Sunday, 30 November 2008

Marathi Kavita : प्रेम भावना


नजरेत जे सामर्थ्य आहे
ते शब्दाना कसे मिळणार
पण प्रेमात पडल्याशिवाय
हे तुम्हाला कसे कळणार
जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा
काहीतरी देण्याता महत्व असत्,
कारण मागितलेले स्वार्थ अन् दिलेले प्रेम असत्
शब्दानी कधीतरी माझी चौकशी केली होती
मला शब्द नव्हे
त्यामागची भावना हवी होती

Monday, 24 November 2008

Marathi Kavita : पंढरीची वारी

टाळ मृदुंग विणा खांद्यावरी,
विठू माऊलीचे नाम मुखावरी,
अशी चालते पंढरीची वारी
घेवूनीया तुळशी वृंदावन डोईवरी..

तुकोबाची पावले,
ज्ञानोबाची पालखी,
संताची सोबत घेवूनीया
वारकरी आनंदात चालती…

कधी येतो पाऊस,
कधी सतवतो वारा,
गावागावाच्या मुक्कामाला,
मंदिराचा असतो निवारा..

कोणी येतो भक्तीपोटी,
कोणी येतो नवसासाठी,
देव म्हणतो चालत रहा भक्ता
मी सदैव तुझ्याच पाठी..

ऐन वारीत चालती ,
भजने , भारूडे अन संतवाणी,
कोण म्हणतो तुच मायबाप
तर कोण म्हणतो नाही कोणी तुझ्यावानी…

ना इथे चालती भेदभाव,
आहो सार्‍यांचा इथे एकच गाव,
अश्या महराष्ट्राच्या संकृतीला
माझा नेहमीच सलाम…

प्रांताप्रांत्याच्या प्रत्येक वारकर्‍यांच्या भक्तीला,
माझा नतमस्तक होऊनी प्रणाम…

Thursday, 20 November 2008

Marathi Kavita : लव्हलेटर...

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं
सरळ जाऊन बोलण्यापेक्ष इझी आणी बेटर असतं
गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं
घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक सॉंग असतं
ज्यातला कंटेंट राईट आणी ग्रामर नेहमीच राँग असतं
सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतं
आणी जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खीशात पेन नसतं
पटलं तर पप्पी आणी खटकलं तर खेटर असतं!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे रेअर हॅबीट असतं
वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबीट असतं
शक्य शक्य हातांमधून थथरणारा वर्ड असतं
नुकतंच पंख फ़ुटलेलं क्युट क्युट बर्ड असतं
होपफ़ुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं!!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे ऍग्रीमेंट असतं
फिफ्टी सर्टन आणी फिफ्टीचं जजमेंट असतं
ऑपोनन्टच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेंड असतं
सगळा असतो थेट सौदा काहीसुद्धा लेंड नसतं
हार्ट देऊन हार्ट घ्यायचं सरळ साधं बार्टर असतं!!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक ड्रीम असतं
लाईफ़च्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट क्रीम असतं
अर्धं अर्धं प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं
तीसर्यासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं
दोघांपुरतच बांधलेलं सत्तर एम एम थिएटर असतं !

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे पहिला सिप असतं
चवीसाठी आतुरलेला टीनएजरचा लिप असतं
फेसाळलेल्या नशिबांसाठी हवाहवासा ग्लास असतं
आउट होतील त्यांच्यासाठी दुसर्‍या दिवशी त्रास असतं
झेपेल त्यानेच घ्यावी असं 'विदाऊट पाणी क्वार्टर' असतं
--
Sagar Sawant

Marathi Sher : शेर

मला ही जिंदगानीची नशा आता पुरे झाली,
जराशा झिंगण्यासाठी कधी मी पीतही नाही


मी क्षमा केल्यावरीही हाणली चपराक त्याने!!!
काय माझ्या मालकीचा एकसुद्धा गाल नाही ?

Tuesday, 18 November 2008

Marathi Joke : सरदारजी आणि डॉक्टर

एक सरदारजी डॉक्टर कडे गेला. त्याचे दोन्ही कान भाजलेले होते. डॉक्टरांनी विचारले, "काय झाले सरदारजी?"


सरदार : काही नाही. मी कपड्यांना इस्त्री करत होतो की मधेच फोन वाजला.

डॉक्टर : मग काय झाले?

सरदार : मी चुकुन फोनएवजी हातातली इस्री कानाला लावली. म्हणून माझा एक कान भाजला.

डॉक्टर : कोणाचा फोन होता?

सरदार : तो एक रोंग नंबर होता.

डॉक्टर : पण दुसरा कान कसा भाजला?

सरदार : त्या मूर्खाने मला परत फोन केला...

Saturday, 15 November 2008

Marathi Kavita : थवा...

