Monday, 1 September 2008

Marathi Kavita : आता आम्ही दोघेही भिजतॊ आहोत...

ऑफीसवरुन घरी निघायची वेळ
सगळेच अगदी घाईला टेकलेले,
आणी अचानक पाऊस बरसु लागला
त्याचे दिवसच आहेत म्हणजे तो बरसणारच...
पण असा अचानक ??
इतक्यात "ती" दिसली
आणी वीज कडाडली,
त्या क्षणभाराच्या प्रकाशात जणु परीच भासली
पाऊस तिच्या गालांवर अगदी थैमान घालत होता
ती मात्र त्याला साधा विरोधही करु शकत नव्हती
क्षणभर माझाही जळफळाट झाला...
तिने माझ्याकडे पाहिलं...
आणी पुन्हा एक वीज कडाडली
पण आभाळात नाही, हॄदयात...
ती जवळ आली
मी छत्रीत होतो, पण काय करु सुचेना...
एक मन म्हणतयं, तिला छत्रीत घ्यावं...
आणी दुसर ओरडतयं, तिच्या सोबत भिजावं...
"ती" मात्र असाच एक प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर घेऊन अजुन भिजतेच आहे...
अखेरी वाराच पडला मधे...
आणी माझ्या हातची छत्री हिसकावुन घेऊन गेला...
आता आम्ही दोघेही भिजतॊ आहोत...
ती पावसात आणी मी तिच्या भिजणाऱ्या रुपात ...

-
संतोष

No comments:

Post a Comment