Wednesday 27 August 2008

Marathi Kavita : कुणाच्याही इतके जवळ जाउ नये

कुणाच्याही इतके जवळ जाउ नये,
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर हृदय कधी
जोडताना असह्या यातना व्हावी

डायारीत कुणाचे नाव इतकेही येऊ नये
की पानाना ते नाव जड व्हावे
एक दिवसा अचानक त्या नावाचे डायारीत येणे बंद व्हावे

स्वप्नात कुणाला असंही बघू नये
की आधरला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या काहीच नसावे

कुणाला इतकाही वेळ देऊ नये
की आपल्या क्षणाक्षणवर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकिही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिषहीन व्हावी
कुणाचे इतकेही एकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातुन मग
त्याचाच शब्दांचा उच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असु नये
की प्रतेक स्पंदणात ती जानवावी
ती साथ गमावण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळ्खळ अश्रू जमवी

कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे "मी पण " आपण विसरून जावे
त्या सभ्रमातुन त्याने आपल्याला
ठेच देउन जागे करावे

पण, पण
कुणाच्या इतक्यही दूर जौ नये
की आपल्या सावालीशिवाय सोबत
काहीच नसावे
दूर दूर आवाज दिला तरी आपले शब्द जागीच घुमवे


No comments:

Post a Comment