तुझ्या सुख दुखात मला साथीदार व्हायचय,
तुझ्या प्रत्येक क्षणाच मला साक्षीदार व्हायचय,
तुझ्या निर्मळ अन्तहकरणात मला खोल खोल शिरायचय,
तुझ्या प्रेमळ सहवासात मला सतत दर्वलायचय,
पहिल्या पावसात तुझ्या सोबत चिम्ब चिम्ब भिजायचय,
ओल्या हिरवलिवर तुझ्या सोबत मनमुराद बागडायचय,
तुझ्या कुशितुन मला गुलमोहर फुलताना पहायचाय,
गुलमोहरा सारख फुलत तुझ्या कुशीत जगायचय,
तुझ्या आधाराने मला क्षितिज माझ गाठायचय,
तुझ्याच आधाराने मला आपल घरट बांधायचय,
तुझ्या मिठीत शांत निजुन तुझ प्रेम मला अनुभवायचय,
तुझ्याच मिठीत शांत निजुन हे जग सोडून जायचय....
No comments:
Post a Comment