Sunday, 18 August 2013

Marathi Kavita : वेड्या मनात...

साधारण शी सजणारी..
आणि हळुवार लाजणारी..
गोजिरी दिसणारी..
आणि खूप गोड हसणारी...
अशीच एक मुलगी..
काल स्वप्ना मधी दिसली..आणि मला बघून हसली..
कोण जाने कशी माझ्या स्वप्नात घुसली..
आणि माझ्या हृदयात घर करून बसली..
गुलाब सारखे लाल ओठ..
सागरा सारखे डोळे..
तिचे केस वेली सारखे लांब.. आणि नभा सारखे काळे
तिला मी बघितलं श्वेत
फुलांच्या वनात..
अन पूर्ण साठवल माझ्या मनात..
तिच्या पैन्जानीचा आवाज
तसाच कानात गुंजतो..आणि सांगतो.आहे . मी तुझीच आहे.!! मी तुझीच आहे..
पण.....?
कुणीतरी माझी चादर ओढली..
आणि माझी साखर झोप मोडली..
परत कधी येशील ग प्रिये.स्वप्नात..
आता फक्त तूच आहेस या वेड्या मनात..
आता फक्त तूच आहेस या वेड्या मनात...कवि : ______

No comments:

Post a Comment