Wednesday, 20 August 2008

Marathi Kavita : तव प्रीतीने मी घायाळ झाले

तव प्रीतीने मी घायाळ झाले,
नयन बाणांनी तव, मजला बेहोश केले.

तुझिया कवेत विसवताना,
क्षणही गोठला.
तुझ्या श्वासांचे संगीत,
ऐकण्यासाठी काळही थांबला.
तू ओठांवर ओठ टेकतना,
भान न उरले, भान न उरले............ .

तुझीया श्वासात माझा,
श्वास मिसळला.
तुझीया स्पर्शात मला,
स्वर्ग दूर न उरला,
तुझीया ओठांचे अमृत,
मी मनसोक्त प्याले, मनसोक्त प्याले.........

तुझीया स्पर्शाची जादू अजब,
तुझीया श्वासांचं संगीत गजब,
तूच तू चाहुकडे,
काही न उरले, काही न उरले............ ..

No comments:

Post a Comment