एक दिवशी एकटाच भटकत होतो..
काहीतरी अजानते शोधत होतो..
ठाऊक नव्हते मलाच माझे
हवे काय होते..
पण तरीही दही दिशाना जाऊन
धडकत होतो..
अचानक वाटले सापडली दिशा..
मी तसाच पुढे गेलो..
पण मृगजळ होते.. पुढेच.. थोडे..
मी तसाच परतही आलो..
कधी कळेना मिळेल दिशा मज..
कधी कळेना सापडेल ध्येय मज..
असाच कधिपर चालत राहू..
उगाच कशा कुणाची वाट पाहु?
वाटते कधी मज संपावे जग
वाटते कधी संपावे जीवन..
प्रवास हा जर संपत नाही.
जगण्यातही उरला राम नाही..
Wednesday, 29 April 2009
Tuesday, 28 April 2009
Marathi Kavita : कसला राजा ?
दूर देशी जाताना ती भेटली होती..
विसरणार नाही कधी तुला.. ती म्हणाली होती..
म्हणालो तिला आहे खरोखर तुझ्यावर विश्वास माझा..
जओन येतो परदेशी मग होईल तुझा राजा..
ती ही म्हणाली पाहीं मी वाट तुझी..
याच वाचनावर मी सार्या विश्वभर फिरलो..
तिच्यासाठी भेटी घेऊन माघारी आलो..
.... पण... परत आलो नि समजले..
मी तिचा कधीच नव्हतो.. राजा कसला,
मी तर तिच्या मनातही नव्हतो..
-
विनायक

Tuesday, 21 April 2009
Election : निवडणुकीचे वादळ
नमस्कार मित्रांनो,
तुम्हाला तर माहित आहे की सध्या निवडणुक सुरु आहे. येत्या २३ व ३० तारखेला मतदान आहे. युवा पिढी कडुन या वेळी लोकांच्या अपेक्षा भरपुर आहेत. तुम्हा सगळ्यांन आपल्या विभागातिल उमेदवार कोण कोण आहे, त्यांचे शिक्षण व इतर बाबी बद्दल माहिती हवि असेल तर खालिल संकेत स्थळाल भेट द्या.
http://www.myneta.info
आमची तुम्हा सगळ्याना विनंती आहे, तुम्ही सग्ळ्यांनी आपल्या मतदानाच हक्क या वेळी वापरावा व योग्या उमेदवारास निवडावे.
शुभेछुक
दे धक्का !!!
(ब्लोग परिवार)
Saturday, 18 April 2009
Marathi Katha : एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली
ई मेल वरून आलेल्या एका लेखाचा हा अनुवाद.
एका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, "मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल?". वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच स्थूल दिसत होते. वक्ते महाशयांनी प्रश्न केला, "तुमच्या शेजारी बसलेले गृहस्थ हेच तुमचे जीवनसाथी आहेत काय?" अत्यंत गंभीरपणे तिने उत्तर दिले," तुम्ही कसे काय ओळखले?" वक्ते महाशय उत्तरले,"तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मला आधी देऊ द्या. कारण त्या प्रश्नामुळे तुम्ही खरोखर खूप अस्वस्थ आहात असे दिसतेय. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे.
प्रत्येक नात्याचे एक चक्र (सायकल) असते. सुरूवातीला तुम्ही तुमच्या साथीदाराच्या प्रेमात पडता. तुम्ही त्याच्या फोन्सची वाट पाहता, त्याच्या स्पर्शाची इच्छा धरता, त्याच्या आवडींवर सवयींवर प्रेम करता. प्रेमात पडणे मुळीच कठीण नसते. खरं तर तो एक पूर्णपणे नैसर्गिक आणि उत्स्फूर्त असा अनुभव असतो. प्रेमात पडण्यासाठी तुम्हाला वेगळे असे काही करायचेच नसते. म्हणून तर त्याला
प्रेमात 'पडणे' असे म्हणतात. प्रेमात असणारी माणसं त्यांच्या अवस्थेचं वर्णन करताना कधी कधी म्हणतात, "I was swept off my feet" हे जे वर्णन आहे ते जरा दृश्य स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करून बघा. त्याचा अर्थ असा लागतो की तुम्ही आपले तुमचे तुमचे उभे होता, काहीही न करता आणि अचानक तुमच्या बाबतीत काही तरी घडले.
प्रेमात पडणे हा एक उत्स्फूर्त आणि passive असा अनुभव आहे. पण परस्परांसोबत काही महिने अथवा वर्षे काढल्यानंतर प्रेमाची धुंदी ओसरू लागते. प्रत्येक नात्याचे हे असेच नैसर्गिक असे सायकल असते. हळूहळू फोन कॉल्स (अद्यापही येत असतील तर) कंटाळवाणे वाटू लागतात. स्पर्श हवाहवासा वाटेनासा होतो. तुमच्या साथीदाराच्या सवयी-आवडी, ज्या तुम्हाला सुद्धा आवडत असत, आता तुमचे डोके उठवू लागतात.
