Sunday, 20 July 2008

बघा पटतय का...

१) खिसेकापुच गर्दीत ओरडतो, "खिसापाकीट सम्हालो"
लोक अभावितपणे आपली पाकिंट बघतात आणि
खिसेकापूला लोंकाचा पाकिट ठेवण्याचा खिसा समजतो.

२) स्पर्श न करताही आधार देतो येतो हे ज्याला कळतं त्यालाच
'पालक' शब्द समजला.

३) बेदम पैसा मिळवणं याइअतकं मिडीअऑकर ध्येय दुसरं असूच
शकत नाही. माणसं जोडायला त्यापेक्षा जास्त बळ लागतं.

४) ऑपरेशन होण्यापुर्वी रोगी घाबरलेला असतो. त्यातुन बरा झाला
की शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.

५) 'आपल कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की
समजावं आपला उत्कर्ष होतोय.'

६) सर्वात जीवघेणा क्षण कोणता?
खुप सदभावनेने एखादी शुभ गोष्ट करायला जावं आणि
स्वत:चा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच
यावा. सदहेतूचीच शंका घेतली जावी हा!

७) माणूस निराळा वागतोय, बिघडला. असं आपण पटकन
एखाद्याबद्दल बोलतो. पण तसं नसतं. त्या सगळ्याचा अर्थ
तो आपल्याला हवा तसं वागत नाही एवढाच असतो.

८) गैसमज हा कॅन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला
पोहचल्यावर तो आपलं स्वरुप प्रकट करतो.

९) अग्निदिव्य करुनही प्रभु रामचंद्राचे डोळे उघडले नाही
किंवा खात्री पटुनही सीतेच्या नशिबातला वनवास टळला नाही
आणि हे सगळं कुणासाठी? तर लोकांचे कपड्याने डाग
स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी काढणाऱ्या एका धोब्यासाठी.
कुणाच्या समाधानासाठी कुणाचा अंत पाहायचा हे माणसाने
ठरवले पाहिजे.

१०) जिथं उमटलेला ठसा जतन केला जाईल तिथंच शिक्का
उमटवावा. नाहीतर ते निवडणुकीचे शिक्के होतात.

-- व.पु. काळे

No comments:

Post a Comment