जिकडे-तिकडे माणसांचा...
मोकाट सुटलेला थवा आहे.
पण मला थव्यातून जायचं नाही,
माझा मार्ग थोडा नवा आहे.
-
Sagar Sawant

Marathi Kavita : निरोप

तुला आठवतो सखे
तुला साठवतो सखे
तुझ्या डोळ्यात मी अश्रु
एक दाटतो गं सखे

तुझी माझी आठवण
त्या झाडाची गं खुण
लाजले गं डोळे
पाहुन पहीलं चुंबन

ठेच लागता पायाला
जीव कळवळे तुझा
धाप लागता तुला
प्राण अडकतो माझा

तुझी याद येते खुप
क्षण जुने आठवुन
माझ्या पापणीच्यासवे
निरोप धाडते गं मनं.........

Friday, 14 November 2008

Marathi Kavita : खंत...

वाटे मला त्या सागरलाटांनचा हेवा
फिरून तेच आयुष्य त्या जगतात तेव्हा


पासून किनार्‍याच्या दूर जाताना
परतण्याकडेच त्यांचा जास्त ओढा
वीरून जातना मिठीत किनार्‍याच्या
दौडता उत्साहं नसे थोडा


असेल कदाचीत चांदण्यानेही
हे त्यांच्याकडूनच शिकलेले
अबोला आज जरी आकाशाशी
उदयाचे आकाश मात्र चांदण्याने मंतरलेले


ऋतूंनाही जमते ही कला सोयरी
शिशीरातल्या पालझडीला वसंताची पालवी
आणि ग्रीष्मातल्या वैशाख वणव्या नंतर
धरतीवर उतरती गार श्रावणसरी


मात्र मला होत नाही ते शक्य
क्षण आनंदाचे गवसतील पुन्हा हा एक प्रश्न
मनात काय त्याच्या तो का पाही अंत
वाट पाहण्याशिवाय नाही काही करू शकत हि एकच खंत


हि एकच खंत...
हि एकच खंत...

Wednesday, 12 November 2008

Marathi Kavita : जे बिलगले मला

जे बिलगले मला ते
तुझेच सूर होते
धुके वितळण्याआधी मी
लोटीले दूर होते.

झाडास पालवीचे
उगवणे कळाले नाही
जळाले रानच जेव्हा
डोळ्यांत धूर होते.

जखमेवर फुंकर कशाला
भडकेल अजूनच ज्वाला
निखारे उचलताना
करपले उर होते.

स्वप्नांची रचिली माळ
राउळे जशी ओळीने
प्रार्थनेत संध्याकाळी
रात्रीचे काहूर होते.

Tuesday, 11 November 2008

Marathi Charolya

1. संध्याकाळच्या रंगीत आकाशात
संध्याकाळच्या रंगीत आकाशात
जेव्हा दिशा भरकटून जातात
पंख फ़ुटलेली स्मृतीपाखरं
घरट्याकडे परतू लागतात

2. ओठांवर ओठ टेकवताना
ओठांवर ओठ टेकवताना
भान दुनियेचं ठेवायचं नसतं
तूच तर सांगत असतेस ना, तेव्हा
डोळ्यांनीच डोळ्यांशी बोलायचं असतं

3. आयुष्यातल्या अशा प्रत्येक संध्याकाळी
आयुष्यातल्या अशा प्रत्येक संध्याकाळी
वेदनांच्या सावल्या तीव्र लांबू लागतात
तुझ्याच मिठीत येऊन मी मनमुराद रडतो
गाल गोरे तुझेसुद्धा ओले होऊ पाहतात

4. आयुष्याच्या अल्बममध्ये
आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

5. चारचौघांमध्ये आठवणी वाटणं
चारचौघांमध्ये आठवणी वाटणं
ही भावनांची गुंतवणूक असते
मयूरपंखी रेशीमगाठी क्षणार्धात जुळून येतात
त्यातच त्यांची सव्याज परतफ़ेड मिळते

6. रात पुनवेची तारे आटून गेले
रात पुनवेची तारे आटून गेले,
प्याले नजरेचे ओठ चाटून गेले.
लाजता तू पुन्हा तशी गुलाबी,
रंग नभी पंचमी दाटून गेले.

Marathi Kavita : हिरवे पान...

कारणाशिवाय छळणा-या संध्यावेळा
आता मला सकारण छळू लागतील,
पुस्तकात ठेवलेल्या पानावरच्या
हिरव्या खूणा गळू लागतील.


ढळू लागेल मनामधून
आठवांची पाकळी एक एक
आवळू लागेल मानेवरून
बंधनांची साखळी एक एक.


एक एक करून विझतील किंवा
विझवले जातील सारे दिवे
अंगणच माझ्या घराचे लावील
परतवून चांदण्यांचे थवे.


