Wednesday, 28 October 2009

Marathi Kavita : तो एक मूर्ख........

तो एक मूर्ख.........
न साध्य, न साधन
धावे विनाकारण..
न कळे कशाची तहान,
स्पर्धा हि अजाण....

सत्व ठेविले गहाण,
माथी लालसेची वहाण,..
पैशाचे पारायण
डोळ्यांत भुकेले 'मी' पण....

घरी तान्हुला लहान,
करती माय बाप स्मरण..
भार्येसही नाही त्याच्या
दोन आनंदाचे क्षण...

नाही त्याला ठाव,
चार घटकांचे जीवन...
जग जिवंत आज..
उद्या आहेच मरण..

--संदेश

No comments:

Post a Comment