Friday, 19 October 2012

Marathi Kavita : तुझी नी माझी प्रीत

तुझी नी माझी प्रीत
तुझी नि माझी प्रीत
आयुष्याच्या नागमोडी
वळणावर एक
सुरेख सुंदर सफारी

सुख दुख म्हणजे
उन पावसाचा खेळ
त्यात प्रेम म्हणजे
उमलनारा इंद्रधनू
ह्यांची तर्हाच न्यारी

कधी हसन ,कधी रागावन्न

थोडा तुझा थोडा माझा
कधी लटका राग
कधी खूप खूप प्रेम
अशी एका प्रेमाची कथा सारी

सुंदर चेहऱ्यावर
हास्याचा दागिना
शालीन्तेला जोड म्हणून
सौज्याण्याचा खजिना
वरउन  तारुण्याची बहारी [3]

प्रेमाची गंध दरवळनारा
स्वतात गुंतून स्वतालाच शोधणारा
झाला कुणासाठी अधीर आज
गाऊ लागतो आज प्रेमाचा नजराणा
हि प्रेमाचीच किमया सारी [४]


कवि : विकास

No comments:

Post a Comment