एकदा एक मुलगा जंगलात बेचकी नी नेम धरून पक्षी उडवत असतो.
तर त्याचा नेम लागत नाही आणि तो बोलतो "च्या..याला नेम चुकला.."
तर तिथे बसलेला एक साधू त्याला बोलतो की " बेटा असा नाही बोलायचा , हे अप्शब्द आहेत, लहान मुलांनी असा नाही वागायचे ".
त्यानंतर परत तो मुलगा नेम लावतो आणि त्याचा नेम चुकतो आणि तो परत बोलतो "च्या..याला नेम चुकला.." ..
हे तो साधू परत ऐकतो आणि परत त्याला तेच समजवतो...
तरीही तो मुलगा ऐकत नाही आणि तिसररयांदा सुद्धा परत तसेच करतो "च्या..याला नेम चुकला.."
आता तो साधू भडकतो आणि त्या मुलाला शाप देतो..
"आता विजांचा कडकडाट होईल आणि आकाशातुन एक वीज येऊन तुझ्या अंगावर पडेल."
साधू महाराजांनी बोल्या प्रमाणे आकाशात विजांचा कडकडाट होतो आणि एक वीज येऊन त्या मुलाच्या ऐवजी चुकुन त्या साधू वर पडते...
त्याच बरोबर आकाशातुन एक आवाज़ येतो ...
"च्या..याला नेम चुकला..."
No comments:
Post a Comment