यशाची रोशनि , कीर्तीचे अभ्याणग्या स्नान, मनाचे लक्ष्मी पूजन, समाधानाचे फराळ, प्रेमाची भूबीज अशा या मंगल प्रसंगी तुम्हाला दिवळिच्या हार्दिक शुभेच्छया...
Tuesday, 28 October 2008
दिवळिच्या हार्दिक शुभेच्छया
Sunday, 26 October 2008
Marathi Kavita : मन...
मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर
किती हाकलं हाकलं
फिरी येते पिकावर
मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आता व्हत भुइवर
गेल गेल आभायात
मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन
उंडारल उंडारल
जस वारा वाहादन
मन जह्यरी जह्यरी
याच न्यार रे तन्तर
आरे इचू साप बरा
त्याले उतारे मन्तर
मन एव्हड एव्हड
जस खसखसच दान
मन केवढ केवढ
आभायतबि मावेन
देवा आस कस मन
आस कस रे घडल
कुठे जागेपनी तुले
अस सपन पडल
Saturday, 25 October 2008
Marathi Kavita : श्रवाण मासि
श्रवाण मासि हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे
वरति बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे
झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे उन पडे
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते
फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे
सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला
सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती
देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत
Friday, 24 October 2008
Marathi Kavita : झुळझुळ मैत्रीच पाणी
उगम हा मनातला,
त्याचे मनमस्त तुषार
उडवित निघालय,
उधळत, खिदळत,
आदळत, खळखळत
भिजावायला प्रत्येकाला.........
एक ओलावा.......
एक भीज...........
जणू खांद्यावरील
मायेची नीज
चिंब गोडव्यात
विरघळलेली ही
खास चीज
एक थेंब
निथळलेला
अळवावरचा,
हिरवळिचा गालीचा
माळावरचा........
त्याची मनमुराद अल्लड गाणी
खेळावा, रुजवा आपल्या मनी,
काय म्हणता ??
भिजायच कुणी ??
आहे भिजायच ज्याच्या मनी
त्याला भिजवेल
हे झुळझुळ मैत्रीच पाणी
Marathi Kavita : खरे मित्र
आज पहाटे जेव्हा माझे डोळे उघडले
मला न कलले का मग माझे मन गोंधलले
उठता जेव्हा पाऊलात मग मी अड़ खलले
न जाने कुणी हात देऊनी मज सावरले
अघटित काही घडते आहे का मला भासले ?
मार्गी चालता डोळ्यां पुढे ते धुके दाटले
बाहेर येऊनी जे दृश्य पाहिले सुंदर काही
मज वर्णाया शब्द ही आता स्मरतच नाहीत
बाग़ ती माझीच होती
अंगनी माझ्याच फुलली
घातले शब्दांचे दाने
ओतले अश्रुंचे पानी
ख़त ते होते विश्वासाचे
किरणे होती भावनांची
रुजले रोप बागेत माझ्या
नाव त्याचे काय सांगू
तुझ्याच मैत्रीचे ते रोप
काय त्याचा बहर सांगू
फूले पड़ती आनंदाची
सावली ती आधाराची
सुगंध तो उल्हासाचा
सल्सलती पाने चैतन्याची
हात ते होते तुझेच
ज्यांनी मला सावरले ते
नकलले मलाच माझे
शब्द हे स्फुरले कसे ते
मैत्रीची ही शिदोरी आपुल्या साठीच असते
ओलखावे खरे मित्र ही एक कसोटिच असते
Thursday, 23 October 2008
Marathi Kavita : या बाळांनो
या बाळांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !
मजा करा रे मजा करा !
आज दिवस तुमचा समजा
स्वस्थ बसे तोचि फसे;
नवभूमी दाविन मी,
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया !
खळखळ मंजुळ गाति झरे,
गीत मधुर चहुबाजु भरे
जिकडे तिकडे फुले फळे,
सुवास पसरे, रसहि गळे.
