Thursday, 20 August 2009

Marathi Kavita : बालगीत

आई-बाबा आवरा
तुमची पालकनीती
आता जरा ऐकून घ्या
आमची बालकनीती.

ताई मला माकडा म्हणते
मांजरी म्हटल तर
तीला आवडेल काय ?
त्याच तोंडान भाऊ म्हटल तर
तीच काही बीघडेल काय ?

जरा कौतुक झाल की
छान तुम्ही डोलता
माझ्या मीत्रांसमोर मला
का हो टोचुन बोलता ?

दरमहा मार्कांसाठी
मला ठेवता ओलीस
खरच सांगा आई-बाबा
पालक आहात की पोलीस ?

No comments:

Post a Comment