Friday, 7 August 2009

Marathi Kavita : बहारो फुल बरसावो...

तुला काय माहित मी तुझ्या साठी काय काय केलंय..
कोणी नाही तेवढ मी तुझ्यासाठी सहन केलंय..

तुझ्या बापानी तर मला कुठचाच नाही सोडला..
त्याने अगदी मला साबणा विनाच धूतलाय..

बघ ना तुझ्या प्रेमात मी किती बदललोय..
साबण विनाच्या धुवण्याने मी किती उजळलोय ..

तुझ्या भावाने तर अगदी कहर केलाय..
जिथे भेटलोय तिथे त्याने मला कूटलाय..

म्हणतात प्यार मे दिल मे दर्द होता है ..
आयला एक जागा नाय जिथे दर्द नही होता है..

बापाने कधी कधी गटाराच्या वा~या घडवून दिल्यात...
आयला उंदीर आणि घुशी पण ओळखीच्या झाल्यात..

नर्स आणि डॉक्टर माझ्या ओळखीचे झालेत...
वार्ड बॉय तेवढे व्हायचे राहिलेत..

खरच ग तरी तुझा नाद नाही मी सोडला..
करीन तर तुलाच हा निश्चय मनाशी पक्का केलाय..

एक दिवस तर कहर झाला..
मला पाहून वार्ड बॉय ओरडला..

अरे खाट तयार ठेवा एक दिवाना आशिक आलाय ...
नेहमीचा कस्टमर आलाय....

बहारो फुल बरसावो..
किसीका का मेहबूब फिर मार खाके आया है..

--

एक वेडा कवी...

1 comment:

  1. नमस्ते,
    माझ्या 'द लाईफची' लिन्क तुमच्या 'दे धक्का' वर दिल्याबद्दल धन्यवाद ! तुमच्या कवितासंग्रहामधे माझी http://blog.guruvision.in/?p=72
    येथील आई हि कविता दिल्यास आनंद होईल.
    :)

    ReplyDelete