Sunday 25 October 2015

चंद्र आणि तू

चंद्र आणि तू,
असंच मनात विचार आला,
चंद्र सुंदर दिसतो की त्याहुन तू.....
आणि...
मग कळल,
तुला पाहून चंद्र नाय आठवत....
पण....
चंद्राला पाहिल की,
क्षणात आठवते स तू....

फक़्त तुझ्यासाठी..

माझ्या आत्म्यातून तुझे जाणे,
हे कधी मी मान्य करत नाही..
तू येतेस तेँव्हा मला कळत नाही,
तुझ्यातला सुगंध मला त्याची जाणीव
करून देतो..
पुःन्हा तू माझ्या पासून दूर जाणार,
ही जाणीव एवढी दुःखदायक असते..
की मी स्वःताला थांबऊ शकत नाही,
पण मला विश्वास आहे,
तू जिथे जाशिल..
तिथून पुःन्हा माझ्यासाठी पुःन्हा परत येशील,
जरी तू आली नाहीस तरी..
मी तुझी वाट
पाहात थांबेल अखेरपर्यंत,
फक़्त तुझ्यासाठी..



Source : funmarathi.com

Saturday 24 October 2015

जगणं खूप सुंदर आहे

जगणं खूप सुंदर आहे;
त्यावर हिरमुसू नका,
एक फुल उमललं नाही,
म्हणून रोपाला तुडवू नका...
सगळं मनासारखं होत असं नाही,
पण मनासारखं झालेलं विसरू नका;
सुटतो काही जणांचा हात नकळत;
पण धरलेले हात सोडू नका



Source : funmarathi.com

Marathi Kavita : कदाचित

खूप प्रेम केले मी तिच्यावर
पण तिला कळलेच नाही
बरोबर, प्रेम आंधले असतेना
म्हणूनच कदाचित.
ती म्हणाली होती एकदा
की तुझ्याशिवाय जगू शकत नाही
पण तरी ती सोडून गेली
अरे विसरली असेल कदाचित.
खरे प्रेम करणे म्हणजे काय असते
मला माहीतच नाही, मी केल ते की
तिने केल ते? तिने केल तेच
असेल कदाचित.
ती जात होती मला सोडून
मी नाही आडवल,कारण ती खुश
होती म्हणून, कळले असेल का
तिला कदाचित?
मी अजूनही गप्पच आहे
एकाच आशेवर,
येईल ती पुन्हा माझ्या आयुष्यात
कदाचित!!!!!!!!


Source : funmarathi.com

Tuesday 28 July 2015

Marathi Kavita : तुला पाहिलं की

तुला पाहिलं की
अस काय होवून जात
माझ मन मला
कस विसरून जात
तुझ्या डोळ्यात पाहून
भान हरवून जात तुला घेवून मन
नभात उडून जात
तुझ्या केसात हरपून
मन गुंतून जात
त्या रेशीम जाळ्यात
मन गुंफून जात तुझ्या गोड हसण्यान
मन फसून जात
गालावरच्या खळीवर
मन खिळून जात
तुला पाहिलं की
मन वेड होत कळत नाही कस
मनात प्रेम उमलून जात



कवि : ____

Sunday 17 May 2015

आयुष्य जगून घ्याव

कधी कधी अस वाटत..
आपण हि कोणावर तरी प्रेम कराव...
जगाच्याच नकळत,
कोणाला तरी आपल म्हणाव..
रोज फक्त तिच्याशीच बोलण्यासाठी, काहीही कराव..
अन बोलता बोलता...
फक्त तिच्यात हरवून जाव...
कधी कधी अस वाटत...
आपण हि कोणासाठी तरी जगाव..
कोणाच्या तरी हास्यात,
आपल सगळ विश्व शोधाव...
ते शोधता शोधता,
आपण हि तिच्यात हरवून जाव...
अन आपल्याच नकळत,
तिने ते तिच्या डोळ्याने सांगाव...
खरच..
कधी कधी अस वाटत...
आपण हि कधी तरी प्रेमात पडाव...
निरागस त्या प्रेमाच्या,
धो धो पडत्या पावसात भिजाव...
कधी कधी हसव,
तर कधी कधी रडव...
अन आयुष्याला...
त्या एकाच क्षणात..
संपूर्ण पणे जगून घ्याव...
संपूर्ण पणे...
एकाच क्षणात आयुष्य जगून घ्याव.


कवि : ___________

तीचीच वाट बघत असतो मी..

तीचीच वाट बघत बसतो मी...........!
दीवसा स्वप्ने बघतो मी,
आणि रात्री जागत असतो मी.
ती येणार तीला भेट काय द्यावी.
या विचाराने तिचावरच
कविता करत बसतो मी.
उगाच काहीही लिहीत असतो मी,
मित्रांनी पाहील्यावर त्यांचा करमनुकीचा विषय बनतो मी.
एकटाच तिच्या विचारात बरबडत बसतो मी,
आणि स्वतहुन जगात
वेडा ठरत असतो मी.
ती ज्या ठीकाणी मला सोडुन गेली.
त्याच ठीकाणी जाऊन बसतो मी,
ती गेलेल्या रस्त्याकडे एकटकिने पाहत असतो मी.
मला माहीती हे ती येणार नाही. तरीही तीचीच वाट
बघतो मी, संध्याकाळ झाल्यावर
मन तीथेच सोडुन घरी परतत असतो मी. रोज
रात्री देवाजवळ तीला भेटण्याची प्रार्थना करत
असतो मी, आणि सकाळ झाल्यावर
त्या जागेवर जाऊन वेड्यासारखा पुन्हा तीचीच वाट
बघत असतो मी. पुन्हा तीचीच वाट बघत असतो मी..



कवि : ___________