Saturday, 4 July 2009

Marathi Kavita : गोष्ट माझ्या आईची

गोष्ट माझ्या आईची

(पितृ प्रेम मिळेल असे सगळे नशिबवान नसतात )

गोष्ट माझ्या आईची

शंभर रुपये कमवायला ती
आठ आठ km पाई पाई जायची
आज सांगतो गोष्ट
मी माझ्या हिम्मतवान आईची

माझ्या admission साठी तू
convent मध्ये गेली होती
donation ला पैसे नाही
म्हणून अपमानित झाली होती

"माझा मुलगा हुशार आहे
कोणी तरी या सिस्टर ला सांगा"
पाहिल्या आहेत वाहताना रात्र भर
तुझ्या डोळ्यातून जमुना ,गंगा

दिवाळीत नवीन नसले तरी
स्वच्छ कपडे घालायचे,असे तू सांगितले
स्वाभिमानाने कसे जगायचे
हे आम्हाला शिकवले

चकली चिवडा आवडत नाही
अस मी शेजारी सांगायचो
घरी आल्यावर आपण दोघही
किती ग रडायचो

कौलारू आपल्या घरात पाउस
पूर्ण साम्राज्य निर्माण करायचा
table वर बसून खिन्न डोळे,हसरा चेहरा
कसा मी विसरायचा?

राब राब राबून तू आम्हाला
खूप मोठे केले
सांग आता तुझे
कुठले स्वप्न राहिले

तुझे कुठले हि स्वप्न,इच्छा,आकांक्षा
आता मी पूर्ण करील
नाही जर केले तर
माझ्या आयुष्याला काय अर्थ राहील?


-

राजेश जोशी

3 comments:

  1. chan ahe kavita kipit up asch lihit ja

    ReplyDelete
  2. खरच कौतुक करावे तेवढे कमी आहे राजेशच ... कमी आणि मोजक्या शब्दात त्याने आपले आई वरील प्रेम दर्शवले आहे.

    ReplyDelete
  3. जगदीश पाटीलSat Jan 15, 02:27:00 am

    खूपच छान आहे कविता..

    ReplyDelete