Sunday 5 October 2008

Marathi Kavita : एक होता विदुषक

एक होता विदुषक,
खूप मेहनत करायचा,
लोकांचे दु:ख दूर करण्यास,
सदैव धडपडायचा.

एक होता विदुषक,
स्वता:चं दु:ख विसरायचा,
दूस-यांच्या दु:खांना,
आपलसं करायचा.

एक होता विदुषक,
कधीच नाहि रागवायचा,
लोकांच्या हिणवण्याला,
हसत हसत स्वीकारायचा.

एक होता विदुषक,
एकदा खूप दुखावला,
दु:खाचा सागर,
त्याच्यावर ओढवला.

लोकांना हसवणे,
त्याचे कमी झाले,
अन लोकांनीहि त्याच्याकडे जाणे,
हळू हळू बंद केले.

एक होता विदुषक,
एकटाच पडलेला,
ह्या स्वार्थी लोकांनी,
त्याला दु:खात ढकललेला.

खूप आक्रोश केला,
पण कोणी नाहि आले,
शेवटच्या घटका मोजताना,
त्याला जुने दिवस आठवले.

लोकांना हसवण्यासाठि,
जीवाचा आटापिटा करायचो,
इकडे-तिकडे भटकत,
पोटासाठि झगडायचो.

एक होता विदुषक,
असाच निघून गेला,
लोकांच्या मनात मात्र,
घर करून बसला.

एक होता विदुषक.......

1 comment:

  1. sunder ani manala bhavanari kavita ahe

    ReplyDelete