Monday, 23 June 2008

ती साण मोठया मानाची, मी विझती कथा चंदनाची

मी तिचा श्वास होतो, इतका मी खास होतो
ती पुर्ण शाकाहरी, मी भोजनातील मास होतो

मझ्या प्रत्येक क्षणात, ती अंग अंग मोहरायची
आज, तोच मी तिचा अधांतरी प्रवास होतो

माझ्या शिवाय, तिच्या जिवनाचं पानं ही हलेना
मला आठवताचं बहरायची, आज दचकणारा भास होतो

ती मुक्त विहरणारी आकाशात, स्वातंत्र जपणारी
बंधनात बांधण्यासाठी निघालो, मी तिचा कारावास होतो

माझ्या स्वभावाचं अमृतही, न कामी आलं तिच्या
मुखात पडताच तिच्या, मी कडवी मिठास होतो

डाव जीवनाचा हरेक वेळेस मी जिंकतंचं आलो
तिला एकदाही न जिंकता आलं, मी का नापास होतो

ती साण मोठया मानाची, मी विझती कथा चंदनाची
मी झिजून सुवास दरवळला, म्हणून तीचा दास होतो.

लेखक : सनिल पांगे

No comments:

Post a Comment