Thursday, 6 November 2008

Marathi Kavita : माझी आठवण

सुधार करून पुन्हा प्रदर्शित

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेन

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेन

कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेन

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेन

6 comments:

 1. सुरेख ! पण असेल च्या जागी असेन वापरलं तर शुध्द होईल.

  ReplyDelete
 2. तुमची सूचना मला आवडली, सूचने बद्दल मी तुमचा आभारी आहे.

  ReplyDelete
 3. ARE DOST, KYA ZHAKKAS LIKHA HAI, DIL KHUSH HUVA KASAM SE.

  FROM SACHIN KARADE

  ReplyDelete
 4. MALA KHUP KHUP KHUPACH AAVDLI, PAN TO DHAG KAALA NASAVA, SAMBHALUN GHENARA AASAVA.

  FROM RESHMA GUJAR

  ReplyDelete
 5. very nice dear friend i like this poem

  ReplyDelete
 6. kalpana faarach chhan aahe
  upama utkrushta aahet

  ReplyDelete