Tuesday, 3 June 2008

अगतिक : एक कविता

तुझे जिंकणे आता माझीच जीत आहे।

माझे हारणे आता तुझीच जीत आहे।

चाल माझी अन् शब्द माझेच आहे।

गुणगुणले मनी माझेच गीत आहे।

सांगू नको कुणा हे गुपित मनाचे।

मुखड्यावरी केली वेडी प्रित आहे।

तुझे तोंड वेगाडने ते आगमनाला।

अतिथि देवो भव जुनीच रीत आहे।

भल्याच माणसाची रोज गाठ आहे।

जाणूनही गातो हे स्वागत गीत आहे।

कवी : प्रल्हाद दुधाल ९४२३०१२०२०

No comments:

Post a Comment