Sunday, 25 May 2008

मराठी पीजे { पंचाट विनोद }

मला आवडलेले काही मराठी पीजे { पंचाट विनोद } मी इथे दीले आहेत जे तुम्हाला आवडतिल असे नाही.

1) गिऱ्हाईकाची दाढी करून झाल्यावर न्हाव्यानं त्याला विचारलं, "साहेब! माझा वस्तरा कसा काय काय वाटला तुम्हाला?"गिऱ्हाईक म्हणाले," न्हावीदादा, तुमच्य वस्तऱ्याला खरोखरच जगात तुलना नाही। तुम्ही वस्तऱ्यानं माझी दाढी करीत आहात, असं मला वाटलंच नाही."हे ऐकून एकदम खुषीत आलेल्या न्हाव्यानं विचारलं, "असं? मग मी तुमच्या गालांवरून वस्तरा फिरवीत असताना तुम्हाला नेमकं कसं वाटत होतं?गिऱ्हाईक म्हणाले, "खरं सांगायच तर, तुम्ही हाती खरखरीत पॉलिशपेपर घेऊन माझे गाल जोरात घाशीत असल्याचा मला भास होत होता."

2)दिवाणखान्यात स्वेटर विणत बसलेल्या आपल्या आईपाशी जाऊन मन्यानं तिला लडिवाळपणे विचारलं, "आई गं, स्वैपाकघरातील फडताळातल्या डब्यातला एक लाडू खाऊ का मी?""खा बरं बाळ। भूक लागलीय्‌ का तुला?"आईचे हे शब्द कानी पडताच मन्या म्हणाला, "आई! तू लाडू खायला परवानगी दिलीस, म्हणून मला किती हायसं वाटलं! कारण तो लाडू मी अगोदरच खाऊन टाकला होता!"

3)हॉटेलमध्ये गेलेला एक इसम गरमगरम मिसळ खात असता त्याला त्या मिसळीत एक मेलेलं झुरळ सापडलं। त्याबरोबर मिसळ आणून देणाऱ्या पोऱ्याला हाक मारून तो रागानं म्हणाला, "या मिसळीत बघ, मेलेलं झुरळ आलंय!"यावर तो पोऱ्या म्हणाला, "तुम्हा गिऱ्हाइकांना मिसळ तर गरमागरम हवी असते. मग गरम मिसळीतलं झुरळ जिवंत कसं राहील? उष्णतेमुळं ते मरणारच."

4) गुरुजींनी विचारलं, "बबलू! मेंदूशिवाय माणूस किती वर्षे जगू शकेल रे ? " बबलून प्रतिप्रश्न केला, " गुरुजी! सध्या तुमचं वय किती आहे?"

रस्त्यात दोन इसमांची भेट झाली। बोलता बोलता विषय टिळकांचा निघाला, तेव्हा पहिला म्हणाला, " लोकमान्य टिळकांचा `गीतारहस्य' हा ग्रंथ खरोखरच अलौकिक आहे नाही का?"दुसरा-प्रश्नच नाही. त्या ग्रंथाल तोड नाही.पहिला- तुम्ही वाचलाय का तो ग्रंथ? दुसरा- नाही, पण तुम्ही?

वर्गात शिकवता शिकवता गुरुजी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले। "बरं का बाळांनो? खोटं ते खोटं. ते कधीहि उपयोगी पडणं शक्य नाही, म्हणून जे खोटं आहे, त्याला आपण कधीही थारा देता कामा नये. " याप्रमाणे बोलून त्यांनी बापूला विचारलं, "काय रे बाप्या ? माझ म्हणणं तुला पटलं ना ? " यावर बापू म्हणाला, " गुरुजी, प्रत्यक्ष खोट्या दातांची कवळी तुमच्या तोडांत दिसत असताना, तुमचं म्हणणं मला कसं पटेल?"

एका डॉक्टरांनी आपल्या रोग्याला विचारल्म , " अलबतराव, मी काल दिलेल्या औषधामुळं तुमच्या उलट्या बंद झाल्या ना ?"अलबतराव म्हणाले, " हो, उलट्या पार बंद झाल्या, पण अजून मला श्वास मात्र अधुनमधून लागतोय।"आवर डॉक्टर अगदी आत्मविश्वासाने त्यांना म्हणाले, " अलबतराव, त्याची बिलकूल काळजी करू नका तुम्ही. माझ्या आजच्या औषधाने तुमचा श्वासही कायमचा बंद होईल."

एक शिक्षिका वर्गातल्या एका गुबगुबीत मुलाला वेषभूषास्पर्धेसाठी `गणपती' बनवू पहात होती। पण त्या शिक्षिकेनं, त्याचप्रमाणे त्या मुलाच्या आईनंही त्याचं मन वळविण्याचा बराच प्रयत्न करूनहीम, तो त्यांचं ऐकेना.अखेर त्याला एका बाजूला घेऊन आई म्हणाली, "गुंड्या, अरे यापूर्वी तू बऱ्याच वेळा मोठ्या उत्साहानं भाग घेऊनम अनेक वेषभूषास्पर्धेत बक्षिसे मिळविलीस; मग याच वेळी तू `गणपती' का होत नाहीस ? अरे, लोक तुझी पुजा करतील, तुला मोदक देतील, तुझी आरती करतील! केवढी मज्जा येईल ठाऊक आहे?यावर गुंड्या म्हणाला, "ते सगळ खरं गं ? पण शेवटी `पुढच्या वर्षी लवकर या' असं म्हणून जर त्यांनी मला नदीत बुडवलं, तर काय करायचं ?

गुरुजींनी विचारलं, "बाळू! शिवाजीमहाराजांचं एक वैशिष्ट्य तू सांगू शकशील का?"बाळू - त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती। कुठलीही गोष्ट त्यांच्या स्मरणात पक्की राहायची.गुरुजी - (आश्चर्याने) कशावरून?बाळू - म्हणून तर लोक त्यांच्या स्मरणार्थ जिकडे तिकडे त्यांचे पुतळे उभारतात.

पाण्याचा पोपट कसा करायचापाणी तापवायचं आणि आंघोळच करायची नाहीबादलीचा पोपट कसा करायचानळाखाली बादली ठेवायची आणि नळच सुरु करायचा नाहीनळाचा बादलीचा आणि पाण्याचा पोपट कसा करायचानळच सुरु करायचा आणि बादलीच काढुन घ्यायची

3 comments: