Saturday, 24 December 2011

Marathi Kavita : बंदी

माझा देह फक्त साडेतीन हात..
इच्छा मात्र अमाप आहेत.
मनाच्या खोल काळ्या बिळात..
विषय-वासनांचे साप आहेत.

थकत नाही मी उपभोग घेउन..
रोज लागतात नवी-नवी साधने.
ठाउक आहे, राहिलोय बंदी होउन..
हवीशीच वाटतात सगळी बंधने.

अध्यात्मापासुन लांबच रहातो..
नाही कळत देहापल्याडच्या गोष्टी.
इश्वरालाही कधी मधी स्मरतो..
फक्त माझ्या कामना-पुर्तिसाठी.

देह जरी हा थकला-पिकला
पुरता कधीच निवणार नाही.
मेल्यानंतर माझ्या पिंडाला..
दर्भाचा-कावळाही शिवणार नाही.



कवि : ________

No comments:

Post a Comment