Tuesday, 5 August 2008

मराठी चारोळ्या

1) मनातील भावनाना मर्यादा नसतात

मनातील भावनाना मर्यादा नसतात
त्या असतात असीम आणि अथांग
त्या तू लगेच जाणून घेतोस
आणि उधलून देतोस सारे रंग ......

2) मनात सारे असतानाही

मनात सारे असतानाही
ओठावर का उमटत नाही
शब्दच रुसून बसले की
मीच खुळी मज उमजत नाही...........


3) माज्या स्वप्नातल आयुष्य मी

माज्या स्वप्नातल आयुष्य मी
आंदन म्हणुन तुला दिल
कारण तुज्यापलिकडे सुद्धा जग आहे
हे मला तेव्हा नाही कळल

4) क्षणाची सोबत आणि अथांग एकटेपाना

क्षणाची सोबत आणि अथांग एकटेपाना
याची आठवण पावसामुलेच जाली
तुला ही विसरली होती मी
तुजी आठवण सुद्धा मला पावसानेच करून दिली

5) महितेय तुज्या नजरेताच

महितेय तुज्या नजरेताच
तुज्या भावना आहेत
पण तुज्या नजरेला माजी
नजर कधी भिडत नाही
आणि तुज्या मनातील भावना
मला कधी कळत नाही ........

No comments:

Post a Comment