Tuesday, 24 February 2009

Marathi Charolya

माझ्या मनाच माझ्या मेंदुशी
छत्तीसचा आकडा आहे
माझं मन तसं सरळ आहे
या मेंदुचाच रस्ता वाकडा आहे.

प्रतेक गावाबाहेर
छोटा महारवाडा आहे
चवथीच्या पुस्तकात मात्र
समानतेचा धडा आहे.

इथे वेडं असण्याचे
खुप फायदे आहेत
शहाण्यासाठी जगण्याचे 
काटेकोर कायदे आहेत.

Saturday, 14 February 2009

Marathi Kavita : हिशोब प्रेमाच

तुझ्या माझ्या प्रेम प्रकरणाचा
जमा खर्च एवढा पाहुण जा
तु मला दिलेलं घेउन जा
मी तुला दिलेलं देउन जा


स्विट होममधे कित्येकदा खाल्ले
आपण कचोरी समोसे
आत्ता प्रर्यत नेहमी मीच भरत आलो
बिलाचे सर्व पैसे
आज अखेरचं जाउ पोटभर कचोरी खाउ
किमान या बिलाचे तरी पैसे भरुन जा


लेक्चर बड्वुन मी फर्स्ट शोचं
ऍड्व्हान्स बुकींग करायचो
अन् आठवड्यात एक तरी
नाटक किंवा सिनेमा दाखवायचे
नाटकाचे माफ करतो
किमान सिनेमाचे तर पैसे देउन जा


आपलं हे प्रेम प्रकरण
तुझ्या पैलवाण भावाला कळलं जेव्हा 
एवढं बेदम ठोकलं मला
मी मरता मरता वाचलो तेव्हा
चार दिवस दवाखाण्यात, पंधरा दिवस अंथरुणात होतो तेव्हा
निदान भावाच्यावतीने तु माझी माफी तर मागुन जा


मी कुठुन तरी नोट्स मिळवायचो
परिक्षेच्या काळात मात्र तुला द्यायचो
मग तुला नेहमी फर्स्टक्लास मिळायचा
माझा मात्र एक तरी बॅकलॉक रहायचा
आता मात्र ऑल क्लियर व्हायला हवं
म्हणुनच माझ्या नोट्स मला परत देउन जा


आज जाता जाता तरी
आपल्या प्रेमाच हिशोब तरी पुर्ण करुन जा...

Marathi Joke : संताची 'भाई'गिरी

एकदम नाकासमोर चालणारा सज्जन माणूस कसा असतो? असं कोणी विचारलं, की लोक डोळे झाकून सन्ताकडे बोट दाखवत. कुठच्याही परस्त्रीकडे तो नजर वर करून पहात नसे. तर असा हा साधासरळ संता पाहता पाहता लग्नाचा झाला. त्यानं त्याच्या सरळ स्वभावामुळे परस्पर तर कुठे ठरवलंच नव्हतं. मग आईबाबांना स्थळं पाहण्यावाचून पर्यायच नव्हता. असंच विचारण्या- विचारण्यातून जसविंदरचं स्थळ चालून आलं. सुंदर जसविंदर त्याच्या घरच्यांना सून म्हणून तर आवडलीच पण तिचा फोटो पाहून संताचीही विकेट उडाली. आणि आज ही सगळी सिंग मंडळी जसविंदर कौरच्या घरी साग्रसंगीत पाहाण्याच्या कार्यक्रमासाठी गेली होती. पहिल्या-वहिल्या गप्पा झाल्या आणि दोघांच्याही आईबाबांनी त्यांना एकटं बोलायची मोकळीक दिली.

एकांतात...

गोंधळलेला संता : आपको कितने भाई है बहेनजी?

जसविन्दर : वैसे तो तीन है, लेकीन...

संता : लेकीन क्या जी?

