Friday, 18 September 2009

Marathi Kavita : तिची भेट...

आज प्रथमच तिला पहिल
मन वेडावुनच गेल,
एकाच नजरेत तिने
मला पुरत घायाळ केल,

गुलाबी गाल... हरीणिची ती चाल
मादक अशी तिची अदा,
काय सांगू मित्रांनो...
मी झालोय तिच्यावर फ़िदा,

एकटक पाहत बसलो
विसरून सर्व भान,
मिळताच नजरेला नजर
तिने खाली घातली मान,

तिच्याजवळ बोलायची
इच्छा खुप झाली,
कसलाही विचार न करता
सरळ तिचीच वाट धरली,

तीही थोडीशी पुढे आली
कदाचित तिलाही काही बोलायच होत,
काय सांगू मित्रांनो....
नेमक तेव्हाच आईने जागवल होत...

- परेश चाफे

Thursday, 17 September 2009

Marathi kavita : बाप्पा


परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
दोन क्षण दम खातो म्हणून माझ्याघरी टेकला
उंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडला
मी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला

तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस ?
मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोस
मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक
इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो
काय करू आता सार मॅनेज होत नाही
पुर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाहीत
इमिग्रेशन च्या रिक्वस्ट्स ने सिस्टीम झालीये हॅंग
तरीदेखील संपतच नाही भक्तांची रांग
चार आठ आणे मोदक देऊन काय काय मागतात
माझ्याकडच्या फ़ाइल्स नुसत्या वाढतच जातात
माझं ऐक तू कर थोडं थोडं डेलिगेशन
मॅनेजमेंटच्या थेअरीमधे मिळेल सोल्यूशन
एम बी ए चे फ़ंडे तू शिकला नाहीस का रे ?
डेलिगेशन ऑफ़ ऍथॉरिटी ऐकल नाहीस कारे ?
असं कर बाप्पा एक लॅपटॉप घेउन टाक
तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टीव्हिटी देऊन टाक
म्हणजे बसल्याजागी काम होइल धावपळ नको
परत येउन मला दमलो म्हणायला नको
माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्प झाला खुश
माग म्हणाला हवं ते एक वर देतो बक्षिस
सी ई ओ ची पोझिशन, टाऊनहाऊस ची ओनरशिप
ईमिग्रेशनदेखील होइल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप

मी हसलो उगाच, म्हंटल, देशील जे मला हवं
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं
'पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं '
'सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं'
'हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव'
'प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव '
'देशील आणून परत माझी हरवलेली नाती '
'नेशील मला परत जिथे आहे माझी माती '
'इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं '
'आईबापाचं कधीही न फ़िटणारं देणं '
'कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर '
'भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार '
'य़ंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान'
देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान ?
"तथास्तु" म्हणाला नाही सोंडेमागून नुसता हसला

Wednesday, 16 September 2009

Marathi Kavita : मी...

आत्ताच कुठे हसण शिकलोय मी
रडण्याची भिस्तच मुळी उरली नाही...
झेलतोय परिस्तिथिचे घाव जिव्हारी
वेदनांची संवेदनाच भूललोय मी...

प्रकाशमान व्हायचंय मज
तेजपुंज त्या मित्रासम...
अन कवेत घेवूनी सारे विश्व
हरवायचय त्या सिकंदरास...

जन्मलो म्हणून जगणार नाही
अन असाच राखेत विरणार नाही...
ठसे सोडूनी जाईन जीवन काठावरती
आल्या लाटा कितीही , मिटणार नाही ...

--संदेश

Tuesday, 8 September 2009

Marathi Kavita : धडा

दुसरीतल्या डोंगरे बाई
त्यांचे मोठ्ठे डोळे आणि
पट्टी धरलेला बिन बांगड्यांचा हात

सोमवारी पंधरा ते वीस चे पाढे
पाठ करुन यायला सांगितले
पण शनीवार गेला सुजय, पप्प्या बरोबर
रवीवारी मावशीकडे टिनी मिनी
संध्याकाळी सिनेमा संपल्यावर आठवण झाली...

तसाच बसलो पाठ करायला
पण अठरा एकोणीस काही
डोक्यातच शिरेनात
एकोणीस तर आडा टेढा
घुसेचना डोक्यात
डोळ्यांना झोप आवरेना
मनाला झोप येईना

रात्रभर स्वप्नं ...पाढे
डोंगरेबाईंची पट्टी आणि बिनाबांगड्यांचा हात...
आणि एकोणीसचा पाढा

रात्रीत सारखा दचकून उठत होतो
शाळेत माझा नंबर येईतो
मी भितीने अर्धमेला
आणि बाईंनी नेमका...
...वीसचाच पाढा विचारला.

त्या दिवशी एक नवीनच धडा शिकलो
उगाच भितीने मरायचं नाही.

--
टल्ली

Saturday, 5 September 2009

Marathi Kavita : खरच तू यौवनाची मुसमुसलेली कळा

खरच तू यौवनाची मुसमुसलेली कळा
तू यौवनाची मुसमुसलेली कळा
चालविला ह्रुदयावर नजरेचा विळा
अजुन वाहे जखम ती भळभळा
खरच तू यौवनाची मुसमुसलेली कळा

तनुवर नौवारीचा वेढा
जणु तो मोरपिसाचा सडा
पाहुनी ह्रुदयाचा होई तो चोळामोळा
खरच तू यौवनाची मुसमुसलेली कळा

यौवन बान्धे तुझी काचोळीची गाठ
त्यातुन डोकवी कोरी कोरी पाठ
सावरताना मी ग होतो क्षुल्लकसा पाचोळा
खरच तू यौवनाची मुसमुसलेली कळा

गज-याचा सुगन्ध होतो भोवती गोळा
सान्गतो तनुचा भार असे कोवळा
हि बाला म्हणजे रती कुमारी सोळा
खरच तू यौवनाची मुसमुसलेली कळा

मी काय करावे कवित्व यौवनाचे
शब्दान्चा खजिना अपुरा माझ्या वाचे
शब्दान्चे किती ग कण कण केले मी गोळा
खरच तू यौवनाची मुसमुसलेली कळा

-दीपक

Friday, 4 September 2009

Marathi Kavita : दुरावा

बंगल्यासमोरची झोपडी आता मनात आहे बसली,
तिच्यात आसरा घेणारी ती गरिबी आहे कसली!
काळ्या काळ्या रंगाचे ते सुरकुतलेले हात
करू शकतील का हो दारिद्र्यावर मात?
झोपडीत रहाणारी म्हातारी रोज येते कामाला,
अन् गोड भाकरी खाऊ घालिते आम्हाला.
रोज गरम गरम भाकरी वाढतात मला,
पण शिळ्या पोळीचा अर्धाच तुकडा का बरे देतात तिला?
दिसून येते अशावेळी तिच्या दारिद्र्याचे दुःख,
अशॄंने चमकू लागतात डोळे लख्ख लख्ख!
संध्याकाळी आभ्यासाला बसतो जेंव्हा लाईटच्या उजेडात,
दिसून येते समोरची ती कंदिलाची वात.
वाटते पलीकडे जाऊन घालावे तिला वंदन,
पण काय करू, बोचतं मधलं एवढं मोठं कुंपण!


-धृवांग