Wednesday, 31 December 2008

नविन वर्षाच्या हर्दिक शुभेच्छा...

दे धक्काच्या वाचकानां आमचा नमस्कार...

आज ३१ डिसेंबर, म्हणजे इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस जो आपण जुण्या आठवणींना उजाळा देत येणार्‍या नविन वर्षाच्या स्वागतात साजरा करतो. आज प्रत्तेकाने हा दिवस वेगवेगळ्या पद्ध्तीने साजरा करण्यासाठी बेत आखलेले असतील यात काही शंका नाही. असो तर तुम्हाला देधक्काच्या सदस्यांकडुन
 
नविन वर्षाच्या हर्दिक शुभेच्छा...
हे नविन वर्ष तुम्हाला सुख समुर्द्धि आणि भरभराटिचे जावो हि देव चरनी प्रार्थना...

Tuesday, 30 December 2008

Marathi Kavita : जीवन हे असचं असतं

जीवन हे असचं असतं
इथे सुखापेक्षा दु:खच जास्त्त असते
तरीही जगण्याची उमेद संपत नाही
जीवन म्हणजे काय असतं
सप्तरंगी इंद्रधनुष्याप्रमाणे हे
रंगीत स्वप्न असतं
जे सत्यात नाही उतरलं
तरी नुसतं पहायला देखील सुखद वाटतं
जीवन हे असचं असतं
जिथं समजत असलं
तरी उमजत मात्र काहीच नसतं
ज्यात कमवायचं असतं आणि गमवायचं देखिल असतं

Friday, 26 December 2008

माझ्या लहान भावास वाढदिवसानिमीत्त हार्दिक शुभेच्छा !!!

तुझ्या वाढदिवसानिमीत्त हार्दिक शुभेच्छा !!!
वाढदिवस मात्र निमीत्त...
परंतु लहानपणापासुनच तुझ्यात असलेली
धडपड आता परत काही दिवसापुर्वी पाहीली
आपल्या कारकीर्दीच्या चालता चालता
तु अनेक क्षेत्रातील चव चाखत आहे
तुझ्या या धडपडीला,
या उत्साहाला भरगोस यश येवो !
कारकीर्द योग्य रीतीने पुर्ण करण्यास तुला बळ येवो
हिच सदिच्छा !!!

Tuesday, 23 December 2008

Marathi Kavita : कुणीतरी असावे

कुणीतरी असावे
गालातल्या गालात हसणारं
भरलेच डोळे कधी तर ओलं आसवानां पुसणारं !

कुणीतरी असावे
पैलतिरी साद घालणारं
शब्दानां कानात साठवुन गोड प्रतिसाद देनारं !

कुणीतरी असावे
चांदण्याच्या बरोबरो नेणारं
आंधारलेल्या वाटेत
आपल्या सोबत येणारं !

कुणीतरी असावे
फुलासारखं फुलणारं
फुलता फुलता सुगंध दरवळणारं !

कुणीतरी असावे
आपल्या मनात रमणारं
पलिकडील किनार्‍यारुन आपली वाट पाहणारं !



Thursday, 18 December 2008

Marathi Kavita : मैत्री

रोजच् आठवण यावी असे काही नाही, 
रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. 
मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, 
आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......

Marathi Kavita : का? अचानक...

का? अचानक.......
असे हे दिवस बदलतात,
क्षणात होत्याचे नव्हते करतात,
दुखाना अचानक सुखात बदलतात,
सुखाना अचानक दुखात बदलतात,

का? अचानक.........
मला थोड़े यश मिळताच,
माझ्या यशावर जलू लागतात,
माझ्या प्रगतिच्या वाटेवर,
का असे काटे पसरवितात,

का? अचानक............
जर माझी जबाबदारी वाढतेय,
तर यांचे काय कमी होतेय,
जरी मला वरुन मान मिळतोय,
तरी यांना मी तरी कुठे कमी देतोय,

का? अचानक............
कालपर्यंत माझ्या मदतीला येणारे,
आज हाकेला दुर्लक्ष करतात,
काय माझा दोष आहे,
ज्याची मला शिक्षा देतात,

का? अचानक............ 
अशी मानसे बदलतात,
माझ्या चंगुलपनाचा फायदा घेतात,
मी चांगले बोलतोय,
मग ते का वाकडयात शिरतात,

का? अचानक............
कालपर्यंत वरुन चांगले भासनारे,
आज का मागुन सुरे खुपसतात,
मी तोंडावरच चांगले वाईट बोलतो
मग ते का मागुन वार करतात
 
का? अचानक.................................

Monday, 15 December 2008

Marathi Kavita : आमचे शिवराय कोण ?

परवा अमचे अनेक बजीप्रभु लढता लढता कामी आले
त्या रक्तातून अनेक बजीप्रभू तानजी सन्ताजी धनाजी जन्मला येतिल.....
लढतील अगदी शेवटच्या श्वासापर्यन्त .....
पण एक प्रश्न मात्र रहतोच आमचे शिवराय कोण ???????

