Sunday, 30 December 2012

Marathi Kavita : एका आईची भावना

"लग्न झाल्यावर वडील आपल्या मुलीला भावपूर्ण निरोप देतात ह्या वर सर्वानीच बर्याच कविता व गाणी लिहिली आहेत ...
पण एक आई आपल्या मुलाला सुनेच्या ताब्यात देते ह्यावर कधी कोण काही लिहित नाही , चला तर मग वाचूयात " मुलाला सुनेच्या ताब्यात देतानाची एका आईची भावना " ...


आज पासून तू आलीस त्याच्या आयुष्यात ......... त्याला सांभाळून घे,
माझी आठवण नको आणून देऊस .......... एवढ त्याला प्रेम दे

त्याला गोड जास्त आवडत नाही ........... हे लक्षात ठेव,
थंडीत नेहमी आजारी पडतो ......... एक स्वेटर विणून ठेव

कधी कधी खूप रागावतो .......... प्रेमाने विचारले तर रडू लागतो

रागात त्याला गाडी चालवून देऊ नकोस ....... पावसात त्याला भिजू देऊ नकोस

लांब गेलात कुठे तर ..... त्याचा हाथ धरून ठेव,
तुला वेळ नाही दिली तरी ....... त्याच्याशी साथ कायम ठेव

त्याला माझी आठवण आली ...... तर तूच असशील एकमेव,
चुंबन घेऊन त्याला ...... मिठीत सामावून ठेव

आज पासून तू आलीस त्याच्या आयुष्यात ......... त्याला सांभाळून घे,
माझी आठवण नको आणून देऊस .......... एवढ त्याला प्रेम दे


कवि : ______

8 comments:

 1. Replies
  1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..

   माझी मरठीला भेट देत राहा.

   Delete
 2. खुप क्षान आहे

  ReplyDelete
 3. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..

  माझी मरठीला भेट देत राहा.

  ReplyDelete
 4. khupch chan shabadat bolata yenr nahi

  ReplyDelete