Tuesday, 8 July 2008

मी एक पाउसवेडा

ताज्या ओल्या मातीवरून
मोतीभरल्या तृणावरुन
हिरव्याकच्च झाडीमधून
मी खुप खुप चालत असतो
मी एक पाउस वेडा
फ़क्त पावसालाच शोधत असतो….

वाट फुटल्या रस्त्यावरून
शांतचित्त खड़कावरुन
वेड लागलेल्या वा-यामागुन
मी धाव धाव धावत असतो
मी एक पाउस वेडा
फ़क्त पावसालाच शोधत असतो….

ऋतुमती धरेसोबत
फडफडणा-या पंखासोबत
ओघळणा-या थेंबासकट
मी थुई थुई नाचत असतो
मी एक पाउस वेडा
फ़क्त पावसालाच शोधत असतो..

कडाडणा-या विजेसारखा
रिमझिमणा-या सरींसाराखा
वाहणा-या पाण्यासारखा
मी पाउसगाणे गात असतो
मी एक पाउस वेडा
फ़क्त पावसालाच शोधत असतो..

माझ्यासारख्या पाउस वेड्या
चातकासारखी वाट पाहतो
मी एक पाउस वेडा
फ़क्त पावसालाच शोधत असतो..
मी एक पाउस वेडा
फ़क्त पावसातच भिजत असतो..


लेखक : पृथा

No comments:

Post a Comment