नाते या अवस्थेला पोहोचल्याची लक्षणे प्रत्येक नात्यागणिक वेगवेगळी असतात. तुम्ही जेव्हा प्रेमात पडला त्या वेळेची अवस्था आणि नंतरची किंवा सध्याची ही कंटाळवाणी किंवा संतापजनक अवस्था - या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक असल्याचे तुम्हास जाणवते. या ठिकाणी कदाचित तुमच्या किंवा तुमच्या साथीदाराच्या मनात हा प्रश्न उभा राहतो की माझी निवड चुकली तर नाही ना? तुम्ही अनुभवलेली प्रेमाची धुंदी तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा, अन्य कोणाबरोबर का होईना, पण आपल्याला ती नशा पुन्हा एकदा अनुभवायला मिळावी असे तुम्हास वाटू लागते. आणि ह्या वेळी नाती तुटायला लागतात.
नात्यात यशस्वी व्हायचं असेल किंवा ते शाबूत ठेवायचं असेल तर त्याची एकच गुरुकिल्ली आहे. नात्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे ही ती गुरुकिल्ली नव्हे. तर जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावर प्रेम करणे ही ती गुरूकिल्ली आहे. The key to succeeding in a relationship is not finding the right person; it's learning to love the person you found. आपण दु:खात आहोत याला जवाबदार आपला जीवनसाथी आहे असे लोक समजतात आणि वैवाहिक संबंधांच्या बाहेर आनंद शोधायला जातात. विवाहबाह्य संबंध हे सर्व रंगा रुपांत बघायला मिळतात. अनैतिक संबंध हे त्याचे एक सर्वात कॉमन रूप आहे. पण बरेचदा लोक अन्य मार्गांकडेही वळतात.
स्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये असाल.
कारण (हे लक्षपूर्वक ऐका) : एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली - जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे - ही आहे.
The key to succeeding in a relationship is not finding the right person; it's learning to love the person you found.

Thursday, 16 April 2009
Marathi Kavita : खरी मैत्री
तुमच्या दोघात काही आहे. अस माझं म्हणणे नाही..
पण काहीच नाही असं सुद्धा वाटत नाही..
मला दिसताय तुमच्यात असलेला..
मैत्री च नातं.. जे कधी असता का हो खोटं???
मैत्रीच नाटक करतानाही कैक लोक फसतात..
नाटक नाटक म्हणू खरी मैत्री करून बसतात..
-
कवि : विनायक Make Money

Wednesday, 15 April 2009
Marathi Kavita : कवितेतून
रोज काही लिहीत रहावे
आहे असे काहीसे ठरवले...
पुन्हा प्रयत्न करायचा,
मिळवायचे जे जे हरवले....
होती कधी सवय मला
फक्त कवितेतून बोलायची..
जे जे यायचे मनी ते
यमकातून मांडायची...
पण आता आहे प्रश्न पडला
यमके कशी जुळवायची ?
मनीच्या भावांची कवितेतून
भट्टी कशी जमवायची
कवि : विनायक
आहे असे काहीसे ठरवले...
पुन्हा प्रयत्न करायचा,
मिळवायचे जे जे हरवले....
होती कधी सवय मला
फक्त कवितेतून बोलायची..
जे जे यायचे मनी ते
यमकातून मांडायची...
पण आता आहे प्रश्न पडला
यमके कशी जुळवायची ?
मनीच्या भावांची कवितेतून
भट्टी कशी जमवायची
कवि : विनायक
Tuesday, 14 April 2009
Marathi Kavita : तू येशील का?
तू येशील का? येशील का?
होऊन एक कळी,
अन मी फुलताना,
माझ्यासंगे फूलशील का?
येशील का? येशील का?
एकटा तो झोका, एकटा तो मी,
एकटे आमुचे हिंदोळे
अन मी झुलताना
माझ्यासंगे झूलशील का?
येशील का? येशील का?
मेघ बरसतील कृष्ण, शमेल माती उष्ण
धुळकट धरती, सुगंध उधळील
अन मी भिजताना,
माझ्यासंगे भिजशील का?
येशील का? येशील का?
जनात कधी लढताना, मनात मी झुंजताना,
चुकेल जेव्हा एखादा, काळजाचा ठोका
अन मिठीत तुझी स्पंदने देऊन,
मला तू जगवशील का?
येशील का? येशील का?
