वाटल देखील नव्हत की,
कुणापासून दूर होताना इतक दु:ख होईल.
दु:ख होण्याएव्हढ,
आमच 'हलक' नात खोलवर जाईल.
तिला देखील,
तिला देखील तसच काहीतरी वाटत होत.
हातातून हात सोडताना
पापण्यांखाली पाणी साठत होत.
मग मी स्वतःलाच समजावलं की,
आयुष्य असच चालत राहणार.
आठवणींच्या पाऊल खुणा ठेऊन,
'ही' हळवी पाखर दूर उडून जाणार....
Marathi Kavita : हळवी पाखर
६ ऑगस्ट २००९ Posted By Sunil Jadhav
5:18 PM
|
Label
Marathi kavita,
Prem Kavita
|
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
नवीनतम पोस्ट
मुख्यपृष्ठ





2 Comments:
होतं खरं असं कधी कधी.
होय, बरोबर आहे तुमचे...
तुमचे काय मत आहे?