तुला पाहिलं की
अस काय होवून जात
माझ मन मला
कस विसरून जात
तुझ्या डोळ्यात पाहून
भान हरवून जात तुला घेवून मन
नभात उडून जात
तुझ्या केसात हरपून
मन गुंतून जात
त्या रेशीम जाळ्यात
मन गुंफून जात तुझ्या गोड हसण्यान
मन फसून जात
गालावरच्या खळीवर
मन खिळून जात
तुला पाहिलं की
मन वेड होत कळत नाही कस
मनात प्रेम उमलून जात
कवि : ____
No comments:
Post a Comment