Friday, 8 August 2008

Marathi Mhani (मराठी म्हणी) : शब्द - उ,ऊ (u,U)

उंटावरचा शहाणा.
उंदराला मांजराची साक्ष.
उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी.
उघड्याकडे नागडा गेला अनं रात्रभर हिवाने मेला.
उचलली जीभ लावली टाळ्याला.
उठता लाथ, बसता बुक्की.
उडत्या पक्षाची पिसे मोजणे.
उडाला तर कावळा, बुडाला तर बेडुक.
उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग.
उत्तम शेती, माध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी.
उथळ पाण्याला खळखळाट फार.
उद्योगाचे घरी रिध्दी सिध्दी पाणी भरी.
उधार पाधार वाण्याचा आधार.
उधार तेल खवट.
उधारीचे पोते, सव्वा हात रिते.
उन पाण्याचे घर जळत नसते.
उपट सुळ, घे खांद्यावर.
उभारले राजवाडे तेथे आले नकवडे.
उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे.
उसना पसारा देवाचा आसरा.
उसळात घातलं तर मुसळात सापडत नाही.
उसाच्या पोटी कापूस.
ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खावू नये.
ऊस झाला डोंगा परी रस नाही डोंगा.

No comments:

Post a Comment