हती
क्षणभर माझाही जळफळाट झाला...
तिने माझ्याकडे पाहिलं...
आणी पुन्हा एक वीज कडाडली
पण आभाळात नाही, हॄदयात...
ती जवळ आली
मी छत्रीत होतो, पण काय करु सुचेना...
एक मन म्हणतयं, तिला छत्रीत घ्यावं...
आणी दुसर ओरडतयं, तिच्या सोबत भिजावं...
"ती" मात्र असाच एक प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर घेऊन अजुन भिजतेच आहे...
अखेरी वाराच पडला मधे...
आणी माझ्या हातची छत्री हिसकावुन घेऊन गेला...
आता आम्ही दोघेही भिजतॊ आहोत...
ती पावसात आणी मी तिच्या भिजणाऱ्या रुपात ...
-
संतोष
Subscribe to:
Posts (Atom)
