Monday 3 November 2008

Marathi Kavita : काही हसरे गुलाब

काही हसरे गुलाब....
काही उमलते गुलाब
त्यांच्या कष्टाळू माळ्याला
एका सकाळी हसरं दर्शन देतात....
काही क्षमाशील गुलाब
पाणी घातलं नाही तरी
न रागावता हसत असतात....
काही अवखळ गुलाब
काट्यांनी हाताला बोचकारलं तर
कसंबसं हसू आवरतात....
काही दिड दमडीचे गुलाब
"तिने" स्विकारले नाहीत म्हणून
"त्याच्या" फजितीवर फिदीफिदी हसतात....
काही "डोईजड" गुलाब
"तिच्या"च केसांत बसून
मुद्दाम खोडकर हसतात....
काही आठवणींतले गुलाब
वहीच्या पानांतून आणि सुकलेल्या पाकळ्यांतून
कोरडं, केविलवाणं हसतात....
आणि तरीही ओल्या आठवणींना
जास्तच ओलावा देऊन जातात....

No comments:

Post a Comment