Wednesday, 2 July 2008

आधार - एक कविता

झाडांना आधार मुळांचा

मुळाना आधार मातीचा

जर मातीच नात तोडु लागली

तर फ़ुलानि कुनासाठि फ़ुलायच ?


छपराला आधार भिंतिंचा

भिंतीला आधार घराचा

घराला आधार मानसांचा

मानसच जर तोंड फ़िरावु लागलि

तर मुलानी कुनासाठि हसायच?


मनाला आधार प्रेमाचा

प्रेमाला आधार तुझ्या विश्वासाचा

पन जर तो विश्वासच डळमळु लागला

तर मनातल्या मायेने कुनसाठि पाझराव?


लेखक : माहीत नाही

No comments:

Post a Comment