बुधवार 28 डिसेंबर 2011

Marathi Kavita : धुंद अबोली ....

निळी सावळी रात नशीली
प्रहर जुना प्रीत नवेली ....
खुलवीत गेली रंग कोवळे
मिठीत घेता धुंद अबोली ....

गंध गहिरा पाकळ्यांचा
बहर नवा गोड फुलांचा
तरारले मन आज कशाने
स्पर्शात स्पर्श चांदण्याचा

देहात गोऱ्या मग मिसळे लाली
ओठी हसू जणू गुलाब गाली ....
खुलवीत गेली रंग कोवळे
मिठीत घेता धुंद अबोली ....

मंद मंद प्रवास प्रणयाचा
कहर होता यौवनाचा
आज असे हे हृदय गुंतले
कसा आवरू क्षण मोहाचा

श्याम वेडी मग राधाही भुलली
मेघ वर्णी जणू न्हाऊन गेली
खुलवीत गेली रंग कोवळे
मिठीत घेता धुंद अबोली ....





कवि : रुपेश सावंत

सोमवार 26 डिसेंबर 2011

Marathi Kavita : खूप अवघड असत ...

खूप अवघड असत ...

कोणालातरी मनात ठेवण सोप असत
पण कोणाच्यातरी मनात बसन खूप अवघड असत
कोणासाठी जगन खूप सोप असत
पण कोणीतरी आपल्यासाठी जगन खूप अवघड असत

कोणीतरी आवडण सोप असत
पण कोणालातरी आपण मनापासून आवडन खूप अवघात असत
प्रेम तर खूप जणांवर बसत
पण कोणीतरी आपल्यावर प्रेम करण खूप अवघड असत

उजेडात कोणीही चालतो संगती
पण अंधारात कोणीतरी वाट दाखवण खूप अवघड असत


कवि : नागेश

शनिवार 24 डिसेंबर 2011

Marathi Kavita : बंदी

माझा देह फक्त साडेतीन हात..
इच्छा मात्र अमाप आहेत.
मनाच्या खोल काळ्या बिळात..
विषय-वासनांचे साप आहेत.

थकत नाही मी उपभोग घेउन..
रोज लागतात नवी-नवी साधने.
ठाउक आहे, राहिलोय बंदी होउन..
हवीशीच वाटतात सगळी बंधने.

अध्यात्मापासुन लांबच रहातो..
नाही कळत देहापल्याडच्या गोष्टी.
इश्वरालाही कधी मधी स्मरतो..
फक्त माझ्या कामना-पुर्तिसाठी.

देह जरी हा थकला-पिकला
पुरता कधीच निवणार नाही.
मेल्यानंतर माझ्या पिंडाला..
दर्भाचा-कावळाही शिवणार नाही.



कवि : ________

गुरुवार 22 डिसेंबर 2011

Marathi kavita : एक-एक पाऊल

मित्रा जरा आभाळात, झेपाऊन तरी बघ
तुझ्या पंखातले बळ, आजमाऊन तरी बघ

कवेत तुला घ्यायला, आतुर आहे आकाश
चारी दिशांना पसरलाय, छान सोनेरी प्रकाश

धुक्यात हरवलेल्या तुला, आज हे दिसत नाही
धीर धर थोडा काळ, धुके कायमचे असत नाही.

टिकुन रहा धिरोदात्तपणे, घेत यशाची चाहुल
पचऊन सारे नकार, उचल एक-एक पाऊल 





कवि : ________

बुधवार 21 डिसेंबर 2011

Marathi kavita : अंतिम

शोकसागरात होईल आयुष्य हे चूर
जाईन जितका मी तुझ्यापासुन दूर

करेन मी प्रेम याच्या-त्याच्यावर
होईल फिके तेही काही काळानंतर

कितीही मिळवले तरी सदा भासेल भ्रांत
नाही होणार माझा जीव कधिही पूर्ण शांत

सतत एक पोकळी मला जाणवत राहिल
भरायचा प्रयत्न करेन तेवढी वाढत जाईल

तूच अंतिम साध्य, भवसागरातुन मला तारणार
तुझ्यापेक्षा काहीही कमी मिळुन सुखी नाही होणार



कवि : ________

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | 100 Web Hosting