Friday 10 February 2012

Marathi kavita : ते निखळते निखारे


साक्षीस अजुनी आहेत , तेच आभाळ चंद्रतारे
उचललेचं माझे मीच , आठवांच्या तुझे ढीगारे
कफल्लक कसा म्हणु ,वेदनांनी घर हे सजले
भिजवीतो मदीरेत सांजरात्री , ते निखळते निखारे


ते निखळते निखारे, कधी विझवता न आले
प्याल्यावर प्याले रीते, दू:ख थमवता न आले
तपावर तपे गेली , उलटून तुझ्या आठवात
नव्या बांधल्या घरात , सुख सजवता न आले


न आले पुन्हा कधीही, फुलुनी ते नक्षत्रांचे देणे
चाचपडत मुरुन गेली, पापण्यात अधूरी स्वप्ने
श्वासाश्वासावर हक्क, आठवांचा अजुन तुझ्याच
भटकंती अशीच जीवाची , ना जगणे ना मरणे




कवी : _________



No comments:

Post a Comment