Wednesday, 27 June 2012

Marathi Kavita : तुला कसा कळावा

तुला कसा कळावा
माझ्या मनीचा उमाळा
डोळ्यात दाटते पाणी
आठवूनी तो जिव्हाळा

सान्गू कसे तुला रे
माझ्या अन्तरी निखारे
झळ नको तयान्ची
म्हणूनी लोटले दूर तुला रे..

पण, मज हवास तु
अन सहवास तुझा
आकलनास तुला रे
शब्दान्चा का भास हवा?



कवि : लक्ष्मी कुलकर्णी

No comments:

Post a Comment