शनिवार 10 सप्टेंबर 2011

Marathi Kavita : बासरी..... (गझल )


तुला भेटण्याची ओढ ना खरी
तुझी भेट व्हावी एकदातरी

तरी राहिले राखेत मी तुझ्या
मला जाळले मेल्यावरी जरी

म्हणू सोय किंवा म्हणू वावडे
नको आपले नाते तुझ्यापरी

तसे काय बाकी व्हायचे म्हणा
फुलांच्या इजांनी या मनावरी

किती अंतरीची अंतरे अशी
जशी खोल अश्रुंना दुःख दरी

कधी ओठ तू होशील रे अता
नको सूर हे आणीक बासरी

जरा ऐक माझे एक एवढे
"जिथे पाय आहे तीच पायरी "

कवी : कविता मोकाशी

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | 100 Web Hosting