पर ज्यांचे सोन्याचे
ते रावे, हेरावे.
तर मग कामे टाकुनिया
नवी बघा या ही दुनिया !
पंख पाचुचे मोरांना,
टिपति पाखरे मोत्यांना,
पंख फडकती घोड्यांना,
मौज दिसे ही थोड्यांना.
चपलगती हरिण किती !
देखावे, देखावे.
तर मग लवकर धावुनिया
नवी बघा या ही दुनिया !
Marathi Kavita : आहे एक वेडी मुलगी....!
आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला
सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?
आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,
माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?
तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!
माहित आहे तिला, आहे मी खुप shy,
एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY?
''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,
आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ!
Marathi Kavita : डाव मोडू नको ...
डाव मांडुन भांडून मोडू नको
आणले तू तुझे सर्व मी आणले
सर्व काही मनासारखे मांडले
तूच सारे तुझे दूर ओढू नको
डाव मोडू नको ...
सोडले मी तुझ्या भोवती सर्व गे
चंद्र ज्योती रसाचे रुपेरी फुगे
फुंकरीने फुगा हाय फोडू नको
डाव मोडू नको ...
गोकुळीचा सखा तूच केले मला
कौतुकाने मला हार तू घातला
हार हासून घालून तोडू नको
डाव मोडू नको ...
काढले मी तुझे नाव तू देखिले
आणि माझे पुढे नाव तू रेखिले
तूच वाचून लाजून खोडू नको
डाव मोडू नको ...
Wednesday, 22 October 2008
Thursday, 16 October 2008
Marathi Kavita : आयुष्याच्या वाटेवर...
आयुष्याच्या वाटेवर,
मी आता मागे वळून पहात नाही
कारण मागे वळून पहाण्यासारखे,
खरंच काही उरले नाही......
वळणावर!!!!!!!!!
या वळणावर निघुन गेलीस,
म्हणून मी थांबणार नाही
कारण मला माहीत आहे की,
पुढच्या वळणावर तु भेटल्याशिवाय राहणार नाही.......
चाललो मी......
वाट बघुन त्रासलो आहे ,
डोळ्यात प्राण आणून थकलो मी
येणार आहेस का नक्की सांग,
नाहीतर हा चाललो मी......
मनातले भाव ......
मनातले भाव ओठांवर नाही आले,
म्हणून लेखणीवाटे कवितेत उतरवले
पण सर्व व्यर्थ गेले,
कारण त्यातले भाव तुला कधी ना उमगले....
एकदातरी तुला अडवणार आहे...
जायची म्हणून जाऊ द्यायचे का?
निघाली म्हणून निरोप द्यायचा का?
माझंही काही कर्तव्य आहे
ते मी करणार आहे
जायच्या आधी एकदातरी तुला अडवणार आहे...
आतापर्यंत ......
आतापर्यंत हेच म्हणालो की
आता झालं - गेलं जाउ देत..
पण आता मी तसं म्हणणार नाही
कारण त्याने आता काहीच साध्य होणार नाही....
मी तयार आहे......
प्रयत्न करायला मी तयार आहे
मैदानात उतरायलाही तयार आहे
पण हार आधीच निश्चित असेल
तर मैदानात उतरायची तरी काय गरज आहे????
मजा....
कुणितरी ऐकतयं म्हणुन
Wednesday, 15 October 2008
Marathi Kavita : चांदण्यात फिरताना
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
सखया रे आवर ही सावर ही चांदरात
निजलेल्या गावातून आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच
या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात
सांग कशी तुजविणाच पार करु पुनवपूर
तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात
जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून
पण माझी तुळस तिथे गेली हिरमसून
तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात
Marathi Kavita : चिंब पावसानं ...
चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली, चांदण गोंदणी
झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रुपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी
राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी
तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी
अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता न येई काही साजणा बोलांनी
Marathi Kavita : सागरा, प्राण तळमळला ...
ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन
विश्र्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
सागरा, प्राण तळमळला ...
शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी
भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला ...
नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा
प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला ...
या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्ल भूमी ते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासना ते देती
तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला ...
Marathi Kavita : सुख म्हणावे लागले...
भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले
ठेविले आजन्म डोळे, आपुले मी कोरडे
पण दुजांच्या आसवांनी, मज भिजावे लागले
लोक भेटायास आले, काढत्या पायासवे
अन अखेरी कुशल माझे, मज पुसावे लागले
गवसला नाहीच मजला, चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले
एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले
Marathi Kavita : अरुणोदय झाला...
शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला
शिवप्रभूची नजर फिरे अन उठे मुलूख सारा
दिशादिशां भेदीत धावल्या खङगाच्या धारा
हे तूफान स्वातंत्र्याचे, ये उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र वीजांचे
काळोखाचे तट कोसळले, चिरा चिरा ढळला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला
कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान
जळल्या रानातूनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला, घडाचौघडा झडे
शिंगाच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे, हे संजीवन प्राणांचे
हे रुप शक्ति-युक्तिचे
हा तेजाचा झोत उफाळून, सृष्टितून आला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला
गंगा सिंधू, यमुना गोदा कलशातून आल्या
शिवरायाला स्नान घालूनी धन्य धन्य झाल्या
धीमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातूनी उमटला हर्षे जयजयकार
प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस
सिंहासनाधिश्वर महाराजाधीराज शिवछत्रपती महाराज
शिवछत्रपतींचा जय हो, श्रीजगदंबेचा जय हो
ह्या भरतभूमीचा जय हो
जयजयकारातूनी उजळल्या शतकांच्या माला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला
Marathi Kavita : तुझ्या मैत्रीची सावली....
सावली...
तुझ्या चेहऱ्याची सदैव दिसे नजरेत मला
सावली...
तुझ्या शब्दांची सदैव आठवे भुतकाळ मला
सावली...
तुझ्या हाताच्या स्पर्शाची सदैव जाणवे खांद्यावर मला
सावली...
तुझ्या एका हाकेची सदैव धिर दीई मला
सावली...
तुझ्या हास्याची सदैव हसवी मला
सावली...
तुझ्या सुखाची सदैव आनंदात ठेवी मला
सावली...
तुझ्या दुःखाची सदैव अश्रु देई मला
सावली...
तुझ्या अस्तित्वाची सदैव सोबत नेई दुर मला....
आनंदाचे सारे क्षण एकमेकांकडे हसत बघताना
आयुष्यातले सारे क्षण तुझ्या मैत्रीच्या सावली सोबत जगताना....
Tuesday, 14 October 2008
Marathi Kavita : अवघड आहे...
अवघड आहे एखादा निर्णय घेणं......
जिवनाचे गणित सहजपणे सोडवणं......
कशाची आठवण ठेवायचीये
कुठली गोष्ट विसरायचीये
कोणाला मनातलं सांगायचाय
कोणापासुन सगळ लपवायचय
अवघड आहे एखादा निर्णय घेणं......
जिवनाचे गणित सहजपणे सोडवणं......
कधी आवाज द्यायचा
कधी निशब्द व्हायचय
कधी रडता रडता हसणं
तर कधी हसता हसता रडणं
अवघड आहे एखादा निर्णय घेणं......
जिवनाचे गणित सहजपणे सोडवणं......
कुठे मार्ग बदलायचाय
कुठुन आल्यापावली परतायचय
अवघड आहे एखादा निर्णय घेणं......
जिवनाचे गणित सहजपणे सोडवणं......
Sunday, 12 October 2008
Marathi Kavita : हसता हसता
हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही
मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही
जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही
Saturday, 11 October 2008
Marathi Kavita : एक तरी जोडीदार...
आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!
