Friday, 29 May 2009

Marathi Kavita : मैत्री

हाक मैत्रीची
धाव मैत्रीची
सुख दु:खात साथ आपल्या मैत्रीची...
राग मैत्रीतला
प्रीत मैत्रीतली
खर-खोट भांडणं तुझ्या माझ्या मैत्रीतलं.....
अबोल मैत्री
बोलकी मैत्री
मनातलं सार समजुन घेणारी मैत्री...
देवाकडे एकच मागणे
श्वास शेवटचा असे पर्यंत
अशीच राहुदे मैत्री आपली....

Wednesday, 27 May 2009

Marathi Kavita : प्रेमाचा पुरावा

आभाळ ज़मिनीला टेकते
हा प्रत्तेकाचा भास आहे
कधीतरी ज़मिनीला टेकावे
हा आभाळाच ध्यास आहे
क्षितिज पहातांना
प्रत्तेकजन फसले आहे
खरे सांग मित्रा
तुला त्यांचे प्रेम कधी दिसले आहे

आभाळ आणि ज़मिनिचा
आहे जगती दुरावा
नीट बघ मित्रा
हाच तर खरा आहे

त्या दोहोंमधिल प्रेमाचा पुरावा .

Marathi Kavita : छोट्या कविता


जख्मा तू किती ही दे
जख्मांच काही वाटत नाही
पण फुंकर मारायला तू आलीस
हे काही पटत नाही 

त्या येऊन जाणा-या लाटेशी या बिचा-या किना-यानं कसं वागावं..?ती परकी नसली तरी त्यानं तिला आपलं कसं मानावं..?

कितीही म्हटलं तरी,मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही..,आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचंया चातकाला व्याज मागता येत नाही.

तू अलगद हात धरलासनि दुसरा हातही त्यावर धरलासदोन हातांच्या एका शिंपल्यातमाझा हात मोत्याने भरलास

पावसाच्या थेंबालाही माहित नव्हतं,
तो कुठे वाहतोय...
सहज विचारलं तर म्हणाला,
"मीही तेच पाहतोय..."
   

Tuesday, 26 May 2009

Marathi Katha : सुंदर चेहरा की सुंदर मन ?






















मोठे करुन बघण्यासाठी चित्रावर टिचकी (क्लिक करा) द्या.... http://i39.tinypic.com/24ne0ia.jpg

Friday, 22 May 2009

पहिला वाढदिवस

नमस्कार मित्रांनो,

आज दे धक्का !!! ह्या ब्लॉगला एक वर्ष पूर्ण झाले. आत्ता प्रयन्त तुम्ही दिलेल्या सहकार्य आणि आधार यामुळेच आज हा ब्लॉग आपला पहिला वाढदिवस साजरा करतोय... संपुर्ण दे धक्का सभासदाकडून तुमचे मी तुमचे आभार मानतो.

धन्यवाद.

Thursday, 14 May 2009

Marathi Kavita : मराठी माणूस...

उठलाय मराठी माणूस...
पण जागा नाही झाला अजुन..
उतु लागलाय आयुष्यातून..
पण सावरला नाहीए अजुन..

अजुन त्याची जुनी खोड काही गेलेली नाही..
समजून ना समजयची आवड संपलेली नाही…
असंच चालू राहीले तर लौकरच तो दिवस दिसेल…
मराठी माणूस नकाशात नाहीतर,
इतिहासाच्या पुस्तकतच दिसेल..

.....

म्हणून म्हणतोय मित्रांनो..

हीच आहे खरी वेळ..
जागे व्हा.. उठा आणि

"वाहू दे पुन्हा तेच मराठी रक्त धमन्यांमधून.. "
ज्याने बदलला भूगोल.. या हिंदुस्थानचा..
रचला नवा इतिहास.. मराठीच्या अस्मितेचा..

दाखवून द्या जगाला.. जर आम्ही जाउ म्हटले पुढे.. तर..
नाही कोणीच येऊ शकत आमच्या मध्ये..

आणि जर कोणाला वाटतच असेल.. तर सांगू त्यांना.. छातीठोक
... असेल हिंमत .. तर अडवा...

Wednesday, 13 May 2009

Marathi Joke : कुंडल्या जुळल्या कारण


लग्नाच्या मांडवात नवरा नवरीला म्हणाला, ''तुला माहितीये, लग्न होण्याआधी माझी १० मुलींशी अफेअर्स होती!''
नवरी उत्तरली, ''वाटलंच होतं मला. आपल्या दोघांच्या कुंडल्या जुळल्या म्हणजे सगळेच 'गुण' जुळले असणार ना!!!!!