नावात शिव असलेले आमचे गृहमन्त्री नाही.....
केसाचा कोम्बडा अन अपली खुर्ची जपणारे आमचे सीएम नाही....
आजचे सन्त आमचे आबा मुळीच नाही....
शिवरायाचे नाव घेत मराठी मणसाना भुलवणारे दोन भाउ अजीबात नाही....
शेतीचे मन्त्रि अन क्रिकेट चे राजा असणारे आमचे साहेब अन त्यान्चे असन्ख्य चमचे अजित नाहि माफ करा अजिबातच नाहि.....

शिवराय आज कुठे आहात ? कारण आज आम्ही खुप घाबरलोत....
मावळे आजही तयार आहेत देशासाठि लढायला, पण आमचे सरदार मात्र लढतात आपापसात लुटुपूटुची लढाई....अन लुटतात आपल्याच प्रजेला....
शत्रू मग येतो उघड उघड, गारद करतो आमचे शूर मावळे...
आमचे सरदार मात्र लपतात बिळा,त आपापल्या शेपूट घालून्...
राजे आता सम्पले युद्ध ...गारद झाले १० १२ शूर शिपाई अन शेकडो प्रजाजन...

आता येतील सारे सरदार बाहेर बिळातून आपापल्या पुन्हा सुरु लुटुपुटूच्या लढाईचा खेळ ...
राजे आता तुमचीच गरज आहे महाराष्ट्राला..

नाहितर असेच आम्ही हतबल.....नाह्क बळी अजून काहि शिपायान्चे.....
फावत राहिल असेच शत्रूचे...अन माततील हे सरदार असेच कायमचे..
तेव्हा राजे तुम्ही याच परत बाजीप्रभू वाट पहाताहेत तुमची......

-
Anand Kulkarni

Sunday, 14 December 2008

Marathi Joke : पती पत्नी

एका कोर्टात पत्नी विरूध्द घटस्फोटाची केस चालू असते. पतीचे वकील तिला विचारतात की, तू तुझ्या पतीची फसवणूक केली काय?
पत्नी सांगते : मुळीच नाही, उलट पटीनेच माझी फसवणूक केली. दौरवरून तीन दिवसात परत येतो म्हणून सांगितले व पहिल्याच दिवशी रात्री १२.०० ला ते परत आले. ही माझी फसवणूक नाही का?

Thursday, 11 December 2008

Marathi Kavita : काळीज



खुशीनं मन माझं

इथं तिथं धावलं,
रेतीत उमटवत त्याची
इवली इवली पावलं...

समुद्राचं पाणी
अचानक कावलं,
वाहुन नेली त्याने
माझ्या मनाची ती पावलं...

वेड्या माझ्या
मनाचं त्यातसुद्धा फावलं,
दोन घटकेच्या खुशीत
त्याचं इटुकलं काळीज पावलं ...!

Monday, 8 December 2008

Marathi Kavita : फक्त एक होकार,..

फक्त एक होकार,
कुणाचं तरी जीवन बदलु शकतं,
जीवनाच्या गाडीत वंगण घालु शकतं,
कोणाचं तरी जीवन वेगवान करु शकतं!

तुझ्या फक्त एका होकाराने,
कुणाचं तरी रुप पालटेल,
आयुष्याचा रंग बदलेल
कदाचित वसंतही बहरेल!

एक कोमल नाजुक हात हातात येईल,
आपलं म्हणुन तुला कुणी मिठीत घेईल,
त्या उबदार स्पर्शानं तुझं मन सैरभैर होईल,
तुझ्या एका होकाराने!

कुणाला तरी प्रेम मिळेल,
खुप काळाची त्याची तहान भागेल,
त्याच्या आयुष्यातही एक परी असेल,
तुझ्या एका होकाराने!!!

Saturday, 6 December 2008

प्रिय अतिरेक्क्यानो...

प्रिय अतिरेक्क्यानो...

मारून मारून मारल किती ?
हा १२५ कोटि चा देश आहे
तावुन-सुलाखून निघालो आम्ही
एकात्मता अजूनही शेष आहे

जिंक्ल्याची नशा चढेल ,
हा क्षण चा भास् आहे
१५० वर्षाचा लड़न्याचा
पाठीशी आमच्या इतिहास आहे

लपून-छापून लढता तुम्ही
औलाद तर भित्रयांची आहे
दिसली जी झलक आम्हाला
ती पागल कुत्र्याची आहे

कधी हिरवा,कधी भगवा
ही तुमची धार्मिक ढाल असते
वाहिले जाते जे रक्त सरे
ते तर फ़क्त लाल असते

तसे तुमचे नापाक इरादे ही
कधी पूर्ण होऊ शकत नाहीत
तिरंग्याची शपत आहे ,
आम्ही उगाचच बकत नाहीत

नाक उचलून बोलतो आम्ही
तुमच्या प्रमाने नकटे नाहीत
राहिल जग पाठीशी आमच्या
आम्ही काही एकटे नाहीत

आमच्या अभंगतेच्या कथा
तुम्हास कलुन चुकल्या आहेत
झाडल्या गोल्या ,फोडले बोंम्ब
तय आमच्यासाठी टिकल्या आहेत

हा गैरसमज कडून टाका
तुम्ही आम्हाला गुलाम करताल!
तुम्हीच `भारत माता की जय म्हाणित
तिरंग्याला सलाम करताल !!
जय भारत…….. जय महाराष्ट्र……

हम सब एक है