एकमेकांना, दिलेल्या दुःखांवर
एकमेकांसोबत, घालवलेल्या
अनेक आनंदी क्षणांचा, लेप लावण्यासाठी..
आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!
अनेक जुन्या, आठवणींनी आणलेले
एकमेकांच्या, डोळ्यातील आनंदाश्रु पुसण्यासाठी…..
आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
आयुष्यात पुढे येणारया, अनेक दुःखी क्षणांच्या वेळी
एकमेकांच्या हातात, चेहरा लपवून मनसोक्त रडण्यासाठी!
आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!
प्रत्येक दुःखी, क्षणानंतर येणारया आनंदी क्षणात
एकमेकांचा, हात धरण्यासाठी एकमेकाला, सावरण्यासाठी…………
आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच
Friday, 10 October 2008
Marathi Kavita : खुप दिवसानंतर
खुप दिवसानंतर आज तुझा आवाज ऐकला,
तो गोड आवाज ऐकुन श्वासही क्षणभर थांबला,
मनातील विचारांचा जमाव थोडासा पांगला,
तुझ्याशी बोलताना वाटले, एकटेपणा संपला!
तोच आवाज, तीच वाक्य, तीच बोलण्याचे शैली,
जशी वेगवेगळ्या रत्नांनी भरलेली एखादी थैली,
वाटलं असंच तु बोलत राहावस,
माझ्या कानात गोड हसत राहावस!
तुलाही कदाचित वाटलं असेल,
पण घरच्यांपुढे कदाचित जमलं नसेल,
मनात नसताना फोन ठेवला असेल,
अजुन बोलण्याची इच्छा मनी नक्किच असेल!
वाट पाहिन मी तुझी, तुझ्या गोड आवाजाची,
आठवण मला नेहमीच राहिल या गोड क्षणांची,
का देऊ मी याला उपमा इतर कशाची,
माहितच आहे तुला अवस्था माझ्या मनाची!
इच्छा झाली होती काहितरी विचारायची,
तुलाही आवड होती काहितरी ऐकायची,
पण ओठांमध्ये शक्ती नव्हती बोलायची,
मनालाही आवड होती अग्निपरिक्षेची!!
Thursday, 9 October 2008
Marathi Kavita : तो रस्ता मला पाहून
तो रस्ता मला पाहून
तो रस्ता मला पाहून आज हसला
म्हणाला प्रेमात बिचारा फ़सला
हो ती हवा आजही तिथेच होती
नेहमी तुझे केस विसकटणारी
तो गाडयाचां गलकाही तिथे होता
रोज तुझ्या माझ्या वादंवर हसणारा
त्या वळणाने मला आवाज दिला खरा
पण आज मी मागे वळून पाहीलच नाही
रोज माझ्यावर हजार नजरा खिळत होत्या
आज कोणी माझ्याकडे पाहीलच नाही
आज किमंत कळाली तुझ्या सोबतीची मला
आज सारखं चुकल्या सारखं वाटत होत
पावले चालत होती पण वाट संपेनाच माझी
आज एक युदध हरल्या सारख वाटत होत
आज सगळ्याच्या मनात प्रश्न होता एकच
रोज दोघं असतात पण आज हा एकच
उत्तर होत जरी एकटाच असलो तरी
तुझ्या आठवणी आहेत माझ्या सोबतीला
Wednesday, 8 October 2008
Marathi Kavita : मैत्रिण
समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी,
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी.
चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी,
घर जवळ येताच पुढे निघून जावी.
आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी,
दिसलो की गालवर छान खळी पडावी.
कधी हसता हसताच ती रडावी,
कधी रडता रडताच खुद्कन हसावी.
हक्काने आपल्यावर रागवावी,
मग कही न बोलताच निघून जावी.
नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी,
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट् करावी.
सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी,
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी.
लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी,
वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी.
ती आनंदात असली की घडघडुन बोलावी,
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी.
सुखात सगळ्यांना सामिल करावी,
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी.
बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी,
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी.
परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी,
"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी.
थोडा वेळ मग ती शांत रहावी,
पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी.
ती बरोबर असली की आधार वाटावी,
अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी !!!
Tuesday, 7 October 2008
Marathi Kavita : आयुष्याच्या वेल
आयुष्याच्या वेलावर फुललेलं फुल
जसं एक खेळ्कर हसणारे मुल
हिवाळ्यातल्या सकाळचे टपोरे दवबिंदु
नाही त्यात किंतु परंतु
संध्याकाळी आकाशी रंगाची उधळण
भिरभिरत्या मनाला मैत्रीचे कुंपण
झरझर पावसाची आहे सर
झुळझुळणारा झर्याचा हा निर्झर
निष्पाप अशा या मैत्रीची चादर
सतत राहु दे माझ्या अंगावर
उबेत या जीवन सफल माझे
रक्ताचे नाही ह्रुदयाचे नाते तुझे माझे
साजरा करायला मैत्रीचा दिवस हवा कशाला
मैत्रीच साजरी करतो आपण प्रत्येक क्षणाला
Monday, 6 October 2008
Marathi Kavita : आपल्या जवळ जे नाही
आपल्या जवळ जे नाही
त्याचीच मानवी मनाला ओढ असते
सर्वच मनं सारखी घडत नसतात
म्हणून वास्तविकतेला स्वप्नाची जोड असते .........
फुले शिकवतात......,
गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;
रात रानी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;
सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं;
बकुळी म्हणते,
सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;
मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;
कमळ म्हणतो,
संकटात चिखलात बुडायचं नसतं,
संकटांना बुडवुन फुलायचं असतं
Sunday, 5 October 2008
Marathi Kavita : एक होता विदुषक
एक होता विदुषक,
खूप मेहनत करायचा,
लोकांचे दु:ख दूर करण्यास,
सदैव धडपडायचा.
एक होता विदुषक,
स्वता:चं दु:ख विसरायचा,
दूस-यांच्या दु:खांना,
आपलसं करायचा.
एक होता विदुषक,
कधीच नाहि रागवायचा,
लोकांच्या हिणवण्याला,
हसत हसत स्वीकारायचा.
एक होता विदुषक,
एकदा खूप दुखावला,
दु:खाचा सागर,
त्याच्यावर ओढवला.
लोकांना हसवणे,
त्याचे कमी झाले,
अन लोकांनीहि त्याच्याकडे जाणे,
हळू हळू बंद केले.
एक होता विदुषक,
एकटाच पडलेला,
ह्या स्वार्थी लोकांनी,
त्याला दु:खात ढकललेला.
खूप आक्रोश केला,
पण कोणी नाहि आले,
शेवटच्या घटका मोजताना,
त्याला जुने दिवस आठवले.
लोकांना हसवण्यासाठि,
जीवाचा आटापिटा करायचो,
इकडे-तिकडे भटकत,
पोटासाठि झगडायचो.
एक होता विदुषक,
असाच निघून गेला,
लोकांच्या मनात मात्र,
घर करून बसला.
एक होता विदुषक.......
Saturday, 4 October 2008
Marathi Kavita : Shevati Bhet
मला ती आज शेवटच भेटणार होती
दुख:शी भेट माझी आज तिथेच घडणार होती
आजचा दिवस सहज सरत होता
"अरे जरा दमानं" सांगितल तरी ऐकत नव्हता
तिला आज भेटुच नये असे वाटत होतं
मन माझं तिच्या निरोपाच्या
भयाने आतल्याआत तुटत होतं
पण पुन्हा तिचं ते मोहक रुप,
ते गहिरे डोळे मला दिसणार नव्हते
एकदाच शेवटच म्हणत
आज मन तिच्यासाथी हरणार होतं
कधी नव्हे ते आज पोहोचलो मी वेळेवर
नेहमी जिथे बसायचो बसलो
हात टेकवत त्या बाकावर
आज बागेतली गुलाबी फ़ुलं
मला काळी कुळकुळीत दिसत होती
पाखरांचे ते किलबीलणे मला विरह गाणी वाटत होती
अचानक बागेतलं वातावरण शांत झालं
"ही वादळापुर्वीची शांतत रे"!!