दाटून येतील जेव्हा, आठवणी जुन्या
उघड्या पडतील तेव्हा, जखमा पुन्हा
अन त्या जखमांवर,
हलके फुंकर घालशील का?
येशील का? येशील का?
श्वासामागून श्वास, अक्षय यज्ञाचा ध्यास
ध्यास हा एकट्याचाच कधीपर्यंत?
अन यज्ञात माझ्या ह्या,
समिधा होऊन जळशील का?
येशील का? येशील का?
मी न तुला पाहिले, तू कोण कुणाची दुहिता,
मी एक मुक्त कलंदर, कोरतो नवी पायवाट,
अन दोन पावली पायवाट,
चार पावली करशील का?
येशील का? येशील का?
होऊन एक कळी,
अन मी फुलताना,
माझ्यासंगे फूलशील का?
येशील का? येशील का?
एकटा तो झोका, एकटा तो मी,
एकटे आमुचे हिंदोळे
अन मी झुलताना
माझ्यासंगे झूलशील का?
येशील का? येशील का?
मेघ बरसतील कृष्ण, शमेल माती उष्ण
धुळकट धरती, सुगंध उधळील
अन मी भिजताना,
माझ्यासंगे भिजशील का?
येशील का? येशील का?
जनात कधी लढताना, मनात मी झुंजताना,
चुकेल जेव्हा एखादा, काळजाचा ठोका
अन मिठीत तुझी स्पंदने देऊन,
मला तू जगवशील का?
येशील का? येशील का?
दाटून येतील जेव्हा, आठवणी जुन्या
उघड्या पडतील तेव्हा, जखमा पुन्हा
अन त्या जखमांवर,
हलके फुंकर घालशील का?
येशील का? येशील का?
श्वासामागून श्वास, अक्षय यज्ञाचा ध्यास
ध्यास हा एकट्याचाच कधीपर्यंत?
अन यज्ञात माझ्या ह्या,
समिधा होऊन जळशील का?
येशील का? येशील का?
मी न तुला पाहिले, तू कोण कुणाची दुहिता,
मी एक मुक्त कलंदर, कोरतो नवी पायवाट,
अन दोन पावली पायवाट,
चार पावली करशील का?
येशील का? येशील का?
Marathi Kavita : प्रेम
प्रेमाच्या वेलीवर...
प्रेमाच्या वेलीवर सर्वच फ़ुले फ़ुलतात असे नाही
जीव जेवढा आपण लावावा...
तेवढा सर्व लावतात असे नाही
प्रेमासारखे बंधन ज्याला सिमा नसतात हे आपण जाणतो
पण प्रेमाच्या बंधनाला सर्वच जाणतातच असे नाही
कुणीतरी म्हटलय प्रेमामध्ये हातावरील रेषांनाही....
आपल्या वाटा बदलाव्या लागतात, पण त्या वाटा बदलेपर्यंत...
सर्वच थांबतात असे ना

Marathi Kavita : प्रियकर
तुझ्या करांचा स्पर्श निरागस, नवथर व्हावा
न देह तेव्हा कैसा माझा कातर व्हावा ?
न मोह मजला इंद्रपुरीच्या रंभेचाही
मनात माझ्या तुझाच केवळ वावर व्हावा
कशास रागे भरसी, आहे प्रियकर मी तर
तुझ्या रुपाने बैरागीही बर्बर व्हावा
तुझे नि माझे मीलन व्हावे चांदणरात्री
सखे, न रेशिमपडद्यांचाही अडसर व्हावा
असे जगावे, मृत्यूचेही नेत्र भरावे
असे मरावे, जगण्यालाही मत्सर व्हावा
तुझ्याविना निष्फळ बागेचा मोहर व्हावा
'मिलिंद' केवळ तू सुमनाचा मधुकर व्हावा
न देह तेव्हा कैसा माझा कातर व्हावा ?
न मोह मजला इंद्रपुरीच्या रंभेचाही
मनात माझ्या तुझाच केवळ वावर व्हावा
कशास रागे भरसी, आहे प्रियकर मी तर
तुझ्या रुपाने बैरागीही बर्बर व्हावा
तुझे नि माझे मीलन व्हावे चांदणरात्री
सखे, न रेशिमपडद्यांचाही अडसर व्हावा
असे जगावे, मृत्यूचेही नेत्र भरावे
असे मरावे, जगण्यालाही मत्सर व्हावा
तुझ्याविना निष्फळ बागेचा मोहर व्हावा
'मिलिंद' केवळ तू सुमनाचा मधुकर व्हावा
Marathi Kavita : ईच्छा
कधी मनाचे कधी स्वतःचे ऐकुन काही
मनात माझ्या येउन ती मज हळुच पाही .धृ.
