Sunday, 17 August 2008

Marathi Kavita : आनंदीला आनंद म्हणे

आनंदीला आनंद म्हणे,
जाऊ नको तू ये ईकडे,
पाहू नको तू चोहीकडे,
आपण खाऊ हे चारोळे.

आनंदी लाडात म्हणे,
बाजुला आहेत 'कावळे',
बघुन त्यांना मी घाबरते,
कसे खाऊ मी हे चारोळे.

मी असता तू का घाबरते,
चल जाऊ आपण दुसरीकडे,
तिथे न तु त्यांना दीसे,
मग खाऊ आपण हे चारोळे.

नको नको आतां राहुंदे,
झाली वेळ आता मी निघते,
उद्या भेटु आपण मग तिकडे,
मग खाऊ हे चारोळे.

उद्या म्हणता दिवस सरले,
रोज नवीन तिचे बहाणे,
त्याचे त्यालाच कळून चूकले,
आपणच खाल्ले...... ते चारोळे!

-
Sagar Sawant

No comments:

Post a Comment