Friday, 30 January 2009

Marathi kavita : तू...

सर्व काही आठवणी आता कश्या मागच्या मार्गावर राहिल्यात..

पण तू अजुनही मनावर राज्य करतेस..


सारे काही विसरन्याच्या मार्गावर असताना 


अजुनही तू एक हसू ओठांवर सोडतेस..

अजुनही वेडसरपना गेलाय नाही ..


शहानपण अंगि आले असुनही कुठेतरी 


ह्रदयाच्या कोपर्‍यात तू तशीच आहे जशी होतीस ..

आधी कसे तू मी सोबत असताना वातावरण मंतारून जायचे ..


मिठीत असताना तू सारे मंद होउन जायचे ..


आजही खास असे काही बदलले नाही .. 


बदलली ती मने फक्त .. बदलल्यात त्या वाटा फक्त ..

पण इतकाच हा बदलाव काफी असतो माणसांना माणसांशी तोडण्यासाठी...

आज उरलीत तितकीच श्वासे जितकी तू देऊन गेलीस ..


कदाचित आठवले तर आठव तुला दिलेले मी एक वचन ..


बस तितकेच माझ्या सोबत आहे ..


सारे काही कदाचित फार दूर राहून जाईल ..


आठवनिंना विसर आणि विसरतांना आठवणी येणारच ..


चुकलेल्या या प्रेमाच्या वळनाला एखाद्या जन्माला वळ्न मिळाणाराच ..


तू ज़ख्मा जरी दिल्यास तरी त्यावरही प्रेम असणारच ..


तुझ्या माझ्या झालेल्या चुकांना कुठेतरी माफ़ी होणारच ..


तू दूर कुठेही रहा पण अपी चेतन मधे आणि 


माझ्या कवितांना मधे तुझा सहवास कायम राहणारच ...

Tuesday, 20 January 2009

Marathi Kavita : पलायन

वेगाने निघून जाताना निदान वळुन तरी बघायचे होते
वस्ती जळत होती आणि आमचे हात वर होते
सर्प झाडावर चढला की पक्षी, पिले सोडून उडून जातात
पण, आज ना उद्या हे सगळे बदलणार होते
गावात आक्रोशाचा भडका उडणारच होता
माणसांनी असे ऐनवेळी पलायन करू नये
वस्ती जळू लागली की, पळुन जाऊ नये


कवी :- लोकनाथ यशवंत 

Monday, 19 January 2009

Marathi Kavita : Notes

सर तुम्हीच सांगितले होते ना,
जा आणि तिच्या कडून notes घे…..

शिकवले नाही तर काय झाले?
notes वाचून परीक्षा दे…..

म्हणून गेलो, नी खड्ड्यात पडलो
कणा मोडला पण प्रेमात पडलो….

तिला फक्त ‘देतेस का?’ विचारले….
माहीत नाही ,
तिच्यावर का आभाळ कोसळले?….

notes एवजी तिने frdship
असा अर्थ घेतला….

(नी पुढे बोलायाच्या आतच )
एक धक्का जोरात दिला…..

पडलो एकदाचा खड्ड्यात,
आणि मोडला माझा कणा….

पण काहीही असो सर,
परत एकदा लढ म्हणा….

मी तर म्हणतो सर,
तुम्ही कधी शिकउच नका…

notes ‘परत आण’ म्हणायला,
जराही कचकू नका….

Wednesday, 14 January 2009

मकर संक्रातीच्या हार्दीक शुभेच्छा!!!

 


तुम्हा सगळ्यांना मकर संक्रातीच्या हार्दीक शुभेच्छा!!!
तिळ्गुळ घ्या, गोड गोड बोला...

स्नेह आपुला तिळातिळाने व्रुद्धिंगत व्हावा
स्वभावातला पाक साखरी त्यावरी चढावा
एकमेका द्यावा घ्यावा, गोड काटेरी हलवा
विश्वशांतीचा मेवा असला सकलांनी खावा

Saturday, 10 January 2009

Marathi Joke : कारल्याची भाजी

ताटात कारल्याची भाजी पाहुण पतिराजांनी नाक मुरडले. मालतीताई चिडल्याच. तणतणत म्हणाल्या " सोमवारी कारलं चाललं, मंगळ्वारी - बुधवारीही तुम्ही काही बोलले नाही. गुरुवारी तर मी डब्याल्याही दिली होती. मग आजच ( शुक्रवारी ) काय झाले हो नाक मुरडायला? "

Thursday, 8 January 2009

Marathi kavita : नकळत तिची आठवण आली.....

नकळत तिची आठवण आली.....
असाच एकदा एकांतात बसलो असताना........

नकळत तिची आठवण आली,
अन् डोळयांसमोर जणू तिची प्रतिमाच तयार झाली.....

तिला पाहून......

मनाला खुप काही बोलायचे होते,
पण ओठातुन शब्द निघत नव्हते......

डोळयांतही पाणी जमा झाले होते,
पण अश्रु गळत नव्हते.....

श्वासही अजुन चालू होता,
पण हृदयाचे ठोके ऐकू येत नव्हते......

बरेच काही विपरीत घडत होते,
पण मनाला काही कळत नव्हते.......

अचानक डोळयांवर सुर्याचे किरण आले,
अन् तिच्या प्रतिमेचे जणू दहनच झाले.......

क्षणभर काही कळलेच नाही,
मनाला मात्र वळलेच नाही.....

काही कळायच्या आधीच......

"ओठातुन तिचे नाव निघू लागले......
डोळयांतुन अश्रु गळू लागले.....
अन् हृदयाचे ठोकेही वाढू लागले...... "

पण.....
नकळत तिची आठवण आली.....

नकळत तिची आठवण आली.....

Marathi kavita : मुलगी

असेल का रे मुलगी अशी???
नावात जीच्या सुगंध दरवळे
हास्यात जीच्या खुशी
बघुन जीला खुलतिल कळ्या
असेल का रे मुलगी अशी??????


ओंठ जीचे गर्द गुलाबि
नयण जीचे असे शराबि
शब्दांत जीच्या अम्रुताचि गोडी
खरचं असेल का रे मुलगी अशी???


चेहर्‍यावर जीच्या वसे शांतता
ओठांवर स्मित हास्य
बघुन जीचे लावण्य सुंदर लाजेल तो "चंद्र"
खरचं असेल का रे मुलगी अशी????


विचारांत जीच्या पवित्रता वसे
आचरणांत संस्कृती
नम्रता जीच्या नसणसांत भिनली
सांग मना सांग खरचं असेल का रे मुलगी अशी ???

Marathi Joke : अभिनेत्री

'मुलगा वारंवार गॅरहजर राहतो' या कारणासाठी मुख्याधापकानी हॉलिवुड मधील एका अभिनेत्रिला भेटायला बोलावले. 'बाई तुमचा मुलगा फारवेळा कारण न देता गॅर्हजर राहतो, याचे काही स्पष्टीकरण देउ शकता का?' यावर ती अभिनेत्री म्हणाली, 'काय करणार सर, माझ्या लग्नाला तोहजर नसेल तर ते वाईट दिसेल ना? त्यामुळे त्याला नाईलाजाने शाळा बुडवावी लागती. '

Wednesday, 7 January 2009

Marathi kavita : मृत्यू

पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी,
जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी.


वेदनेला अंत नाही अन्‌ कुणाला खंत नाही
गांजणाऱ्या वासनांची बंधने सारी तुटावी.


संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा
कापलेले पंख माझे .... लोचने आता मिटावी.


सोबती काही जिवाचे मात्र यावे न्यावयाला
तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी.


दूर रानातील माझी पाहुनी साधी समाधी ....
आसवे साऱ्या फुलांची रोज खाली ओघळावी.


कोण मी आहे ? मला ठाऊक नाही नाव माझे !
शेवटी माझ्या धुळीने चौकशी माझी करावी.


हे रिते अस्तित्व, माझे शोध शून्यातील वेडा
माझियामागेच माझी सर्व ही ओझी रहावी !


काय सांगावे तुला मी ? काय मी बोलू तुझ्याशी ?
राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी !

Marathi Joke : लग्नाचा २५ वा वाढदिवस

जाबुवंतराव पाटीलांचा लग्नाचा २५ वा वाढदिवस लवकरच येणार होता.  ऑफिसातल्या एकाने त्यानां विचारले, "तुम्ही लग्नाच १ ला वाढदिवस कसा साजरा केला होता?"

"मी माझ्या बायकोला घेऊन हवाई बेटावर गेलो होतो."

"वाव... हौ रोमअँटिक, आता लग्नाच्या २५ वा वाढदिवसाला काय करणार आहात?"

"तिला परत घेऊन यावे म्हणतोय..."

Tuesday, 6 January 2009

Marathi Kavita : प्रिये तुझ्या आठवणीत

प्रिये तुझ्या आठवणीत
मला चार टाके पडले रक्त वाया न घालवता
मी त्यानेच प्रेमप्रत्र खरडले
या सगळ्यात डोक्टरने मात्र चारशे रुपये लाटले
प्रिये मी सारचं वसुल करणार आहे
पण त्याआधी तुझ्या आठवणीत
मी एक झाड लावणार आहे
तु माझी झालीस की त्या झाडाची
गोड गोड फळ मी चाखणार आहे
पण तु माझी झाली नाहीस तर ते झाड
मी कापुण माझे चारशे रुपये वसुल करणार आहे
प्रिये तुझ्या आठवणीत मी एक प्रेमप्रत्र लिहणार आहे
त्यासाठी आभाळाचा कागद
अन समुद्राची शाई मी वापरणार आहे
तुझा नकार असेल तर माझा कागद मला परत दे
मी त्यावर पाणी तापवणार आहे
प्रिये तुझा नकार मिळाल्यावरही
तुझ्या आठवणींची आठवण येणार आहे
थोडा वेळ दुखः व्यक्त करणार आहे
अन लगेच दुसरीच्या शोधात फिरणार आहे

Saturday, 3 January 2009

Marathi Kavita : ह्यालाच प्रेम म्हणतात ...

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यासाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!