तुझी आठवण तुझेच सारे भास मनाला
तुझीच स्वप्ने डोळ्यातुन या बरसत राही .१.
तुला पाहुनी स्मरते आणिक सुचते मजला
तुझे भाव अन कविता माझी बोले काही .२.
तु निघता सांडती अत्तरे तव वाटेवर
वाटेवरचा सुवास तव मज बोले काही .३.
तुला लाजुन झुरती आणिक तुटती तारे
तुझीच ईच्छा मागाहुन मग मनात येई .४.

Marathi Kavita : तू
तुझाच वावर मनात केवळ
निभाव आता अशक्य केवळ
नको अता ही उगाच जवळिक
पुन्हा मनाचे दुभंग केवळ
तुझ्यामुळे ही फितूर गात्रे
अता गुलामी तुझीच केवळ
पुन्हा जराशी झुळूक यावी
कसे जगावे उन्हात केवळ
नको नव्याने तुझी उधारी
हिशेब नव्हते हिशेब केवळ
निभाव आता अशक्य केवळ
नको अता ही उगाच जवळिक
पुन्हा मनाचे दुभंग केवळ
तुझ्यामुळे ही फितूर गात्रे
अता गुलामी तुझीच केवळ
पुन्हा जराशी झुळूक यावी
कसे जगावे उन्हात केवळ
नको नव्याने तुझी उधारी
हिशेब नव्हते हिशेब केवळ
Marathi Kavita : आठवण...
आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..
आठवण आली तुझी की,
माझं मन कासावीस होतं
मग त्याच आठवणींना..
मनात घोळवावं लागतं..
आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या हृदयात सामावून घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं आहे ते अशक्य...
कारण देवानेच नेलंय माझं ते सौख्य...
पण तरीही.........
आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी....
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी....
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..
आठवण आली तुझी की,
माझं मन कासावीस होतं
मग त्याच आठवणींना..
मनात घोळवावं लागतं..
आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या हृदयात सामावून घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं आहे ते अशक्य...
कारण देवानेच नेलंय माझं ते सौख्य...
पण तरीही.........
आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी....
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी....
Monday, 13 April 2009
Marathi Joke : जावयांची परीक्षा
सासुने एकदा आपल्या तिन जावयांची परीक्षा घेण्याचे ठरविले. तिला बघायचे होते, कुणाचे तिच्यावर जास्त प्रेम आहे. मोठ्या जावयाला ती नदीकाठी फिरायला घेउन गेली. तिथे तीने पाय घसरल्याचे नाटक केले. जावयाने पटकण तिला बाहेर काढले व तिचा जिव वाचवला. दुसर्या दिवशी त्याच्या दारात नविन मोटर सायकल उभी होती. ' प्रेमळ सासुकडुन भेट.'
मधल्या जावयाबरोबर पण तेच नाटक केले गेले, त्याने पण तिल तत्परतेने तिला वाचवले. दुसर्या दिवशी त्याच्या दारात नविन मोटर सायकल उभी होती.
धाकट्या जावयाबरोबर त्याची परीक्षा घ्यायला नदी काठी गेली व पुन्हा तेच नाटक केले. जावयाने मनात म्हटले, ' आयतीच बुडून मरते तर मरु दे' व त्याने दुलर्क्ष केले आणि ती मेली.
परंतु दुसर्या दिवशी त्याच्या दारात आठ लाखाची नवी कोरी गाडी उभी होती. " धन्यवाद, प्रेमळ सासर्याकडून भेट."
Saturday, 11 April 2009
Marathi Joke : विश्वास
गोपाळ्ला कफे गुडलकसमोर उभा असलेला बघुन चाट पडलेल्या रमेशने त्याला हाक मारली. रमेश म्हणाला, "काय रे गोपाळ, अरे तु मेला होतास ना?"
"काय, मेलो होतो म्हणतोस ?" आश्चर्यचकित होउन गोपाळ म्हणाला, " अरे, मी मेल्याचं तुला कोणी सांगितलं ?"
"मला परवाच पप्पुने सांगितलं" - इति रमेश.
"मग हि बातमी साफ खोटी आहे याची आता तरी खात्री झाली ना " - गोपाळ.
"नाही, अजुन माझी खात्री नाही. तुझ्या पेक्षा पप्पुवर माझा विश्वास आहे."
Monday, 6 April 2009
Marathi Joke : नवरा अणि बायको
नवरा अणि बायको म्हणजे लिव्हर अणि किडनी. नवरा लिव्हर तर बायको किडनी, कारण... लिव्हर खराब झाल तर किडनी लगेच फेल होते आणि किडनी फेल झाली तर... लिव्हर दुसर्या किडनी वर काम चालवतं !!!
Subscribe to:
Posts (Atom)