जसविन्दर : अजी अब आपही बोल रहे है तो... आजसे मेरे चार भाई हो गये।

Friday, 13 February 2009

Marathi Joke : लग्नाच खर्च

मुलगा : बाबा बाबा... लग्न करायला किती खर्च येतो हो?
बाबा : माहीत नाही बाळा. पण मी अजूनही तो भरतोय.

Wednesday, 11 February 2009

Marathi Joke : एक ड्रिंक

एका बार मधे एक पाकिस्तानी, एक बांगलादेशी आणि एक हिंदुस्तानी बसलेले असतात. 

पाकिस्तानी एक ड्रिंक घेतो आणि ग्लास खिडकी बाहेर फेकतो आणि म्हणतो "आमच्या पाकिस्तानात येवढे ग्लास कारखाणे आहे की आम्ही त्याच ग्लास मधुन पुन्हा ड्रिंक घेत नाही.!"

यावर बांगलादेशी एक ड्रिंक घेतो आणि ग्लास खिडकी बाहेर फेकुन देतो आणि म्हणतो "आमच्या बांगलादेशात इतकी सुबत्ता आहे की आम्ही त्याच ग्लास मधुन पुन्हा ड्रिंक घेत नाही.!"

यावर हिंदुस्तानी एक ड्रिंक घेतो आणि पाकिस्तानी व बांगलादेशी दोघानां उचलुन खिडकी बाहेर फेकुन देतो आणि थक्क झालेल्या बारटेंडरला म्हणतो "आमच्या देशात इतके पाकिस्तानी आणि बांगलादेशी आहेत की पुन्हा त्याच पाकिस्तानी आणि बांगलादेशी बरोबर आम्ही ड्रिंक घेत नाही.!!!"

Tuesday, 10 February 2009

Marathi Katha : एक लघु कथा ...

एक लघु कथा, मला आवडली म्हणुन तुमच्या साठी.....


सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किनार्‍यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, ;समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं, यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण या माशाला विचारा, त्याला काय फ़रक पडला? ज्याचा मी नुकताच जीव वाचवला.

Monday, 9 February 2009

Marathi Joke : नवरा बायको

नवरा : पैसे.. पैसे.. पैसे... कशाला हवे असतात गं तुला इतके पैसे? खरं तर तुला पैशापेक्षा
जास्त अकलेचीच गरज आहे. समजलं.

बायको : अहो ते कधीच समजलंय मला. पण जी गोष्ट तुमच्याकडे मुळीच नाही. ती कशी बरं
मागणार मी?

Wednesday, 4 February 2009

Marathi Kavita : दोन पाखरे

छान ते समोरचे झाड
त्याच्या झुकलेल्या फांदीवर बसुन
दोन पाखरे नेहमी किलबिल करायची
आणि तुलाही सवय झालेली
त्यांच्यात आपल्याल पहायची
असं आपलं नेहमीच सांगणं
आपलेही असेल असच एकच घरटं
झाडांच्या झुल्यावर झुलत राहणारं
पण तुझ्या हजार प्रश्नांवर
माझं नेहमीच गप्प राहणं कारण
एका फांदीवरच्या त्या पाखरांचं
घरटं मात्र एक नव्हतं
आपल्या दोघांची ही साथ
अशीच होती कारण ते प्रेम नव्हतं !!!


Monday, 2 February 2009

Marathi Kavita : फक्त दोन अक्षरं...

हवी होती फक्त दोन अक्षरं
पहिलं होत 'प्रे', दुसरं होतं 'म'

'म' म्हणजे मन माझं
'प्रे' म्हणजे प्रेरणा तुझी

धुंद अश्या मना माझ्या
लागली आस प्रेरणेची तुझ्या

वाटलं होतं एकदातरी जुळतील, हि अक्षरं
जुळनं राहिलं लांबच,बहुतेक होतील नश्वर

गेली वेळ निघुन आता, झाले अक्षरांचे शब्दांतर
दुसऱ्या अक्षराच्या माझ्या, झाले आज 'त' त रुपांतर

हवी होती फक्त दोन अक्षरं


--
क्षितिज येलकर