आयुष्याची सुरवातीची पाने थोडीशी मळली...
आणि थोडीशि पाने तर पुस्तकातूनच गळली ...
दोन-चार पाने निशिबाने बेदर्दपणे चूरगळली.....
उरलेली काही पाने मी "चखणा" म्हणुन गीळली.....
असं काही बोलायला लागले की...............
लोक म्हणतात "काही नाहि हो...रोजचच आहे, हिला जरा चढली"
अहो पण खरंच सांगते मला नाहि चढत,
न पिता सुद्धा मी अशीच असते बडबडत
हां..... आता पिल्यावर थोडी-फार झुलते मी....
अन् झुरके मारले दोन-तिन की एकदम खुलते मी....
मी पिले तरी लोक बोलतात.....
नाहि पिले तरी लोक बोलतात....
लोकांच तर कामच असतं बोलणं
म्हणुन काय मी लोकांखातर सोडून देऊ पिणं?
अहो किती कठिण होउन बसेल मग माझ्या सारखीचं जीणं................
---
प्रिया गवई
No comments:
Post a Comment