Sunday 25 May 2008

सुविचार : भाग १

सुविचार

काही मराठी सुप्रसिध्ह सुविचार येथे दिलेले आहे सगलेच काही मी स्वत: लिहिलेले नाही
पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ (गोंदवलेकर महाराज)
दुर्जनाला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही.
त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे. (महात्मा गांधी)
युध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे.
जगात काही अजरामर नाही- तुमच्या चिंतासुध्दा!
जेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमुळे येते.
लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.
आपले विचार वाळूत लिहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल. आपले सुख दगडात कोरा, ते कोणीही खोडू शकणार नाही.
सत्तेपेक्षा सामर्थ्य महत्त्वाचे असते.- माणसाने आपल्या भरवंशावर जगावे.
दीपज्योतीमध्ये असे सामर्थ्य आहे की स्वत: प्रज्वलीत होऊन दुस-याला प्रजलीत करते.
आयुष्यात निश्चित काही मिळवावयाचे असल्यास साहस असावयास पाहिजे.
सानेगुरूजीचे वाड्मय म्हणजे संस्काराचा झरा !
उगीच जिथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.
जिथे मोल जाणत नाही तिथे शब्द टाकू नये.
संस्कारामुळे माणसाला खरे माणूसपण येते.
ग्रंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर.
शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.
कलीयुग कलीयुग म्हणू नका कलीयुगाला कलायुग बनवा!
मृत्यु नेहमी समीप आहे धरून चालावे त्यामुळे मन वैराग्याकडे वळते.
अंहकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वात मोठे दु:ख आहे.
चंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो.
काजव्याला वाटते जग आपल्याच लुकलुकण्यामुळे उजळले आहे.
कर्तव्यदक्ष असावे पण कर्मठ नसावे.
उत्साही असावे पण उतावीळ होऊ नये.
कृतज्ञ असावे पण कृतघ्न नसावे.
पवित्र असावे पण पतित होऊ नये.
त्याग करावा पण ताठा नसावा.
स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.
आत्मविश्वास असावा पण अंहकार नसावा.
स्वतंत्र असावे पण स्वै नसावे.
घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.
माणसाचे प्रेम हे धरती सारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.
सुखी होण्यासाठी सुखी होण्याचा मार्ग म्हणजे निसर्गावर, नियतीवर...परमेश्वरावर कोणावर तरी विश्वास ठेवा!
मानवी संबंध धावणा-या आगगाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे नसतात...ते असतात औदुबंराच्या आडव्यातिडव्या पाय वाटासारखे.
श्रध्दा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रध्दा ठेवल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही.
ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालविण्यासाठी साधन शोधण्याची गरज भासते.
पाण्याचा एक थेंब महत्त्वाचा नसेल पण ह्या थेंबाची संततधार जर दगडावर पडली तर ती धार दगडाला विंधते.
श्रध्दावान, बुध्दीवान, कर्तृत्ववान व ऐश्वर्यवान माणसाची ती कोठेही गेली तरी हार्दिक स्वागत होते. (गौतम बुध्द)- विचारांचा चिराग झाला तर आचार आंधळा बनेल. (विनोबा भावे)
प्रसंगावधान महत्त्वाचे.
जीवन क्षणभंगूर आहे आणि कडूही आहे असे सगळेच सांगत आले पण त्याचा प्रत्येक क्षण अडुळशाच्या फुलासारखा देठात मधाने भरलेला असतो.
कोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपे. पण जोडण्याकरिता कौशल्य आणि सावधगिरी लागते. (महात्मा गांधी)
जीवन ही आश्चर्याची श्रृंखला असते. आज आपल्याला उद्याचा रागरंग कधीच कळत नाही. (इमर्सन)
सुसंस्कृता अंगीकारण्यास काही द्यावे लागत नाही. पण तिच्यामुळे बरेच काही प्राप्त होते. (लेडी मॉटेज)
समृध्दता हे एक जगण्याचे साधन आहे, त्याची पूजा करून दैवत बनायचे नसते.
पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत आणि सुखी असतो.
यशस्वी व्हायचे असेल तर कल्पना नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीच मदत करतात.
हि-याहूनही 'ज्ञान' अधिक मौल्यवान आहे.
आपले प्रत्येक कृत्य हे आयुष्यातले शेवटचे कृत्य आहे असे समजून वागत जा!
मनुष्याला आपल्या दारिद्रयाची लाज वाटता कामा नये, लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणाची.
दुस-यांनी तुमच्याशी चांगले वागावे असे वाटत असल्यास आपणही त्यांच्याशी तसेच वागले पाहिजे.
मार्गातील अनेक अडचणी बाजूला सारून, जो पुढे पाऊल टाकतो त्यालाच यश मिळते. अलीकडच्या तीरावर बसून जो नुसता संकल्प करतो त्याला यश मिळत नाही.
मन अतिशय सुंदर आहे (असते) त्याला प्रसन्न ठेवयाशिवाय आपल्याला चालना येत नाही.
कष्टाने पैसा मिळवावा.
सततच्या वापराने जिची धार वाढतच जाते अशी एकमेव सुरी म्हणजेच जीभ.
स्वत:साठी जे करू ते स्वत:बरोबरच संपते.
शस्त्र हे धारण करणा-यालाही घातकच असते.
देण्याची पात्रता जो कमावतो त्यालाच घेण्याचा अधिकार असतो.
नव्या बादलीतून पाणी तर गळत नाही ना, याची खात्री होईपर्यंत जुनी बादली फेकून देऊ नये.
स्वप्ने प्रत्यक्षात यायला हवी असतील तर झोपून राहू नका.
जास्त मिळवायचे असेल तर मुळात अपेक्षा कमी मिळविण्याची ठेवा.
ह्दयाची श्रीमंती नसेल तर कुबेरही भिकारडाच राहतो.
कोणत्याही स्थितीत शांत आणि संयमी राहण्याची ताकद हेच सर्वोच्च सामर्थ्य.
काळानुसार न बदलणारे शेवटी विनाश ओढवून घेतात.
अयोग्य माणसा बरोबर आनंद करण्यापेक्षा योग्य माणसाबरोबर दु:खात राहणे बेहत्तर.
झोप आली असतांना जो झोपी जात नाही आणि झोप येत असतांना जो जागा राहतो असा मनुष्य, हा भूतलावर एक मात्र प्राणी आहे.
जीवन सुखी होण्यासाठी ज्ञान, कर्म व भक्ती यांचा समन्वय साधला गेला पाहिजे.
शांतता टिकविण्याचे सामर्थ्य नसेल तर तो नेता होऊ शकणार नाहीत (महात्मा गांधी)
समाज, देश व जगातील सर्वात जटील समस्यांचे एकमात्र निरसन म्हणजे चारित्र्य.
शांतता बाहेर सापडणे फार कठीण आहे कारण ती आपल्या आतच दडलेली असावी.
अडचणी आल्याशिवाय खरा मित्र कोण ते कळत नाही.
राग आणि सहनशीलता हे योग्य समंजसपणाचे जुळे शत्रू आहेत.
आपण सुस्वभावी आणि प्रेमळ असल्यास आपोआपच प्रेम मिळते.
मान मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आधी तो देणे होय.
व्यक्तिच्या मनात वसत असलेला सलोखा गुण्यागोंविदाने राहणा-या समाजाला प्रतिबिंबीत करीत असतो.
सर्वकाही आनंदीवृत्तीने केल्यास करायला कठीण असे कोणतेच काम असणार नाही.
चिडणे हा विरोधावर मात करण्याचा मार्ग नव्हे तर संयम आणि निराशेने तुमच्यावर मात केल्याचे लक्षण आहे.
कोणतीही बिकट परिस्थिती आली तरी धीर सोडता कामा नये.
गुणवत्तेच्या दारी पोहचण्याआधी घाम गाळला पाहिजे हेच उत्तम ध्येय ठेवावे.
प्रेमळ व सत्य बोलण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही.

No comments:

Post a Comment