Monday, 14 July 2008

विनोद

1) विमान
विमानात एकजण अचानक उठून उभा राहिला आणि ओरडला, ''हाय जॅक!''

... तत्क्षणी हवाई संुदरीच्या हातातला ट्रे खाली पडला आणि ती थरथरू लागली, पर्सरसह निम्म्याहून अधिक प्रवाशांनी हात वर केले आणि उरलेले भयव्याकुळ होऊन रडू लागले...

... तेवढ्यात समोरून एक प्रवासी उठून उभा राहिला आणि पहिल्या प्रवाशाला पाहून ओरडला, ''हाय टॉम!!!!!''

2) बाप आणि पोरगी
बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!

3) नन्या
नन्या : आई आई, मन्या येतोय. आधी सगळी खेळणी आत ठेवूयात कपाटात.
आई : का रे? मन्या तुझी खेळणी घेऊन जाईल का?
नन्या : नाही गं, तो स्वत:ची खेळणी ओळखेल ना!!!!

No comments:

Post a Comment