जणु मला इशा-याने सांगितल
हळु हळु काळे ढग जमु लागले
माझा हा विरह सोहळा पाहण्यास जणु ते आतुर झाले
तेवढ्यात ती आल्याची चाहुल लागली
तिने मला पाहताच लगबगीने पावलं टाकली
ती जवळ जवळ येत होती आणि पाऊशी सुरु झाला
सोबत त्याच्या विजाही कडाडु लागल्या
"आज तिच्या नजरेला नजर देउनच बोलणार"
मनात मी शपथ घेतली
पण ती समोर येताच माझ्याच
नजरेने माघार घेतली, नजर माझी भेदरली
ती शांत उभी होती
"उशीर का केलास"? मी विचारले
"अरे काम होतं जरासं!!" ती उत्तरली
बरं ठिक आहे म्हणत!! मी मान वळवली
का रे काय झाले ? तिने विचिरले
कुठे काय !! काही नाही ?
म्हणत मी तिच्या त्या प्रश्नाला टाळलं
"अछ्चा माझं लग्न ठरलय तो युएसए ला आहे"! तिने हसत सांगितल
माझं काय? मी झुरत विचारलं
अरे सॉरी घरातले तयार नव्ह्ते
मी तरी काय करु ?? सगळं गणितच चुकले
चल मी निघते म्हणत ती उठु लागली
पाठी न बघताच ती पुढे चालु लागली
नजर माझी तिच्या पाठमो-या
आकृतीकडे फ़क्त पाहत राहीली
हळु ह्ळु तिची ती आकॄती
माझ्या डोळयात फ़क्त भीजत राहीली
सोबत पावसाची सरही वाढु लागली
त्या पावसाच्या पाण्यात माझ्या
स्वप्नांची कागदी नाव बुडु लागली..
Friday, 3 October 2008
Marathi Kavita : शुन्य कर्म ...
मानवासारखा ज्याचा व्यवहार नाय
कर्म शुन्य त्याला अर्थच नाय || धॄ ||
बोलायला बोलतोय प्रेमळ वाणी
क्रोधाचे घर पण बसलय मनी
वाचाळता क्रियेविण व्यर्थच जाय
कर्म शुन्य त्याला अर्थच नाय || १ ||
मोठेपणा आणि स्वार्थापायी
करील कुणी जर पुण्याई
ढोंगी वॄत्ती खरी भक्तीच नाय
कर्म शुन्य त्याला अर्थच नाय || २ ||
ज्ञानाची ज्योत कोण पेटवितो
अज्ञान सारे कोण मिटवितो
माणसाला माणूस कोण बनवितो
कर्म करायला कोण शिकवितो || ३ ||
शोधलं तर उत्तर सापडणार हाय|
कर्म शुन्य त्याला अर्थच नाय ||
Thursday, 2 October 2008
Marathi Kavita : आठवते का तुला
आठवते का तुला
कॉलेज च्या जिन्या वरुन धडकून पडला होतास तू...
15 दिवस हात गळ्यात बांधून घेतला होतास तू....
सॉरी बोलण्या करता भेटला नाही तू .....
असा का वेडा तू...
असा का वेडा तू...
आठवते का तुला
स्टडी टूर ला प्रपोज केले होतेस मला तू..
मी नाही बोलले म्हणून आजारी पडला होतास तू...
हो.. बोलण्या करता लवकर मला भेटला नाही तू .....
असा का वेडा तू...
असा का वेडा तू...
आठवते का तुला
रोज मला भेटण्या साठी घरी खोटे बोलायचा तू....