हवे होते ते ते मिळाले
गळाले ते तसे नकोच होते
आंबट-गोडाचा प्रश्न नाही
द्राक्षांना हात लागले होते.


होते ठेवले जपून परंतु
पुस्तकात एक हिरवे पान...
त्या पानाच्या जाळीमधे अता
अडकलो मी कायमचा छान!!

Friday, 7 November 2008

Marathi Joke : संता बार मध्ये

संता बार मध्य मध्ये दारू पिता पिता रडात बसला होता. बंता ने विचारले, 'काय झाले?'


संता म्हानाला, 'अरे जिचा विसर पडावा म्हणुन दारू ढोसतोय, त्या पोरीचे नाव आठवत नाहिये यार!!!' 

Thursday, 6 November 2008

Marathi Kavita : एकच वेळ …!!!

एकच वेळ …!!

मी तर केवळ दयेचा सागर
लोटा भर-भर वाहून घे ..
मी तर केवळ मायेचा सागर
एक डुबकी तरी मारून घे …!!

मी तर केवळ प्रकाश ज्ञानाचा
एकच अंधकार लावून घे
मी तर केवळ क्षणाचा भुंगर
एकदा तरी पाहून घे ..!!

मी तर केवळ प्रभूचा दास
एकच वेळ एइकून घे ..
तू तर आहे दासाचा दास
एकच वेळ ओळखुन घे ..!!

मी तर आहे भविष्याचा मार्ग
एकच वेळा चालून घे ..
मी तर आहे भूतांचा भुत
एकच वेळ जानूं घे …!!

मी तर आहे पाण्याचा झोत
एकच वेळ पिवून घे
मी तर आहे जीवनाचा मौत
एकच वेळ जगुन घे ..!!

मी तर आहे परमात्म्याशी समरूप
एकच वेळ उपकारून घे ..
मी तर आहे जादूचा चिराग
एकच वेळ फुकमारून घे …!!

Marathi Kavita : माझी आठवण

सुधार करून पुन्हा प्रदर्शित

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेन

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेन

कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेन

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेन

Wednesday, 5 November 2008

Marathi Kavita : तु असतास तर

तु असतास तर..


डोळे कधी भरले नसते
रुमालाचे शेव कधी
आसवांनी भिजले नसते
डोळे पुसता पुसता
............हात माझे थकले नसते.


तु असतास तर..
गालावर फुललेले गुलाब
अकाली कोमजले नसते
स्वप्ने पहायच्या वयात
जिथे प्राजक्त फुलायचे
...........तिथे काटे रुतले नसते.


तु असतास तर..
सजली असती मग निशीगंधाही
हंसली असती मग परसातली
अबोल मुग्ध ती रातराणीही
कुंपणावरच्या जाई-जुईंनी
............कुजबुजणे सोडले नसते.


तु असतास तर..
असले असते माझे असणेही
तुझ्या असण्यातले माझे
माझ्या असण्याला शोधणेही
भिरभिरणार्‍या पापणीने मग
...........क्षितिज शोधणे सोडले नसते.

Tuesday, 4 November 2008

Marathi Kavita : वडील

एक जन्म तरी...

बालपणाला बाय करुन निघाले जेव्हा..
पैजण पाउले अंगणी थबकली तेव्हा...
गहीवरल्या दाराला.. खिडकिचा आडोसा होता
डबडबत्या पापण्यातुन मायेचा कवडसा होता.
माझ्या लाडक्या लेकराला " जपा " फ़क्त
एव्हढच म्हणालात तेव्हा तुम्ही पप्पा..
पाठिवर हात थरथरत होता...
रडता रडता सुध्दा तुम्ही माझेच डोळे पुसत होता. .
सांगत होता तरीही " आठवण नको काढुस,...
भुतकाळासाठी कधी नको रडुस,
स्वतंत्र व्यक्ती तु,... वेगळे तुझे " आकाश "
काळजी नको करुस.. आम्ही सुध्दा राहु इकडे झक्कास " !!
आठवत राहते पप्पा नेहमी तुमच्या सार्‍या गप्पा
करुन घेतलेली १ Aug च्या भाषणाची तयारी..!!
आणि पहिल्यांदा सायकल शिकवली तेव्हाची भरारी..
रागवायचे तेव्हा नजर तुमची करारी...!!
कसं विसरु सारं थांबत नाही हे बरसतं पाणी खारं...
एकदा विचारेन म्हणते देवाला..
मुलीच्या हातात का समाजाने बापाचा " कणा"द्यावा..
त्यालाच का लेकराच्या ताटातुटीचा शाप द्यावा..
कशी होउ उतराई... मनातुन काही जात नाही..
प्रयत्न मात्र नक्की करेन...
तुम्हाला अभीमान वाटेल असे काही करुन दाखवेन..
तेव्हा देवालासुध्दा वाटावे..
एक जन्म तरी मुलीचा बाप व्हावे...!!!
ठवत राहते पप्पा नेहमी तुमच्या सार्‍या गप्पा
करुन घेतलेली १ Aug च्या भाषणाची तयारी..!!
आणि पहिल्यांदा सायकल शिकवली तेव्हाची भरारी..
रागवायचे तेव्हा नजर तुमची करारी...!!
कसं विसरु सारं थांबत नाही हे बरसतं पाणी खारं...
एकदा विचारेन म्हणते देवाला..
मुलीच्या हातात का समाजाने बापाचा " कणा"द्यावा..
त्यालाच का लेकराच्या ताटातुटीचा शाप द्यावा..
कशी होउ उतराई... मनातुन काही जात नाही..
प्रयत्न मात्र नक्की करेन...
तुम्हाला अभीमान वाटेल असे काही करुन दाखवेन..
तेव्हा देवालासुध्दा वाटावे..
एक जन्म तरी मुलीचा बाप व्हावे...!!!

