Thursday, 18 December 2014

Marathi Kavita : प्रेम काय असते


प्रेम काय असते
चला जरा शोधूया..
प्रेम म्हणजे..
ब्रेक अप नंतरही
आपल्या जोडीदाराला जाणून बुजून फोन करणे
आणि म्हणणे ओ सॉरी,
तुला चुकून फोन लागला
मला सवय झाली होती ना...
प्रेम म्हणजे
"आय हेट यु "
"आय हेट यु "
असे म्हटल्यावर हि जेव्हा तुमचा जोडीदार एक सुंदर स्मितहास्य
देऊन म्हणतो..
तू असे करूच शकत नाही,
मी पैंज लावतो ,
तु असे करूच शकत नाहीस
प्रेम म्हणजे
तुम्ही "गुड नाईट" मेसेज पाठविल्यानंतर
जोपर्यंत तुमच्या पार्टनरचा रिप्लाय येत नाही
तोपर्यंत तुम्हाला झोप लागत नाही
आणि थोडक्यात
वरील मजकूर वाचल्यानंतर सर्वप्रथम
जी व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर येते
ते तुमचे प्रेम...कवि : _______

No comments:

Post a Comment