सुट्टी च्या दिवशी पण हॉस्टेल वर यायचस तू...
मिस च्या शिव्या खायचास तू....
असा का वेडा तू...
असा का वेडा तू...
आठवते का तुला
माज़ी वाट बघत पावसात भिजायचास तू....
लवकर आले नाही की राग वायचास तू...
मी आणलेले गिफ्ट घेत मनात हसायचास तू...
असा का वेडा तू...
असा का वेडा तू...
आठवते का तुला
मी गावाला जाताना किती लेक्चर द्यायचास तू...
पोहचले की फोन कर 100 वेळा बोलायचास तू....
टाटा करायला बस च्या मागे धवायचास तू....
असा का वेडा तू...
असा का वेडा तू...
आठवते का तुला
रोज घरी फोन करायाचस तू...
कधी येणार कधी भेटणार सारखा विचारायचास तू...
आई पप्पा बरोबर बोलायला घाबरायचास तू...
असा का वेडा तू...
असा का वेडा तू...
Wednesday, 1 October 2008
Marathi Kavita : आजोबा
जेवताना आजोबा लाडात येत,
मला आपल्या ताटातली भकर देत;
जेवता जेवता मधेच थांबत
आणि एक भला मोठा ढेकर देत !
मी म्हणायची रागवूनः
"आजोबा, बॅड मॅनर्स,
व्हॉट आर यू डुइंग?"
आजोबांचं हसून उत्तरः
"आय अॅम जस्ट ढेकरिंग !"
आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...
आजोबांना पडलं होतं भलंमोठं टक्कल !
आजोबा म्हणायचेः
"ज्याला असं टक्कल
त्यालाच असते अक्कल !"
मी खिजवून म्हणायचोः
"आजोबा, यमकासाठी
घ्या आता बक्कल !"
आजोबा मोठयाने ओरडून म्हणतः
"अरे साल्या यमक्या,
मला देतोस धमक्या?यमकांच्या धंद्यामधे
मी आहे खमक्या !"
आजोबा आपल्याच नादात
स्वतःशीच गात असत,
गाता गाता मधेच थांबून
स्वतःशीच गोड हसत !
मी जवळ गेले की
मला म्हणतः
बेटा एक लक्षात ठेवः
एकटं एकटं जाता आलं पाहिजे;
स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे !"
मी गोंधळून विचारीः
"म्हणजे काय?"
आजोबा मोठयाने हसून म्हणतः
" म्हणजे काय? म्हणजे काय?
म्हणजे नाकात दोन पाय !"
"आजोबा, एक गोष्ट विचारु?"
"विचार बेटा!"
"आजोबा, तुम्हांला मैत्रिणी होत्या का हो?"
"वा! वा! होत्या म्हणजे होत्याच की !
एक ती अशी होती,
दुसरी ती तशी होती !"
इतक्यात खोलीत आजी यायची,
आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची !
आजोबा स्वतःला सावरायचे,
चटकन विषय बदलायचे,
घसा खाकरत म्हणायचेः
"बेटा, तुला गीतेमधला
स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे?
चालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे?"
आजोबा संध्याकळी
अंगणातल्या झाडाखाली
आपल्या आरामखुर्चीवर
एकटेंच बसत;
एकटक डोळे लावून
दूर कुठे बघत असत...
दूरदूरच्या ढगात असत,
कुठल्या तरी न दिसणा-या जगात असत !!
पाय न वाजवता मी हळूच
तिथे जाई,
त्यांच्या आरामखुर्चीमागे
उभी राही!
काय बघत असतील हे?
मी दूर पाहीः
मला वेगळं काहीसुध्दा दिसत नसे,
तीच घरं...तीच झाडं...
सगळं अगदी तसंच असे !
पाय न वाजवता मी हळूच
परत मागे घरात यायची;
आजोबांची आरामखुर्ची
सावल्यांमधे बुडून जायची !
आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...
Subscribe to:
Posts (Atom)