Monday, 3 November 2008

Marathi Kavita : काही हसरे गुलाब

काही हसरे गुलाब....
काही उमलते गुलाब
त्यांच्या कष्टाळू माळ्याला
एका सकाळी हसरं दर्शन देतात....
काही क्षमाशील गुलाब
पाणी घातलं नाही तरी
न रागावता हसत असतात....
काही अवखळ गुलाब
काट्यांनी हाताला बोचकारलं तर
कसंबसं हसू आवरतात....
काही दिड दमडीचे गुलाब
"तिने" स्विकारले नाहीत म्हणून
"त्याच्या" फजितीवर फिदीफिदी हसतात....
काही "डोईजड" गुलाब
"तिच्या"च केसांत बसून
मुद्दाम खोडकर हसतात....
काही आठवणींतले गुलाब
वहीच्या पानांतून आणि सुकलेल्या पाकळ्यांतून
कोरडं, केविलवाणं हसतात....
आणि तरीही ओल्या आठवणींना
जास्तच ओलावा देऊन जातात....

Sunday, 2 November 2008

Marathi Kavita : सुवर्णमध्य


तुझी झेप सुर्याकडे

आणि मला ओढ सावलीची...
तुझे डोळे... उंच कड्यावर
मला ओढ माझ्या हिरव्या डोंगरमाथ्याची..
तुला हवे सारे आकाश.. कवेत
मला माझी धरती माझ्या पुरती...
झेप घ्यावी तीथुन क्षणांपुरती..,
पंख असावे आकाशी आणि पाय जमिनीवरती
मग एक सुवर्णमध्य काढला आपण...
बांधले घरटे झाडावरती....
तिथुन तु गाठतोस रोज नवे आकाश,
वाट पाहते मी तुझी जेवणासाठी दुपारी..
वेळेवर येत नाहिस आता तरी
मी काही फ़ार मनावर घेत नाही..
घर आवरणे,फ़रशी पुसणे,भांडी घासणे..
मी कुठे कमी पडत नाही..!
साग्रसंगीत जेवण, संसाराची ठेवण
आता मी सुबक ठेवते...
तुझ्यासाठी घरटे सजवुन
दाणापाणी हवे ते आणुन देते...
तु केव्हाही येउ शकतो,
रिकामे घरटे पाहुन परतु शकतो..
म्हणुन मी वाट बघत बसते..
काल तुझा मोबाईल विसरलास..
मी देण्यासाठी...
तुझ्यामागे झेपावण्याचा प्रयत्न केला
भरारी तर दुर.. मला उडणे सुध्दा जमले नाही..!!
झेप घेणे उंचीकडे सवय राहीली नाही
मनातल्या मनात सराव करुनही उडायला जमले नाही,
practical difficulties वेगळ्या असतात..
कळणार नाही तुला म्हणायचास ना तु..
किती खर आहे..


उडण्याचे स्वप्न बघुन उडता येत नाही पण...
पंख आहेत हे विसरुन जगताही येत नाही...!!!

Marathi Kavita : अधुरे प्रेम


आपणच तोडायला हवेत
आता सारे बंध
दूर सारायला हवा
हळव्या स्मृतींचा गंध
अलगद सोडवून टाकू
प्रेमाचे हे रेशीमधागे
वळून पहायलाही काही
ठेवायचं नाही मागे
आपणच रेखाटलेल्या रांगोळीचे
रंग आपणच पुसायचे
पापण्यांत अश्रू दडवून
जगासमोर हसायचे
आपणच विणलेल्या स्वप्नांना
आपणच देऊ मूठ्माती
या जन्मीचं राहिलेलं प्रेम
राखून ठेवू पुढच्या जन्मासाठी