Thursday, 8 April 2010

Marathi Kavita : अविश्वास ही.........

अविश्वास ही प्रेमाची पायरी असु शकते का?
खरं माहीत झाल्यास
काय प्रतिक्रिया असेल त्याची
स्विकारेल की झिडकारेल
संभ्रमावस्थेत होती
प्रामाणिकपणा तर आपल्याला
कुणी शिकवलाच नाही
मग आज अचानक ही भावना
का आली उफ़ाळुन
कदाचीत माझं संस्कारक्षम मन
अजुनही जागे आहे
की प्रेमाची हलकी झुळुक
कारणीभुत झालीय?
काही का असेना ,मी माझा पुर्वैइतिहास
सांगणार,
माझ्या प्रेमाला अंधारात का ठेऊ मी?
अविश्वास ही प्रेमाची पायरी असु शकते का?
नाहीच मुळी..................---कल्पी जोशी

2 comments:

 1. कदाचीत माझं संस्कारक्षम मन
  अजुनही जागे आहे
  की प्रेमाची हलकी झुळुक
  कारणीभुत झालीय?

  farch sundr

  ReplyDelete