Friday, 6 June 2008

लाइव्ह सीडी

इंस्टॉल न करता वापरता येणारी आणि सहज वाटप करता येण्याजोग्या साधनांवरून (सीडी, डिव्हिडी, युएसबी ड्राइव्ह इ।) चालणारी नियंत्रण प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टिम) म्हणजे "लाइव्ह डिस्ट्रो" किंवा (सीडीवर असेल तर) "लाइव्ह सीडी" होय. लाइव्ह सीडी मध्ये संपूर्ण नि. प्र. असते. लाइव्ह सीडी संगणकात टाकून त्या सीडीवरून जर संगणक बूट केला तर ती नि. प्र. थेट वापरता येते. पडद्यामागे ही लाइव्ह सीडी आपल्या आज्ञावल्या संगणकाच्या रॅममध्ये हलवते आणि संगणकात आधीच असलेल्या माहितीला किंवा साधनांना धक्का न लावता संगणक चालवता येतो (आपल्याला वाटल्यास संगणकात आधीच्याच असलेल्या माहितीत बदल करता येऊ शकतो) लाइव्ह सीडी हा प्रकार लिनक्स क्षेत्रात जास्त प्रमाणात प्रचलित आहे. लिनक्स लाइव्ह सीडी मध्ये जालजोडणी, न्याहाळक (ब्राउज़र), निरोप्या (मेसेंजर), ऑफिस आज्ञावल्या इ. इ. सर्वकाही असते.

लाइव्ह सीडीचे उपयोगः
१] नि। प्र. इंस्टॉल करण्याचे वेळखाऊ काम वाचते. जाळ्यांची जोडणी तपासणे वगैरे कामे करताना लाइव्ह सीडी चा चांगला उपयोग होतो.
२] नि। प्र. क्रॅश किंवा इतर कोणत्याही कारणाने संगणक नेहमीसारखा सुरू करता येत नसेल तर लाइव्ह सीडीतून बूट करून डेटा दुसरीकडे हलवता येतो.
३] काही लाइव्ह डिस्ट्रो विशिष्ट उद्देशाने बनवलेले असतात. उदा. संगणक सुरक्षा क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा/साधने असलेली लाइव्ह सीडी.

लाइव्ह सीडीच्या मर्यादा :
१] संगणकाच्या रॅमचा काही भाग लाइव्ह सीडीच्या आज्ञावल्यांसाठी वापरला गेल्याने इतर आज्ञावल्यांना (ऍप्लिकेशन्स) उपलब्ध असणारी रॅम कमी असते. त्यामुळे रॅम कमी असणार्‍या संगणकांवर लाइव्ह डिस्ट्रो हळू चालेल.
२] वर उल्लेखलेल्या विशिष्ट प्रसंगात किंवा एखाद्या नव्या नि. प्र. ची चाचणी करण्यासाठी लाइव्ह सीडी वापरली जाते. अधिक कालावधीसाटी संगणक वापरताना लाइव्ह सीडी पेक्षा इंस्टॉल केलेली नि. प्र. वापरलेली चांगली.

No comments:

Post a Comment