Tuesday 4 October 2011

Marathi Kavita : चार पावल

चार पावल पुढ गेलो की
पुन्हा पाठी फिरावस वाटत
चुकल्या नजरेंन मान
तिरपी करूंन
तुला पहावस वाटत

ऑफिस मधे निघालो की
तू खिड़की जवळ यायचीस
केसाचा बहाना करत
इशारा मला करायचीस

तुझा हसरा चेहरा पाहून
खुप आनंद वाटायचा
पुन्हा तोच हसरा चेहरा
घरी येताना दिसायचा

गाड़ी सावकास चालव
लवकर घरी ये
जेवलास का
चहा पिलास का
आय मिस यू
असे असंख्य मेसेज
करून तू खुप प्रेम करायचिस
गोड आयूश्याची स्वप्न रंगउन
खुप काही सांगायचीस

तू गावी गेलीस की
जिव कासाविस होयचा
तुझा चेहरा पाहन्या साठी
उर भरून यायचा

तू गावी जाताना
लवकर येते सांगुन जायचीस
ठरलेल्या दिवशी लगेच यायचीस
...त्या दिवशी तू अचानक निघून गेलीस
का ग मला दुखाच्या खाइत सोडून गेलीस
आज तुझ्या सहवासाचा भास् मला होतो
दूर दुखाच्या जगात घेउन मला जातो


कवि : विनोद शिंदे

No comments:

Post a Comment