Sunday 22 June 2008

जीवनाच्या रथाचे आहेत सुख दु:ख सारथी

दु:खाच्या घरी एकदा
जमली होती पार्टी
दारु बीरु पिऊन अगदी
झिंगली होती कार्टी...
दु:ख म्हणाले " दोस्तानों "
बिलकुल लाजु नका
इतके दिवस झळले म्हणून
राग मानु नका !!!
मनात खुप साठले आहे
काहीच सुचत नाही
माझी "स्टोरी" संगीतल्या शिवाय
आता राहवत नाही....


मी आणी सुख दोघे
जुळे भाऊ होतो
पाच वर्षाचे होतो तेव्हा
जत्रेत गेलो होतो...
गर्दि आशी जमली
नी गोंधळ असा उठला...
माणसांच्या त्या गर्दि मध्ये
सुखाचा हात सुटला!


तेव्हा पासुन फिरतोय शोधात
दुनियेच्या जत्रेत
दिसतोय का सुख माझा
कुणाच्याही नजरेत...
:सुखा बरोबरचे लहाणपणीचे
क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने
दु:ख ढसा ढसा रडले!


नशा सगळ्यांची उतरली
दु:खाकडे पाहुन!
दु:खालही सुख मिळावे
वाटले राहुन राहुन...
सुखाच्या शोधात आता
मी सुध्दा फिरतोय
दु:खाला शांत करण्याचा
खुप प्रयत्न करतोय...


जीवनाच्या रथाचे
आहेत सुख दु:ख सारथी
सुख मिळाले तर दु:खाच्या घरी
मीच देईन पार्टी...

No comments:

Post a Comment